वृद्ध आणि bedridden लोकांची काळजी घेण्याबाबत

Submitted by सन्ग्राम on 21 December, 2022 - 07:44

माझे एक वृद्ध नातेवाईक सध्या लास्ट स्टेज वर आहेत. मेंदु मध्ये गाठी झाल्यामुळे सध्या फक्त श्वास चालु आहे. काहीच रिस्पॉन्स देत नाहीत. गेले १० दिवस ICU मध्ये आहेत.
डॉक्टरांनी घरी घेऊन जायला सागितले आहे. पण घरी त्यांच्या पत्नीला काळजी घेणे जमणार नाहीय म्हणुन अजुन ICU मध्येच ठेवलंय.
So पुण्यात किंवा ठाण्यामध्ये एखादं केंद्र आहे का जिथे लास्ट स्टेज ला असलेले patients ठेवता येतात?
काही ओल्ड एज होम मध्ये चौकश्या केल्या पण ते नाही म्हणतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)डॉक्टरांनी घरी घेऊन जायला सागितले आहे.
२)घरी त्यांच्या पत्नीला काळजी घेणे जमणार नाहीये.

३)या दोहोंचा विचार करता सुचवेन की घरीच आणा आणि एक आया ठेवा.
४) डॉक्टरांनी आशा सोडलीच आहे तर त्यांची औषधे बंद करा आणि पुनर्नवादि काढा आणून दिवसा़त तीन वेळा एक एक चमचा द्या. हे रसायन आहे. साध्य रोग असेल तर तीन दिवसांत गुण दाखवायला हवा.

पुनर्नवादि काढा आणून दिवसा़त तीन वेळा एक एक चमचा द्या.
<<
गुरुजी,
'फक्त श्वास चालू आहे'
गिळण्याची क्रिया होत नसेल. नळीतून द्यायचा का काढा?

खूप आहेत.
दिवसाचा खर्च कमीत कमी २००० तरी असतो

भावनिक व्हायचे की व्यवहारी .
हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच.
.उत्तर कठीण असते.
त्यांची पत्नी पण वयस्कर च असेल आणि बाकी घरात कोणीच नसेल.
मूलबाळ नसतील,किंवा परागंदा झाली असतील .
तर अशा वेळी नातेवाईक ,हीत चिंतक पण कोणी नसते.

काका, विचारलेला प्रश्न स्वच्छ आहे. त्याचं उत्तर देता येत असेल तर द्या नाही तर इथून टळा. कृपया आणि धन्यवाद.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जवळ असेल तर तिथे comfort care बद्दल विचारा, शक्यतो कोणा सिनियर डॉक्टर किंवा councillor ना. Semi private ward / general ward मधे कमी खर्चात असा support मिळेल असे वाटतेय.

Humanity Street Near thane uthalsar
Cipla Pallative Care Warje Pune

दोन्ही ठिकाणी एकदा जाऊन परिस्थिती बघून मग decide करा .

दोन वर्षांपूर्वी माझ्या सासुबाई सोबत सुद्धा अशीच परिस्थिती आली होती. साबांचे सेन्सेस गेले होते, खाणे, शी-सू करणे समजत नव्हते तेव्हा आम्ही बारा तासासाठी आया ठेवली होती त्या 15 हजार रुपये घेत असत. त्यामध्ये त्या नळीतून लिक्विड जेवण देणे, इन्सुलिन, औषध देणे, डायपर चेंज करणे या गोष्टी करत होत्या.
तुम्हाला अशा प्रकारे कोणी मिळत असेल तर बघा. ठाण्यात रहात असाल तर आमच्याकडे ज्या मावशी येत होत्या त्यांचा नंबर देते पाहिजे तर.

बारा तासासाठी आया >>>> अश्याप्रकारची सुविधा माझ्या मैत्रिणीच्या वडिलांसाठी ते वापरत आहेत पुण्यात. तुम्ही पुण्यात असाल आणि अशी आया कामाला ठेवायची असल्यास हे या ब्युरोचं नाव आणि नंबर्स -
Care By Care Bureau Sister Ranjana
9112771154
9326592607

गिळण्याची क्रिया होत नसेल. नळीतून द्यायचा का काढा?

जेव्हा गिळण्याची क्रिया होत नसेल तेव्हा डॉ.नी नळी लावलेलीच असते त्यातून चहा ,दूध दिले जाते त्याबरोबरच द्यायचा काढा. पण हे आपण घरी आणल्यावर करायचे आहे. डॉ.कडे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असताना नाही.
हे प्रत्यक्ष केले आहे नातेवाईकांसाठी (९२). तीन दिवसांनी हालचाल सुरू झाली आणि पुढे नऊ महिने ते जगले व्यवस्थित.
(एकाच वेळी अनेक औषधे देणे टाळावे. काहीच उपयोग होत नाही. आता इतर उपाय नाहीत तेव्हा हे करू शकतो.)

Satyak nursing home
बाणेर, पुणे.

ठेवून घ्यायची व्यवस्था होत नसेल/ खूप महाग पडत असेल तर rmd यांनी सुचविले त्या प्रमाणे एखाद्या ब्युरो मधुन २४ तास अटेंडंट + गरज पडेल तेव्हा नर्स असे बघा असे सुचवेन.

दोन्ही पैकी कुठलाही पर्याय वापरत असाल तरी सर्वात पहिले काम म्हणजे अल्फा बेड (एअर बेड) विकत घ्या हनी कोंब डिझाईन वाला यात एक दिवस सुध्दा उशीर करू नका, बेड सोअर्स काही तासात होऊ शकतात बेड रिडन व्यक्तीला.

आम्ही portea ची सर्व्हिस वापरत आहोत गेली दोन वर्षे बाबांसाठी.
अटेंडंटसाठी (डायपर बदलणे / व्हीलचेअर मधून टॉयलेटला घेऊन जाणे, स्पंजिंग/अंघोळ घालणे, जखमेवर ड्रेसिंग करणे, चरबीतली (iV/iM नव्हे) इंजेक्शन्स देणे, जेवण भरवणे, वेळेवर सांगितलेली औषधे देणे ही कामे करणारा) महिन्याला २७ हजार (२४ तास) + त्याचे जेवण नाष्टा चहा. नर्स iV इंजेक्शन, कॅथेटर बदलणे आणि या वरचे कुठले काम असेल तर व्हिजिट प्रमाणे वेगळे पैसे. आम्ही जवळच्या एका हॉस्पिटलमधली स्वतःहुन सेवा पुरवणारी नर्स बोलावतो, ती व्हीजीट चे दोनशे रुपये घेते.
ब्युरो कडून या करता की अटेंडंट चांगला/ली वाटली नाही तर लगेच रिप्लेसमेंट मागता येते, आहे त्याला/तिला सुट्टीवर जायचे असेल तर ते आधी रिप्लेसमेंट पाठवतात.
ओळखीचे कोणी कमी पैशात मिळते पण मग अचानक एकदिवस आज येऊ शकत नाही, अचानक गावी जावे लागले वगैरे प्रकार झाला की पंचाईत होते.

अटेंडंट ठेवणे हा पर्याय चांगला आहे. शक्यतो ब्युरो कडूनच घ्यावा.
ठेवणार असाल तर येणार्या व्यक्तिचे आधार आणि पॅनकार्ड कॉपी मागून घ्या आणि जवळच्या नातेवाईक , शे जारी ह्यांनाही पाठवून ठेवा. एका दिवसासाठी जरी बदली माणूस आला तरी त्याचीही कागदपत्रे घ्या.
काय काय काम करायचे हे आधीच स्पष्ट बोलून घ्या.
जेवणाचे काय करणार हे ही ठरवून घ्या.

https://gericareindia.com/ इकडे एकदा बोलून बघा.

हॉस्पिटलमध्येच कुठलीही ट्रिटमेंट नको अशा फॉर्मवर सही करून नॉर्मल खोलीत ठेवण्याची सोय असते. माझ्या बहिणीला डोंबिवलीमध्ये एम्स हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. नळीतून बेसिक औषधे, ग्लुकोज द्यायचे, स्पंजिंग, बेसिक स्वच्छता ठेवायची आणि नर्स देखरेख करायच्या. डॉक्टर रोज बघायचे नाहीत. आपल्याला हवे तर बोलवायचे त्यांना. २०१७ मध्ये दिवसाला १५०० घ्यायचे हॉस्पिटल या सोयीसाठी.

सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या २४ तास attendant ची गरज आहे so सध्या पुण्यातच वर सांगितलेल्यापैकी एका मध्ये शिफ्ट करण्याचा प्लॅन आहे.

ठाण्यात हवे असेल तर माजीवड्याला ऋतू पार्कच्या रस्त्यावर आदित्य नर्सिंग होम आहे. ते अशा प्रकारची सेवा पुरवतात. दूरध्वनी : ९८१९३६२८३१

अर्थात घरी ठेवणे कधीही चांगले कारण ओल्ड एज केअरमध्ये 'दृष्टीआड सृष्टी' हा प्रकार चालतोच. घरचे कुणी मॉनीटर करणारे नसेल तर पेशंटकडे दुर्लक्ष होते.

घरी फक्त वृद्ध व्यक्ती असतील तर केअर टेकर ठेवताना त्याही बाबीचा विचार करा.
२४ तास केअर टेकर ठेवण्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतात.

संग्राम, धाग्याचे नाव बदलता का, जेणे करून नंतर हा धागा शोधणे सोपे होईल- वृद्ध व्यक्तीची काळजी असे काहीतरी add करा.

हे एक चांगले Palliative Care आहे असं कळलं म्हणून लगेचच इथे माहिती देते आहे. सन्ग्राम, इथेही विचारून पहा तुम्हाला उपयोगी वाटते आहे का? तुम्ही एखादे केंद्र शोधत होता म्हणून वाटलं की हे कदाचित उपयोगी पडेल.

Cipla Palliative Care & Training Centre
+91 20 2952 5444
https://maps.app.goo.gl/eRhruq1xBtTyZNR76

^^^^
कुणाकडून ऐकले आहे का सिप्लाबद्दल ?
इथे फक्त कॅन्सरचे शेवटच्या स्टेजचे रूग्ण ठेवले जातात अशी माहिती एका परिचितांच्या वेळी मिळाली होती.

फक्त कॅन्सरचे शेवटच्या स्टेजचे रूग्ण ठेवले जातात का कसं हे नाही माहिती. ते कदाचित विचारावं लागेल तिथे कॉल करून.

सिपलाला फक्त कर्करोगाचे रुग्ण ठेवतात.

तेच लिहायला आले सिप्ला कर्करोगांच्या रुग्णासाठी आहे.

संग्राम तुम्हाला व केअर गिवर्स ना शक्ती मिळो. माझे बाबा बेडरिडन होते तेव्हा मी घरीच आणले होते. दीड वर्श होते. युरिन ट्युब बदलणे, बेड सोअर्स चेक करणे व ट्रीट करणे भरवणे केले आहे. मी नोकरीस जात होते तेव्हा मावशी घरी येउन जाउन होत्या. पुढे आई पण महिना भर बेड रिडन होती जायच्या आधी. ते पुनर्नवाचे माहीत नव्हते नाहीतर केले असते.

Caretaker ठेवा किंवा care center मध्ये ठेवा ,सरासरी 20 ते 25 हजार महिना खर्च आहे.
ऑक्सिजन ची आवश्यकता असेल तर.
किती ltr दिवसाला लागेल त्या नुसार वेगळा खर्च असतो.
तो दिवसाला हजार रुपये तरी येतोच

हेमंत सर, नाही तिथे नाही ती अनावश्यक माहिती देऊ नका. तुम्हाला कित्ती कित्ती माहिती आहे ते ओतायला इतर धागे आहेत. इतर ठिकाणी कुणी टोकत नाही म्हणून कुठेही काहीही बरळू नये. या धाग्यावर जो प्रश्न विचारला आहे तेव्हढेच उत्तर द्या. उत्तर आले नाही तर कुणी मार्क कमी करेल म्हणून मला हे हे येतं असला आचरटपणा बास.