ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!
गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.
२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.
पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.
हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.
या सगळ्यात मी एक नाईंंटीज किड आणि शाहरूखचा निस्सीम चाहता या नात्याने ती सगळी चर्चा एंजॉय करत होतो. पण त्याचवेळी मनाने हे देखील स्विकारले होते की शाहरूख आता संपला आहे. मी स्वतःच "चेन्नई एक्स्प्रेस" वा एखाद्या "डिअर जिंदगीचा" अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे त्याचा कुठला चित्रपट थिएटरला जाऊन बघायचे धाडस केले नाही, तर ईतरांकडून काय अपेक्षा करणार होतो.
पठाणचा ट्रेलर पाहिला आणि पुन्हा हे मागच्या पानावरून पुढे चालू होणार असेच वाटले. अॅक्शन हा त्याचा प्रांतच नाही. जी जादू त्याच्या अदाकारीत आहे ती वीएफएक्समध्ये कुठली. त्यातही चित्रपट चुकून थोडाफार चालला तर त्याचे श्रेय स्पेशल ईफेक्ट्सना जाणार, आणि पडला तर मात्र खापर शाहरूखच्या डोक्यावर फोडले जाणार याची कल्पना होती. हे सर्व ऐकायची आणि पचवायची मनाची तयारीही होती. कारण मुळात मला शाहरूख चित्रपटांच्या पलीकडे आवडत आलाय.
त्याचा ह्युमर, त्याचा हजरजबाबीपणा, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचा स्टेजवरचा वावर, त्याच्यातली उत्स्फुर्त एनर्जी.. या सर्वांमुळे त्याच्या मुलाखती, त्याच्या जाहीराती, त्याचे फिल्म शोमधील अँकरींग हे सारे काही नेहमीच बघायला आवडते. त्याचे चांगले चित्रपट यायचे बंद झाले तेवढ्याने माझे शाहरूखप्रेम आटणार नव्हते. आजही मी त्याचे जुनेपुराणे सिनेमे हुडकून बघतो, आणि आठ वर्षांच्या लेकीलाही दाखवतो. कारण त्यांची रीपीट वॅल्यू अफाट आहे आणि शाहरूख आवडायचे वय नसते.
लोकं म्हणायचे की त्याने आता सेकंड इनिंग सुरू करावी. खूप झाले स्टारडम. आता आपल्यातील अभिनेत्याला न्याय द्यावा. लोकांची अभिरुची बदललीय. तर त्यानेही आपली किंग ऑफ रोमान्स ईमेज बासनात गुंडाळून ठेवावी.. वगैरे वगैरे..
पण ते ही ठिकच होते म्हणा, कारण वयही झालेच होते त्याचे. त्यालाही ते कळत असावे. त्याचेही फॅन, रईस, झिरो, डिअर जिंदगी अश्या चित्रपटातून काही वेगळे करता येईल का हे चाचपणे चालूच होते. पण त्यातही कुठेही स्टारडमशी कॉम्प्रोमाईज करणे त्याला मंजूर नव्हते.
चित्रपटांची निवड चुकत होती म्हणा किंवा जे करत होता ते त्याला सूट होत नव्हते म्हणा, वा खरेच लोकांची अभिरुची बदलली असावी जे त्याचे चित्रपट आपटतच होते.
पण तरीही आत कुठेतरी सुप्त ईच्छा होती की त्याला यातून मार्ग मिळावा. आजही त्याचे जे कामाप्रती समर्पण आहे त्याला न्याय मिळावा. यातून काहीतरी सुवर्णमध्य साधला जावा. आणि तेच नेमके पठाणने केले... येस्स..! शाहरूख ईज बॅक !!
या सुपर्रस्टार खेळाडूने नेमके तेव्हाच परफॉर्म केले जेव्हा त्याच्या बॉलीवूड संघाला सर्वाधिक गरज होती.
ओनली शाहरूख कॅन सेव्ह बॉलीवूड - या चाहत्यांच्या अपेक्षांची त्याने लाज राखली.
आज जे काही मी थिएटरात बघून आलो त्याने मन तृप्त झाले. गेल्या दोन दिवसात पठाण बघून आलेल्या (तटस्थ) मित्रांनी तो छान एंटरटेनिंग आहे असे सांगितल्याने अपेक्षा किंचित वाढल्या होत्या. शाहरूखने त्या वाढलेल्या अपेक्षादेखील पुर्ण केल्या.
त्याचा तो ह्युमर, त्याचे ते चटपटीत संवाद, त्याचे ते मिश्कील हास्य, त्याचा तो रोमान्स, त्याचे ते इमोशन्स आणि भावनिक प्रसंगात बोलणारे डोळे, त्याची ती उत्स्फुर्तता... सारे काही पुन्हा जमून आले.
सिक्स पॅक आणि डोलेशोल्ले दाखवणारी बॉडी व्यायामाने बनवतात की यामागेही काही तांत्रिक कमाल असते कल्पना नाही, पण तेही त्याला सूट होत होते. डोळ्यात बदाम बदाम बदाम येत होते.
ईथे त्याचा डॉनमधील चकाचक स्मगलर लूक नव्हता की मै हू ना चित्रपटासारखा लव्हरबॉय मेजर नव्हता. तर खर्राखुरा बॉडीबिल्डर अॅक्शन हिरो लूक होता. आणि त्यातही तो जॉनसमोर कुठे कमी भासला नाही. (जॉनचे हे होमपीच असल्याने कोणी म्हटले, छे जॉनच हॉट दिसत होता तर ते ही मान्य आहे
)
वीएफएक्स आणि अॅक्शन कमाल होती. त्यासोबत तितकीच कमाल बॅकग्राऊंड म्युजिक होती. याआधी कुठल्या बॉलीवूड वा भारतीय चित्रपटात या तोडीचे काम पाहिले नाही. त्यामुळे तुलनेला हॉलीवूडच घ्यावे लागणार. पण तरीही मला कुठल्याही हॉलीवूड चित्रपटाआधी हा बघायला आवडेल कारण याला भारतीय ईमोशन्सचा टच आहे. तसेच आपल्या ईतिहास भूगोलाचे आपल्याला रिलेट होणारे संदर्भ आहेत. असे चित्रपट आपल्याकडेही यावेत अशी ईच्छा होतीच. जी आज खुद्ध शाहरूखनेच पुर्ण केली. (हे म्हणजे पहिले एकदिवसीय द्विशतक सचिन तेंडुलकरच्याच बॅटमधून यावे अगदी तसली फिलींग आली
)
अश्या चित्रपटांमध्ये खरे हिरो स्पेशल ईफेक्ट असतात, अॅक्शन सीन असतात, कॅमेरा आणि बॅकग्राऊंड म्युजिक असते. असे कितीही म्हटले तरी आणि ते तितकेच उत्तम जमून आले असले तरी, चित्रपटातील ९५ ते ९८ टक्के फ्रेम्समध्ये शाहरूख हा आहेच. त्यामुळे हा चित्रपट त्याचाच वाटतो. तो शीर्षकापासून ईत्र तित्र सर्वत्र आहे. पण तरीही जॉन, दिपिका, डिंपल वा आशुतोष राणा यांच्या कॅरेक्टरवर कुठेही अन्याय झाला नाही. सारेच छान डेव्हलप झालेत.
जॉन अगदी तसाच आहे जसा तो आवडतो. लहानपणी जेव्हा ईंग्लिश चित्रपट बघायचो तेव्हा त्यातले व्हिलन (बरेचदा हिरोपेक्षाही) स्मार्ट हँडसम आणि चिकणे बघून वाटायचे की आपल्याकडेच का क्रूरता दाखवायला शारीरीक व्यंग वा अक्राळविक्राळ चेहरे लागतात. ती वागण्यातूनही दाखवता येऊ शकतेच, जेणेकरून कोणी बाह्यसौंदर्याला भुलू नये. पण गेले काही वर्षात आपल्याकडेही हा ट्रेंड बदलला आहे. आणि अश्या व्हिलनमध्ये जॉनचा नंबर फार वरचा आहे. पठाणमध्ये तो आणखी एक पायरी वर चढला आहे. दिसण्यातही आणि अभिनयातही.
दिपिकाबाबतही अगदी हेच म्हणता येईल जे जॉनबाबत. बेशरम रंग या आयटम साँगमध्ये तिने ते केले जी पब्लिसिटी आणि मार्केटींगची गरज होती. पण चित्रपटात कुठेही ती शोभेची बाहुली वाटत नाही. तिचेही अॅक्शन सिक्वेन्स तोडीस तोड आहेत. सोबत डिंपल कपाडीया आणि आशुतोष राणा या दोघांनाही आपापल्या भुमिकांमध्ये बघून छान आणि नॉस्टेल्जिक वाटले.
बिकीनीसाँग वरून आठवले, शाहरूखचे ईतर कुठलेही चित्रपट सहकुटुंब सहपरीवार बघण्यासारखे असतात, तसाच हा देखील आहे. हे सलमानच्या चित्रपटांनाही लागू होते. त्यांना आपला टारगेट ऑडीयन्स पक्का ठाऊक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा.
आमच्या थिएटरमध्ये खूप काही टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या अश्यातला भाग नाही. ते पब्लिक कशी आहे त्यावरही अवलंबून असते. पण लोकं चित्रपट एंजॉय करत होते हे त्यांच्या हसण्यावरून कळत होते. तरी शिट्ट्या आणि टाळ्या दोन जागी आल्याच. एक शाहरूखच्या एंट्रीला. पण त्याचा चेहरा दिसला तेव्हा नाही आल्या, तर त्याने झप्पकन उडी मारत त्याचा पहिला स्टंट केला तेव्हा आल्या. आणि तेव्हाच समजले, भाई ये पिक्चर मे शाहरूख कुछ स्पेशल करनेवाला है. तसेच दुसरा जल्लोष अर्थातच सलमानच्या एंट्रीला झाला. किंबहुना शाहरूखच्या एंट्रीपेक्षाही जास्त झाला. तो सीनही लोकांनी फार एंजॉय केला. तो त्याचसाठी आणि तसाच बनवला होता. शाहरूख सोबत होताच.
ईतर तांत्रिक बाबींबाबत मी फार डिट्टेलवार सांगू शकत नाही. तितका माझा चित्रपटांचा अभ्यास नाही. पण खरे सांगायचे तर सामान्य चित्रपटप्रेमींनाही फार अभ्यासू मतांशी घेणेदेणे नसते. त्यांना चित्रपट एंटरटेनिंग आहे की नाही हेच जाणून घेण्यात रस असतो. आणि मनोरंजनाच्या स्केलवर तो पैसा वसूल आहे ईतके खात्रीने सांगू शकतो.
मला आठवतेय, लहानपणी शाहरूख आवडीचा असल्याने त्याच्या नवीन चित्रपटांचे रिव्यू आवडीने वाचायचो. तेव्हा आमच्या घरी येणार्या वृत्तपत्रात "कुछ कुछ होता है", "दिल तो पागल है", " परदेस" या त्याच्या चित्रपटांची तर्काच्या निकषावर तूफान खेचली जायची. प्रत्यक्षात पुढे जाऊन मी ते चित्रपट कैक वेळा पाहिले. तेव्हाच माझ्या बालमनावर एक गोष्ट ठसली, की या अभ्यासू लोकांना लॉजिक शोधत बसू दे, आपण मात्र मॅजिक बघावे आणि चित्रपटांचा आनंद लुटावा 
तरीही चित्रपटाची एडीटींग कमाल आहे. चित्रपट वेगवान आहे आणि कुठेही कंटाळवाणा सीन येणार नाही याची काळजी घेतली आहे. फार लांबड न लावता दोन तास सव्वीस मिनिटात अॅक्शनपॅक मूवी बसवला आहे. अगदी शाहरूख-सलमानचा सीनही मस्त जमतोय म्हणून उगाच ताणला नाहीये.
अरे हो, गाणे चित्रपटात एकच आहे. बेशरम रंग. दुसरे गाणे "झूमे जो पठाण" आहे ते शेवटी चित्रपट संपल्यावर येते. ते गाणे फार श्रवणीय नसले तरीही पब्लिक पुर्ण बघते. हे त्यांना चित्रपट आवडल्याची पावती समजू शकतो. आम्हालाही आवडला म्हणूनच आम्हीही खुर्ची सोडली नाही.
असो,
जाता जाता ...
थिएटरात चित्रपट बघणार्या पब्लिकला दोन विशेष टिप्स -
१) सर्वात आधी दोन मिनिटे शांतता त्यांच्यासाठी जे ईंटरव्हलनंतर बरेच लेट जागेवर आले. त्यांनी सलमानची एंट्री मिसली. तुम्ही असे बिलकुल करू नका.
२) चित्रपटाच्या शेवटी येणारे "झूमे जो पठाण" गाणे अर्धवट सोडून जायचा मोह झाला तरी तो आवरा. तुमच्या शेजारचा उठला तर त्यालाही खाली बसवा. कारण गाणे संपल्यावर एक धमाल सीन आहे. तो आवर्जून बघा.
देश का सवाल है भाई, बच्चों पे नही छोड सकते!
नाही कळलं..., तुम्ही पिक्चरच बघा 
धन्यवाद,
ऋन्मेष
ऋनमेष.
ऋनमेष.
ल sharukh वर प्रेम झाले आहे.
फक्त स्त्री पुरुष च प्रेम होते असे काही नाही.
पुरुष पुरुष पण होते.
त्या मुळे शाहरुख विषयी लीहताना अती व्यक्त होत असतो.
इतके प्रेम ती गौरी पण करत नसेल
शाहरुख ऐवजी सिद्धार्थ
शाहरुख ऐवजी सिद्धार्थ मल्होत्रा ला घेऊन केला तर तुम्ही जाल का पहायला? >>>>>>>
मी पण जाईल !
ऋनमेश च्या सारुक वरील अती प्रेमामुळे सारुक चे मूव्ही बकवास वाटायला लागले आहेत
मै! विषयच संपला!
मै!
विषयच संपला!
ऋनमेष.
ऋनमेष.
ल sharukh वर प्रेम झाले आहे.
फक्त स्त्री पुरुष च प्रेम होते असे काही नाही.
पुरुष पुरुष पण होते.
>>>>>
हो, माझे आईवर आहे. बाबांबरही आहे.
बहिणीवर आहे. तसे भावावरही आहे.
लेकीवर आहे. तसे लेकावरही आहे.
प्रेम जेंडर बघून होत नाही.
ऋनमेश च्या सारुक वरील अती
ऋनमेश च्या सारुक वरील अती प्रेमामुळे सारुक चे मूव्ही बकवास वाटायला लागले आहेत Happy
>>>
अती प्रेम म्हणजे काय?
जे मोजून मापून केले जाते ते प्रेम नसते.
प्रेम असले की सर्व वाईट
प्रेम असले की सर्व वाईट गोष्टी पण चांगल्या वाटतात.
(, लग्ना अगोदर प्रेयसी गुणांची खान असते पण लग्न झाले की तिच्या मधील अनेक दुर्गुण कळू लागतात.
कारण पहिले आंधळे प्रेम असते आणि नंतर डोळस प्रेम असते.)
सिनेमा सारखी कलाकृती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी कलाकार वर प्रेम नको.
कलाकृती वर प्रेम हवं.
ऋनमेष .
तुझे नेमके उलट आहे.
शारुखं नी फक्त पूर्ण सिनेमा आजारी माणसाचा रोल केला.
फक्त चादर घेवून झोपून राहायचे तरी तुला आवडेल.
अमिताभ महानायक म्हणून मिरवतात .
पण त्यांचे दोन तीन च चित्रपट मला आवडतात.
सर्व आवडत नाहीत.
त्या मध्ये शराबी हा सिनेमाचं मला उत्तम कलाकृती वाटते.
बरेच तर सिनेमे एकदम बकवास आहेत.
रेखा किंवा बाकी नायिका आणि गाणी ह्या मुळे चालले आहेत.
कमल हसन नावाजलेला कलाकार आहे पण फक्त चाची ४२० हाच एकमेव सिनेमा मला जास्त आवडतो.
शरुखं च बॉलिवूड चा तारणहार हा
शरुखं च बॉलिवूड चा तारणहार हा दावा च हास्यास्पद आहे.
इरफान चे सिनेमे त्याच्या पेक्षा जास्त उत्तम मला तरी वाटतात.
मग तो हिंदी मीडियम असो किंवा बाकी चे.
सलमान चे चाहते त्याच्या पेक्षा जास्त असतील
आणि त्याचे सिनेमे पण उत्तम मनोरंजन करतात.
मग सलमान असेल तर च बॉलिवूड टिकेल असे बोलता येईल का?
सचिन निवृत्त झाला म्हणून उत्तम क्रिकेटर भारतीय टीम मध्ये आता नाहीत का?
सचिन पेक्षा पण उत्तम खेळाडू आहेत
हेमंत सर. जबरदस्त बॅटींग!!
हेमंत सर. जबरदस्त बॅटींग!!
एक एक वाक्य म्हणजे आसूड आहे आसूड!
वाक्याव्क्याला फट्टाक आवाज येतोय. सोलून काढलंय नुसतं.
प्रेम असले की सर्व वाईट
प्रेम असले की सर्व वाईट गोष्टी पण चांगल्या वाटतात
>>>
चूक
प्रेम असले की त्या व्यक्तीला चांगल्या वाईट गोष्टींसह स्विकारले जाते
त्याच्या वाईटाला चांगले म्हटले जात नाही की ते चांगले सिद्ध करायची धडपडही करावी लागत नाही.
याऊलट द्वेषात मात्र असे होते. तिथे चांगल्या गोष्टीही वाईट वाटू लागतात
फक्त स्त्री पुरुष च प्रेम
फक्त स्त्री पुरुष च प्रेम होते असे काही नाही.
खेळ खल्लास 
पुरुष पुरुष पण होते. >>>> दुसरे सर! नादखुळा प्रतिसाद
दुसरे सर फुल्ल फॉर्म मध्ये
.
.
शाहरूख खान ईझ ॲन इमोशन!
US reporter BRUTALLY TROLLED for calling Shah Rukh Khan 'India's Tom Cruise'. Twitter cancels him
Shah Rukh Khan fans from all across the globe schooled a US reporter who called the Pathaan actor ‘India’s Tom Cruise’. The reporter had mentioned the same in a piece that he did on the phenomenal success of the SRK’s actioner.
Shah Rukh Khan is an emotion! And with the earth-shattering success of Pathaan, the entire world is feeling this emotion at the moment. Therefore, when a US reporter called Shah Rukh Khan ‘India’s Tom Cruise’, the internet took offence and schooled him. The reporter had stated so in his piece on Pathaan.
US reporter gets trolled
Taking to Twitter, a US reporter named Scott Mendelson wrote, “India's Tom Cruise, #ShahRukhKhan, May Have Just Saved Bollywood With His Blockbuster #Pathaan,” and shared the link to his article.
https://www.zoomtventertainment.com/celebrity/us-reporter-scott-mendelso...
ऋन्मेश, SRK चा दोन भागांचा
ऋन्मेश, SRK चा दोन भागांचा AIB पॉडकास्ट पाहिलाय का ?
>>>
हो कॉमी, फेव्हरेट विडिओ आहे तो माझा. तिथे आपण त्या गप्पांमध्ये असायला हवे होते असे वाटते तो विडिओ बघताना. आज पुन्हा बघतो शोधून
शाहरूखबद्दल एक फार आवडते, तो विनम्रतेचा बुरखा ओढत नाही. तरी तो एक चांगला व्यक्ती आहे हे कळतेच. म्हणूनच चाहत्यांचे प्रेम नशिबी आहे.
(No subject)
पठाण जिंदा है .. बदाम बदाम बदाम
हा संपूर्ण धागा अनावश्यक आहे.
हा संपूर्ण धागा अनावश्यक आहे. जर आधीचा पठाणवरचा धागा नसता तर पठाणने अजून दोनशे कोटी कमावले असते. अति कवतुकामुळे बर्याच लोकांच्या डोक्यात बसला असेल शाहरूख. ब्रह्मास्त्र बॉयकॉट ग्यांगमुळे ब्लॉकबस्टर हिट झाला. तसाच पठाण पण हिट झाला. ऑपोझिट पोल्स अॅट्रॅक्ट्स. सजातीय ध्रुव रिपल्सतात.
यावरून ऋन्मेष हे पठाण फ्लॉप होण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे सिद्ध होते. हा धागा काढून अजूनही पठाणचा बिझनेस कमी व्हावा आणि मी शाहरूखचा फॅनच आहे हे दाकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
डोक्यात जाईल असे कौतुक केले कि लोक इरीटेट होतात आणि बास कर आता या भावनेतून विरोध करायला लागतात. विरोध करण्यासाठी कौतुकाच्या विरोधी म्हणजे शाहरूखवर टीका करू लागतात. मग ऋन्मेष हे त्यांना शाहरूखचा द्वेष करता असे म्हणतात. त्यामुळे लोक अजूनच वैतागतात. यावरून ते भाजपच्या आयटीसेल मधे ट्रेन झालेले आहेत हे सिद्ध होते.
मोदीजी एखादी हड्डी फेकतात आणि मग मोदीविरोधक त्यावरच चर्चा करत राहतात हे आपण बघतोच आहे. तीच टेक्नॉलॉजी ऋन्मेष वापरत आहेत. आता मोदीजींनी अमृतकाल ही हड्डी फेकली आहे. लोक त्यावर चर्चा करून अदानीचा घोटाळा विसरत आहेत. ऋन्मेष सुद्धा तेच करत आहेत.
अडाणी को कुछ नही बोलनेका ...
अडाणी को कुछ नही बोलनेका ... उसके पुट्स से साल का खर्चा निकल गया है...
सामना मी नक्की शाहरूखप्रेमी
सामना मी नक्की शाहरूखप्रेमी आहे की नाही
तिथे नराठीच्या धाग्यावर तर बोलत आहात की मी शाहरूखप्रेमाच्या नादात मराठी चित्रपटांवरच्या अन्यायाचे समर्थन करतो.
आणि ईथे उलटेच
एक काही तरी ठरवा
मी शाहरूख प्रेमी आहे की नाही?
जगभरातून १० दिवसांमध्ये पठाण
जगभरातून १० दिवसांमध्ये पठाण या चित्रपटाने ७२५ कोटी कलेक्शन केले आहे. यावर एक चाहता शाहरुख खान याला म्हणाला की, पठाण चित्रपटाचे रिअल कलेक्शन नेमके किती आहे?
यावर शाहरुख खान याने अत्यंत हटके पध्दतीने उत्तर देत लिहिले की, ५००० कोटीचे प्रेम, ३०० कोटीचे काैतुक, ३२५० कोटीचे हग्स, 2 अब्ज स्माईल…अजून सर्व कलेक्शन सुरूच आहे. शाहरुख खान याचे हे उत्तर अनेकांना आवडले आहे
सर, त्यातले २९९ कोटी, ९९ लाख,
सर, त्यातले २९९ कोटी, ९९ लाख, ९९ हजारचे कौतुक तर तुमचे एकट्याचेच आहे.
या निमित्ताने तुमचेपण कौतुक करतो. /s
ऋनमेष
ऋनमेष
पठाण वर लिहा काही तरी.
त्या सिनेमाचं सारांश लिहाच .
लोकांस कळू ध्या.
शारूख नी किती मस्त कथा लेखन केले आहे.
शरूख नी किती मस्त छाया चित्रण केले आहे.
Sharukh ni किती उत्तम संगीत दिले आहे.
Sharukh नी किती उत्तम दिग्दर्शन केले आहे.
असे पण sharukh च सब kuchh आहे.
बाकी सर्व gotya खेळ न्यासाठी च सिनेमाच्या लिस्ट मध्ये आहेत
हेमंत
हेमंत
अहो जर अपयशाची जबाबदारी आपण शाहरूखवर टाकतो. जेव्हा त्याचे चित्रपट चालत नव्हते तेव्हा, शाहरूख संपला आहे. त्याने सन्यास घ्यावा. त्याचे वय झाले. त्याने आता हिरोगिरी सोडावी. चित्रपट करणे थांबवावे वगैरे लोकं त्याला सल्ला देतात. तर आज त्याचा चित्रपट छप्परतोड कमाई करत आहे तर त्याला श्रेय देण्यात कसला कमीपणा..
आज यशात तुम्हाला लेखक दिग्दर्शक आणि ईतर तंत्रज्ञ आठवत आहेत. पण चित्रपट चालत नव्हते तेव्हा मात्र टिका एकटा आपला पठाण झेलायचा निधड्या छातीवर..
तर आज त्याने तीच छाती अभिमानाने मिरवली तर चुकले काय??
गंमत बघा.
लेखात मी आधीच हे लिहिले आहे
उगाच शाब्दिक छळ.
उगाच शाब्दिक छळ.
टॉप गन, मिशन इम्पॉसिबल हे टॉम क्रूजचे सिनेमे आहेत असे सहजपणे नेहमी म्हणले जाते. निक केज, जिम कॅरी ह्या अभिनेत्यांचे काही सिनेमे केवळ त्यांचे म्हणून ओळखले जातात. नोलन, स्कोरसेजी, tarantino ह्या दिग्दर्शकांचे सिनेमे केवळ त्यांच्या नावाने ओळखले जातात. आता पठाण शाहरुखचा सिनेमा आहे म्हणल्यावर काय इतर कोणी सिनेमावर काम केले नाही असा अर्थ अपेक्षित नसतोच. उगाच काहीतरी फालतू किस पडतात हेमंत सर.
पठाण वर लिहा काही तरी.
पठाण वर लिहा काही तरी.
त्या सिनेमाचं सारांश लिहाच .
लोकांस कळू ध्या.>> म्हणजे तुम्हाला इथे चकटफू स्टोरी वाचायची आहे.
त्यापेक्षा पिक्चर पाहुन या आणि एक नवीन धागा काढा ना माबोवर.
थिएटरमध्ये पठाण बघायला
थिएटरमध्ये पठाण बघायला आलेल्या लोकांपैकी रॅंडमली हजार लोकांना पठाणच्या कलालारांची नावे विचारल्यास किती लोकं त्याचा हिरो कोण आहे हे सांगतील आणि किती लोकं दिग्दर्शक कोण आहे हे सांगतील?
सेम हाच सर्व्हे अवतार सिनेमाबद्दल घेतला तर काय रिझल्ट येईल?
पठाण ज्या जातकुळीतला सिनेमा आहे तिथे तो किती सरस झाला आहे हे जरी पडद्यामागच्या तांत्रिक टीमचे श्रेय असले तरी पब्लिकला थिएटरपर्यंत खेचून आणायचा जलवा शाहरूखचाच आहे.
अर्थात तिथे मग चित्रपटात दम नसला तर तोही कामाचा ठरला नसता. सुरुवातीची हवा होऊन जोर ओसरला असता..
पण पठाण थांबायचे नावच घेत नाहीये कारण तो तितका चांगलाही आहेच.
तुम्ही कोणाला कन्व्हिन्स
तुम्ही कोणाला कन्व्हिन्स करताय? सगळी मायबोली कन्व्हिन्स होउन दशांगुळे वरती उरलीये.
नाव घेण्यासारखे शाहरुख चे
नाव घेण्यासारखे शाहरुख चे सिनेमे कोणते..कोणाला. आठवत आहे का?.
बाजिगर चे highlite दाखवायचे असतील तर जॉनी लिव्हर चे सीन च दाखवावे लागतात.
स्वदेश लोक कधीच विसरली त्या मध्ये खास काहीच नाही.
बाकी तर कोणते सिनेमे मला आठवत पण नाहीत .त्या सलमान चे खूप आहेत..
अजय चे खूप आहेत .
चक दे
चक दे
डर
दिल से
चेन्नई एक्स्प्रेस
आणि स्वदेश दुसऱ्या अभिनेत्यांनी सुध्दा उत्तम प्रकारे निभावला असता, नाही असे आजिबात नाही. पण शाहरुख ने मोहन भार्गव सुरेख रंगवला आहे. मला शाहरुख चे "ये जो देस है तेरा" मधले भाव अजून चांगले आठवतात.
स्वदेश लोक कधीच विसरली त्या
स्वदेश लोक कधीच विसरली त्या मध्ये खास काहीच नाही.
>>> rofl
कधी कधी वाटतं की प्रत्येक
कधी कधी वाटतं की प्रत्येक प्रतिसादाचे पैसे घ्यायला हवेत माबोने.
स्वदेश लोक कधीच विसरली >>> पण
स्वदेश लोक कधीच विसरली >>> पण तुम्ही नाही विसरला
Pages