न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्की काय कविता पाडता हो हल्ली भराभर ..

कुणि देव म्हणतात कुणि दगड
सगळे मानणार्‍याच्या मनावर

जर मनापासून भक्ति असेल तर रंपाही तीर्थ होईल
पण जर भक्तीच नसेल तर तीर्थीचेही रंपा होईल

वाह उस्ताद, वाह!

>> पण जर भक्तीच नसेल तर तीर्थाचेही रंपा होईल

याचं प्रात्यक्षिक कोणी करून दाखवणार आहे का २३ तारखेला? Proud

मी चुकून ते करीना वाचलं. मला वाटलं, भक्ती (बर्वे) नाही तर करीना (कपूर) चालवून घ्या असं काहीस म्हणताहेत. Proud

या वेळी मी सॅम अ‍ॅडॅम्स किंवा कूअर्स लाईट आणणार आहे. कारण मला करोना आवडली नाही. करिना कपूर कोण, बाप्या की बाई हे माहित नाही. प्रत्यक्ष भेटल्यावर आवडो ना आवडो, रितीप्रमाणे नमस्कार तर म्हणावेच लागेल.

२३ सोडुन बाकि तारखेंना हॉल नाहीये न उपलब्ध.. दुसरीकडे कुठे नाही का करता येणार?
(मी आहे २३ ला, माझ्या शिट्टीसखी साठी विचारते आहे.) Happy

का ?

अरे मीच आता कन्फूस्ड झाली आहे. Sad हॉल बुक करायचा आहे का नाही २३ ला? एकदा चेक पाठवला की अडकलो ना आपण ! किती लोक तयार आहेत नक्की ? आधी २३ चे विचारले तेव्हा २-३ लोक फक्त कन्फर्म्ड हो म्हणाले म्हणून मी पाठवला नव्हत चेक.

मलाही. अगदी हॉलमधेच भेटायला हवं का? अव्हलेबिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर कुठे दुसरीकडे भेटता येऊ शकतं का आपल्याला? (देऊळ वगैरे सोडून...)कबूल आहे की हॉलमध्ये मोकळेपणा जास्त मिळेल. रेस्टॉरंटमध्ये वगैरे निघायची घाई...

हॉलच चालला. चांगले हाल होतात तिकडे.. मी तेव्हा पण हो म्हणालो होतो... आता पण म्हणतोय.. Happy

झक्की... करीना कपूर तुम्हाला दिसणार नाही. शुन्य मापाचे कपडे घालते म्हणे.. म्हणजे काय देव जाणो...

Proud

अरे त्या सिंड्रेलाला येता येईल अशी तारीख ठेवा रे... नाहीतर पुढचे सहा महिने सगळ्यांना ऐकवत राहील की मी इतकं छान दही वडे करणार म्हणाले होते तर तुम्ही तारखेचा घोटाळा केलात.. Proud

पराग, तू सहकुटूंब ये आता जीटीजीला..

मला २३ पण चालेल, ३० वगैरे पण चालेल. तारीख ठरवा!!

२३ मला नक्की चालणार नाहीये. पण बाकीच्या चालतीलच याची खात्री नाही. त्यामुळे तारीख बदला असे मी म्हणणार नाही. Happy

त्या सुमारास माझा भारतात जाण्याचा प्लॅन आहे. २४ चं नेवार्कहून तिकिट निघालं तर एवेएठीला येणं जमेल.

फचिन, सिंडीला दहीवडे घेऊन येता नाही आलं तरी हरकत नाही . तू येता येता वाकडी वाट करुन तिच्याकडे जा नी बारात घेऊन ये. Wink

Pages