मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग

Submitted by मार्गी on 10 September, 2022 - 07:27

4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर

नमस्कार. आपण ठीक आहात अशी आशा करतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. अनेकदा आपण बघतो की, लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात (वस्तुत: कोणतंही मोठं सांगितलं जाणारं कारण हे एवढी मोठी गोष्ट करण्यासाठी नेहमीच किरकोळ असतं). कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे. केवळ मानसिक आरोग्याचे समस्याग्रस्त नाही तर आपण सर्व. विशेष समस्याग्रस्त (जसे ऑटीझम, मेंटल रिटार्डेड किंवा डाऊन्स सिंड्रोम असलेल्या व्यक्ती) ह्यांच्यापासून अगदी युवा विद्यार्थी आणि प्रत्येकासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. ह्या सायकल प्रवासामध्ये हा विषय व्यापक समाजापुढे ठेवला जाईल. मानसिक रोग, मानसिक समस्या आणि मानसिक विकलांगता असलेल्यांच्या समस्या ह्याबद्दल जागरूकता असणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर अशा व्यक्तींना आवश्यक ती मदत दिली जाऊ शकते. सर्वसामान्य लोक- शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्व ह्यांच्यासोबत संवादातून ह्या सायकल प्रवासात ह्याबद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा विषय सर्वांचा आहे. सायकलिस्ट सामाजिक संस्था, समूह व लोकांसोबत बोलेल व स्थानिक पातळीवरील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करेल. तो साधी- सिंगल गेअर एसएलआर सायकल वापरेल. त्यामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे की, प्रत्येक जण स्वत:ची क्षमता वापरून उपलब्ध साधनाद्वारे अशी गोष्ट करू शकतो.

मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सायकलिंग

मानसिक भलायकेची जागृताय करपा खातीर सायकल चलोवप

ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಜಾಗೃತಿಗಾಗಿ ಸೈಕ್ಲಿಂಗ್

మానసిక ఆరోగ్య అవగాహన కోసం సైక్లింగ్

हा रूट का?

कारण मुख्य प्रवाहात नसलेल्यांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. सुरुवातीला सायकलिस्टने मुंबईमधील संस्थांसह राईड सुरू करण्याचा विचार केला होता. परंतु महाराष्ट्रातील शहरांमध्ये ह्याबद्दल थोडी तरी जागरूकता आहे. त्यामुळे सर्वाधिक वंचित व दूर राहिलेला प्रदेश का न घ्यावा असा विचार केला. त्यासह ह्यातील मुख्य मॅसेज कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाणे, आपल्या मानलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाणे आणि अपरिचिताबद्दल संवेदनशील होणे हा आहे. त्यामुळे हा सायकल प्रवास कोंकणातील कुडाळमध्ये सुरू होईल व नंतर गोवा, कर्नाटक, तेलंगणा व पुन: महाराष्ट्राच्या दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा त्यात समावेश असेल.

जर आपल्याला कुडाळ- गोवा- बेळगावी- बागलकोट- कोल्हार- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर ह्या रूटवर काम करणारी संस्था माहिती असेल किंवा आपले कोणी परिचित ह्या रूटवर असतील तर हा मॅसेज त्यांच्यासोबत शेअर करू शकता. ह्या प्रवासाची सुरुवात २४ सप्टेंबरला होईल आणि तो साधारण १४ ऑक्टोबरला नागपूरला संपेल.

सायकलिस्टविषयी

निरंजन वेलणकर, ३७ ह्याने लदाख़ आणि स्पीतिसह अनेक सोलो सायकल मोहिमा केल्या आहेत. त्याने महाराष्ट्रामध्ये आरोग्य व एचआयव्हीबद्दल जागरूकतेसाठी आणि योग व ध्यानाच्या प्रसारासाठीही सायकल प्रवास केले आहेत. त्याचा ब्लॉग- http://niranjan-vichar.blogspot.com/2022/09/solo-cycling-for-mental-heal... 09422108376 niranjanwelankar@gmail.com

Group content visibility: 
Use group defaults

सर्वांना नमस्कार. ह्या मोहीमेचा दिवस 4 पूर्ण झाला. कुडाळ- गोवा (बिचोलिम) 72 किमी, नंतर बिचोलिम- बेळगांव 89 किमी, नंतर बेळगांव- लोकापूर 107 किमी व आज लोकापूर- बागलकोट- कोल्हार 71 किमी राईड झाली. अतिशय जबरदस्त अनुभव मिळतोय. साध्या सायकलीवरही सह्याद्रीतला चोरला घाट बराचसा चढता आला. सायकलीने खूपच छान साथ दिली आहे. वाटेत अनेक संस्था- ग्रूप्स व लोक भेटत आहे. खऱ्या अर्थाने incredible India चा अनुभव येतोय. खूप लोकांशी संवाद साधता येतोय. शक्य होईल तसे अधून मधून अपडेटस देईनच. धन्यवाद.

सर्वांना नमस्कार. ह्या सायकल प्रवासाचे 9 दिवस पूर्ण झाले. 9 दिवसांमध्ये साधारण 785 + किमी झाले. आज हैद्राबादला पोचलो. अनेक ठिकाणी विद्यार्थी, शाळा, वेगवेगळ्या संस्था व अन्य लोकांसोबत भेटी व चर्चा होत आहेत. अजून 9 दिवस बाकी आहेत व 11 ऑक्टोबरला नागपूरला सायकल प्रवास संपेल. सर्वांना धन्यवाद.

सर्वांना नमस्कार. आज 14 व्या दिवशी गडचिरोलीतल्या एका लहान गावात पोचलो. आज 63 किमी झाले व 14 दिवसांमध्ये 1115 kms. न राहवून हे शेअर करावसं वाटलं-

What a great exeprience I am having. Incredible India! So many people enquire about me. They care also. They are touched by this cycling. Even two wheelers stop and talk to me. One auto riksha person asked me whether I had my breakfast. I told I had, but still he stopped and told me to stop. I thought he may take selfie like so many others. But he gave me 100 ₹ note and told to use it for next breakfast. Even in Sironcha one friend gave me 500 ₹ as contribution. I suggested he can give it to some needy children or other organization. But he insisted that he wanted to share my cause. I feel just speechless. This warmth, affection and attachment. INCREDIBLE INDIA. And magic of cycling.

सर्वांना नमस्कार. सिंधूदुर्ग- गोवा- कर्नाटक- तेलंगणा- गडचिरोली- नागपूर हा सायकल प्रवास आज पूर्ण झाला. १८ दिवसांमध्ये साधारण १४४२+ किमी पूर्ण झाले. ह्या प्रवासामध्ये मदत व सोबत करणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ह्या प्रवासात खूप वेगळे अनुभव आले. विद्यार्थी व मुलांसोबत माझा फिटनेसचा आनंद शेअर करता आला व व्यायाम व मानसिक आरोग्याबद्दल त्यांच्यासोबत शेअरिंग करता आलं. ह्या प्रवासात सोबत असलेल्या सर्व संस्थांना धन्यवाद. त्याबरोबर निसर्गालाही धन्यवाद. आणि ज्या सायकलने सर्व खड्डे, धक्के सहन केले व विलक्षण म्हणजे इतक्या अंतरातही तिचं पंक्चर झालं नाही, तिलाही धन्यवाद. लवकरच ब्लॉगमध्ये अनुभव लिहेन. धन्यवाद.

अभिनंदन!
काल जागतिक मानसिक आरोग्य दिन होता. ते कळल्यावर तुमच्या या यात्रेची आठवण झाली.

७ ऑक्टोबरचा लिहीलेला अनुभव फारच सुंदर. आपण अपेक्षाही करत नसताना लोकांचे असे प्रतिसाद मिळणं किती छान वाटत असेल!
जमेल तेव्हा सविस्तर अनुभव जरूर लिहा इथे. वाचायला आवडतील.
तुमचे हार्दिक अभिनंदन.

पण सायकलिंग करून मानसिक आरोग्याची (किंवा कुठलीही) जागरूकता कशी होईल, ते काही मला कळलं नाही.
नवीन Submitted by उपाशी बोका on 12 Oct//

+१००
मलाही ते काही कळलं नाही. आधी मला वाटलं लेखकाच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याला सायकलिंगमुळे कसा boost मिळाला असं काहीतरी असेल.

वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!!

@ उपाशी बोका जी, जागरूकता एका भेटीत किंवा एका कार्यक्रमात होणं अपेक्षित नसतं. ती तशी होत नसते. पण सायकलिंगच्या माध्यमातून एक विषय व एक विचार घेऊन लोकांशी संवाद करता येतो. मी ज्या ज्या संस्थांना भेटी देत होतो, तिथे ह्या निमित्ताने नवे लोक येत होते. त्या त्या संस्थांसोबत नवीन लोक जोडले जाऊ शकत होते. आणि विद्यार्थी व युवकांसमोर मी शारीरिक आणि मानसिक फिटनेसचं एक उदाहरण समोर ठेवू शकलो. त्यांना अशा चांगल्या गोष्टीचं एक्स्पोजर देण्याचं समाधान मला मिळालं.