कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - असामी

Submitted by असामी on 9 September, 2022 - 12:51

आता ह्या किस्याला मोरपिशी का म्हणायचे हे सगळे रामायण वाचले कि कळेल.

इंजिनरींग ला फर्स्ट ईयर मधे मोदकात सारण भरतात तसे पोरांच्या डोक्यात काहीही असंबद्ध कोंबायचा काळ होता तो. उदाहरणार्थ : कॉम्प सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स च्या पोरांना वर्षभर वेल्डींग, स्मिथी , कारपेंटरी शिकवून वात आणत. त्यात पास झाले नाही तर लाल शिक्का मारत असत . आता कॉम्प सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स च्या पोरांनी झाडाच्या फळ्या कापून, तासून त्याला भोके पाडून मदरबोर्ड बनवावा, त्याला तापलेल्या मेटल ला वेल्ड करून सर्कीट बनवावे नि मग पुढे काय करायचे ते स्पेशलायझेशन करावे अशी माफक वगैरे अपेक्षा होती का हे माहित नाही. असो.

त्यातला स्मिथी ह्या प्रकारामधे एक ग्रूप प्रोजेक्ट होता . मेटल चे दोन तीन तुकडे कापायचे नि मग लालभडक होइतो भट्टी मधे तापवायचे . सेमी मोल्टन स्टेटला आढून, भट्टीत घातलेले ते तुकडे चिमट्याने काढून ऐरणीवर घेऊन हातोड्याने घाव घालून प्रश्न चिन्हाचा आकार द्यायचा नि काहीतरी साखळी का काय तरी बनवायची असे. दोनदा तीनदा भगिरथ प्रयत्न करूनही आमचे फायनल प्रॉडक्ट काही होईना. प्रश्नचिन्ह सोडून सगळी चिन्हे बनत होती. साखळी फारच पुढची स्टेप होती. (त्याचे खरे कारण त्या दिवशी कुठली तरी मॅच होती नि एक जण खिशात रेडियोवाला वॉकमन ठेवून तिथून कानात ईयरबड जोडून कॉमेंट्री ऐकत होता नि सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडू, पक्षी: कॉमेंट्री कडे, होते)

शेवटी इंस्ट्रक्टर वैतागून आमच्या स्टेशनवर आला. त्याच्या देखरेखीखाली आम्ही हे करायचे होते नि त्याला मोकळे करायचे होते. पावसाळ्याचे दिवस होते त्यामूळे तो पायामधे बाटाचे ते पावसाळी सँडल असत ते घालून होता. तुकडे गरम होत असताना मी पाठी सरकून वॉकमन वाल्या मुलाच्या बाजूला उभा राहून थोडासा त्याच्याकडे झुकून स्कोअर ऐकायचा प्रयत्न करत होतो. त्या प्रकारामधे मी एव्हढा दंग झालो होतो कि मेटल किती गरम झाले , समोर काय सुरू आहे इत्यादी फुटकळ गोष्टींकडे फारसे लक्ष नव्हते.

इंस्ट्रक्टर ने एकाला तुकडे बाहेर काढायला सांगितले , त्याने ते करून ऐरणीवर ठेवले. एकदम इंस्ट्रक्टर ने मोर्चा आमच्याकडे वळवला नि पुढे बोलावले. वॉकमन वाल्याला त्याच्यावर घाव घालायला सांगितले नि मला ते तुकडे पकडून ठेव सांगितले. वॉकमन वाला पटकन पुढे झाला , त्याने हातोडा घेतला नि मला मानेने 'm ready असा इशारा केला. मी स्कोरच्या तंद्रि मधे पुढे येइतो मेटल चे तुकडे लाल भडक वरून नॉर्मल कलरला आले होते. कोणाला काही रजिस्टर व्हायच्या आत मी हाताने एक तुकडा उचलून अ‍ॅडजस्ट करायला गेलो . पाव- अर्धा सेकंद काय वेळ गेला असेल पेन रजिस्टर होईतो नि मी सरळ हातातून तो तुकडा सोडून दिला. मधे मी हाताने तो तुकडा उचलतोय हे बघून इंस्ट्रक्टर मला थांबवायला पुढे सरकला होता. तो मी हातातून सोडलेला तुकडा थेट उभाच्या उभा त्याच्या सँडल वर पडला -अंगठा नि मधल्या बोटाच्या गॅप मधे जिथे सँडल चा स्ट्रॅप असतो तिथे. तो अशा टेंपरेचरला होता कि सँडल ला चिकटला नि ते रबर प्लॅस्टिक जे काही असते ते वितळले नि तुकडा बर्‍यापैकी आर पार गेला. त्याची बोटे नि सँडल हे होमो जिनियस पीस असावा टाईप मधे चिकटले.

अर्थात आम्हाला दोघांनाही व्यवस्थित मेडीकल ट्रीटमेंट मिळाली. नंतर काही दिवस मोरपिसासारखे काळे हिरवे नीळे झालेले तर्जनी नि अंगठा घेऊन मी नि काळा हिरवा नीळा झालेला पाय घेऊन तो इंस्ट्रक्टर , आम्ही दोघेही एकमेकांची तोंडे चुकवत फिरत असू. पण मह्त्वाचा भाग असा कि आमच्या पूर्ण ग्रूपला स्मिथी पास मार्क करून पुन्हा ह्या बिल्डींग मधे फिरकायचीही गरज नाही असे सांगून मोकळे केले. तो मोकळा वेळ आम्ही कॉलेज बाहेर चे कॉमर्स कॉलेज, कँटिन, जिमखाना अशा मनोरंजक जागांवर सत्कारणी लावून वेगवेगळी पीसे गोळा केली Lol

अवांतर : चेन सॉ वगैरे प्रकार हाताळायला नसल्यामूळे कारपेंटरी च्या वेळी टेक्सास चेन मॅसॅकर नि वेल्डींग वाल्यांनी प्रॅक्टीकल ऐवजी डेमाँस्ट्रेशन अशा स्वरुपात आम्हाला शिकवल्यामूळे मॅड मॅक्स मधला तो वेल्डींग चा वेपन म्हणून वापर करणारा मॅक्स हि दोन मोरपीसे जमा न होता आमचा लांडोर झाला. (चाणाक्ष वाचक सध्याच्या माबो च्या काळाला सूटेबल म्हणून रघू झाला असे म्हणू शकतो)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol भारी पीस आहे Wink
मनोरंजक जागांवर घालवून वेग वेगळी पीसे गोळा केली >>> हा पिसारा आला इथे तरी चालेल असाम्या Proud

Lol चांगले आहेत मोरपीशी दिवस.

हायला आता हसायला येते.. पण वाईट झालेले फार Proud
मला त्या स्मिथीच्या गरम भट्टीजवळच जावेसे वाटायचे नाही. तरी एक बरे, या वर्कशॉपमध्ये आम्हाला कोणी काही करायला लावायचे नाही. ते मामाच ऑफिशिअली सर्वांचा जॉब फायनल करून द्यायचे.

तसे ईतर जॉबही त्या त्या वर्कशॉप मामांशी सेटींग लावली की होऊन जायचे ती गोष्ट वेगळी. ते लोखंड तासून मेल फिमेल बनवायचे त्याला काय म्हणतात. ते मी असेच बनवून घेतलेले. त्या मामांकडे ड्रॉव्हरमध्ये बनवून पडलेले असतात. तेच ते देतात. आपण थोडे घासल्याचे नाटक करून सबमिट करायचे. अर्थात मी हे डिप्लोमाला केलेले, डिग्रीला नाही. तेव्हा डायरेक्ट सेकंडला मिळते ना अ‍ॅडमिशन..

बाकी वर्कशॉपमध्ये कानाला ट्रान्झिस्टर लाऊन कॉमेंटरी ऐकल्याच्या आठवणी माझ्याही फार आहेत.. Happy

वर्कशॉपमध्ये आम्हाला कोणी काही करायला लावायचे नाही. ते मामाच ऑफिशिअली सर्वांचा जॉब फायनल करून द्यायचे.>>>> सेम

मी हे डिप्लोमाला केलेले, डिग्रीला नाही. >>> हे पण सेम.

(ऐरणीच्या) देवा >> Lol

क्रिकेटचा नाद बराच जुना दिसतोय >> अरे लग्नात मंगलाक्षता सुरू असताना आपल्या कलकत्त्या च्या २००१ वाल्या कसोटीचा स्कोअर विचारला होता म्हणून गुरूजीनी झापले होते Lol तरी बरं, सत्य नारायणाच्या वेळी पूजा सांगणारे स्वतःच मधे विचारत Wink

हायला आता हसायला येते.. पण वाईट झालेले फार >> हे खरय ! ती दोन बोटे किती ठिकाणी कामाला येतात हे हे तेंव्हा लक्षात आले नि आपण कसे बिचार्‍यांना गृहित धरून चालतो हे लक्षात आले Wink

वर्कशॉपमध्ये आम्हाला कोणी काही करायला लावायचे नाही. ते मामाच ऑफिशिअली सर्वांचा जॉब फायनल करून द्यायचे. >> हे असे करणे डीग्रीला तरी फाऊल धरले जाई नि अजून जास्त असाईनमेंट करायला लागत .

रमड, बायको त्याच पीसांचा कुंचा करून झाडेल Happy

बापरे!

बाहेरचे कॉमर्स म्हणजे खालसा का?

भारी किस्सा आहे. होपफुली तुझे हात आणि त्या इन्स्ट्रक्टरचे (तू धरायला हवेत असे) पाय - दोन्हीला लाँग टर्म काही त्रास नाही.

बाय द वे, हे सगळे स्कोअर ऐकायच्या ऐवजी एखाद्या सुंदर ई. मुलीकडे टक लावून बघत बसल्याने झाले. "तिने त्या दिवशी निळ्या रंगाची..." वगैरे असे काहीतरी करून या किश्श्याचे मोरपिशीकरण करू शकला असतास.

आई ग्ग्! डेंजर. मला, मी आणि माझ्या मैत्रिणीने वेल्डिंग करताना गॉगल न चालता केलेला दिडशहाणेपणा आणि रात्री आई मला काही दिसत नाहीये असं रडत घरच्यांच्या तोंडचं पाणी पळवले होते ते मोरपिस आठवले‌ Happy

इथे आहे होय जाळलेल्या मोरपिसाचा संदर्भ! महान मोरपीस आहे. Happy
>>ती दोन बोटे किती ठिकाणी कामाला येतात हे हे तेंव्हा लक्षात आले नि आपण >> ही बेकरी नाही! Proud

अरे मी पेन पकडणे, किल्लीने कुलूप उघडणे , हाताने जेवणे इत्यादी बद्दल बोलत होतो रे. तू भलतीच मोरपीसे उपटत आहेस Lol

<< बाय द वे, हे सगळे स्कोअर ऐकायच्या ऐवजी एखाद्या सुंदर ई. मुलीकडे टक लावून....>>
इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सुंदर मुलगी Lol

खतरनाक किस्सा आहे+१
मी फर्स्ट इयरला असताना सोल्डरिंग गन तापली आहे की नाही हे हात लावून बघितलं होतं Proud (सुदैवाने नव्हती तापलेली)

<<<आम्ही कॉलेज बाहेर चे कॉमर्स कॉलेज, >>>
COEK चे मा. विद्यार्थी की काय ?

बाकी हे मोरपीस (भलत्याच अर्थाने ) रंगीत निघाले...

मस्त लिहिलंय, किस्सा पण भारी.

नको ते विषय असण्यावरून आठवले:

आम्हाला इलेक्ट्रिकल इंजिीअरिंगमध्ये मेकॅनिकलचे बरेच विषय होते. त्यात सगळ्यात जास्त वैताग बॉयलर्सने आणला होता. एकेक बॉयलर शिकवायचे आणि शेवटी "This boiler is now obselete since it's efficiency is very low." असे सांगायचे. अरे मग कशाला शिकवता ते ही आम्हा इलेक्ट्रिकल वाल्यांना असे सरांना ओरडुन विचारावेसे वाटायचे, शेवटले वाक्य ऐकले की.