... आणि सूर्य लाजला!

Submitted by छन्दिफन्दि on 8 September, 2022 - 00:27

मी पहिल्यांदाच जुहू चौपाटी वर गेले होते. चौपाटी वरची भेळ सुप्रसिद्ध. चहुकडून येणाऱ्या भेळेच्या वासाचा आस्वाद घेत आम्ही वाळुवर बसुन समुद्रावरून येणारा खारा वारा खात समोरचा विलोभनीय सूर्यास्त बघत होतो. लाल बूंद तो तेजाचा गोळा, सोनेरी आकाश , त्याने त्या विशाल समुद्रालाही आपल्या रंगात न्हायला घातलं होत जणू! तेवढ्यात तेथे ३-४विशाल महिला आणि त्यांची ४-५ मुलं आली. त्यांनी आपल्या बरोबर आणलेली चटई अंथरली. ते समुद्राकडे पाठ करुन गोल बसले. पटापट बरोबरच्या पुड्या सोडल्या आणि जोर जोराने गप्पा हाणत खायला सुरुवात केली. त्यांची अरसिकता बघुन आम्ही तर अचंबित झालोच पण समुद्रालाही उंचबळून आलं. आणि साक्षात् सूर्याने तर ती उदासिनता बघुन समुद्रात डुबकीचं घेतली. ????????????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच जज करणं वाटलं हे. ते जर एकमेकांचा सहवास म्हणून आले असतील तर तुम्ही कोण त्यांना अरसिक ठरवणार? इन दॅट केस रोजच सूर्य मावळतो, तुम्ही बघता का? सुर्योदयही? मग तुम्हीपण रोज अरसिकच ठराल की.
सॉरी पण अजिबातच पटलं नाही हे असं जज करणं. प्रत्येकाची गरज, अपेक्षा वेगवेगळ्या.

नवीन Submitted by अवल on 8 September, 2022 - 02:07 >>>>>. स ह म त