एक कविता

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

भरून आले नभ
विचारांची झाली दाटी
ल्याली आठवं भरजरी
तरी.. अतृप्त मनाची दिठी

जुन्या भेटीचे पदरव
अजून झंकारत होते
रूणझुणती वेडे पैंजण
का गीत तुझेच गात होते?

अंधारून आलेही
नर्तनात रत पाऊस
छत्रीखालच्या ओंजळीत
एक थेंब..चिमुकला..स्तब्ध..

ती वेडी हृदयाची धडधड
दाहक स्पर्श होता ओला
कणाकणात ओवून घेत
तो पाऊस श्रीमंत झालेला....

विषय: 
प्रकार: 

ती वेडी हृदयाची धडधड
दाहक स्पर्श होता ओला
कणाकणात ओवून घेत
तो पाऊस श्रीमंत झालेला....
>>>
किती सुंदर कल्पना आहे . आवडली Happy