न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई
०५)झक्की
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा
०९)अमृता
१०)सायो
११)चमन
१२)रूनी पॉटर

आणखी कोणी येणार आहे का?.

आजच करते दहीवडे. शेंबुड पुसलेल्या हातांनी चविष्ट होतील Lol तोवर तुम्ही नकाशे आणि रस्ते ह्यांचा अभ्यास करा Proud

ते रडं आवर नी फचिनबरोबर दहीवडे पाठवायची व्यवस्था कर. तूच आलीयस असं समजून आम्ही त्याचा आस्वाद घेऊ.

माझ्यापेक्षा अमृताला जास्त सोपे आहे तिच्याकडून घेऊन येणे...

तूच आलीयस असं समजून आम्ही त्याचा आस्वाद घेऊ
>> हो ना, नाहीतरी ती स्वतः दहीवडे खात नाही म्हणाली. मग तिथे येऊन काय करणार? त्यापेक्षा अमृताबरोबर पाठवून दे... Proud

फचिनमामा, तुम्ही भारतातून आणलेला खाऊ घेऊन या. (बर्फ्या, लाडू, पेढ्यात गम्य नाही. तेव्हा चिवडा, चकल्या, बाकरवड्या, वाळवणं-तळून असे सगळे पदार्थ आणालच म्हणा!)

आजच करते दहीवडे. शेंबुड पुसलेल्या हातांनी चविष्ट होतील >>> तुम्ही कोणी अनिल अवचटांच्या 'स्वतःविषयी' मधील दहीवडे आणि शेंबडाच्या रोळीचा किस्सा वाचला नाहीये का ? की दहीवडे करायला लागू नयेत म्हणून सिंडीने हे जालीम वाक्य टाकले आहे Proud

तिने कितीही जालिम वाक्य टाकली तरी आम्ही वडे खायला तयार आहोत..

फचिन बाळा... नेहेमी खायला जातोस ना? मग आणायला पण जा बर Wink

पण सिंडी, ती रिलिजची तारीख पुढे ढकल न गडे...

आता येवढा डायरेक उल्लेख केल्यावर दही वडेच काय आजुन काहीही पाठवलं तरी विचार आल्याशिवाय राहणार आहे का?
असो, अरे पदार्थांची लिस्ट ही द्या की. मीच लावतो.

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - चिकन
०९)अमृता
१०)सायो
११)चमन
१२)रूनी पॉटर

काश, हम भी कह सकते.. शिट्टीवालो, सिर्फ तशरिफ लाओ. बेटर लक नेक्स्ट टाईम. Proud

अमॄता... संख्या वाढली तर पा. आ. नाही... मोजकीच लोकं आली तर पा. आ... Happy

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पा आ)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - चिकन
०९)अमृता - (द. वडा?)
१०)सायो
११)चमन
१२)रूनी पॉटर (गरमरंपा)

विकु
तुम्ही माबोवरच येत नाही नेहमी तर मग विचारपूस तरी कशी बघणार नियमित त्यापेक्षा माबोवरून इ-मेल करू तुम्हाला. तेवढा इमेल आयडी मात्र चेक करत जा नेहमी.

मोजक्या लोकांमधे मला धरा बाकिच्यांना ठेंगा Proud

माझ्या मेनुसमोर '?' असुदे.. सिंडी आली तर मग मी फक्त 'तशरीफ' घेउन येइन.. Wink

खालील लोकांना नम्र विनंति: कृपया येण्याचे करावे:
लालू, अडम (सौ. सह) पन्ना, सिन्डी , विजय, बो-विश , अजय.
तसेच इतरहि बा. रा. कर, व इतर लोक (भारतातले सुद्धा) जे इथे अधून मधून येतात, त्यांनाहि नम्र विनंति की यावे.

सिंडी, ते रिलीज वगैरे एव्हढे काही महत्वाचे नसते हो. जरा एक दिवस उशीर झाला तर काsही फरक पडत नाही. हे स्वानुभवारून सांगतो.

तिकडे अफगणिस्तानला सैन्य पाठवायचे तर ओबामानि किती दिवस घेतले! मग एक दिवसानी काय होणार आहे त्या रिलीजच?

आणि माझे कागद नेले होते त्याचे काम झाले का? रिलीज वगैरे संपल्यावर केले तरी चालेल.

Pages