कथाशंभरी२- (अप)घात-शर्मिला आर.

Submitted by SharmilaR on 6 September, 2022 - 08:32

कथाशंभरी-२- (अप)घात

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि..


साहेब आणी मॅडम अचानक कार अपघातात गेले, तेव्हा पासून बंदच होतं ते घर.

परदेशात असलेला त्या घरातला मुलगा परत येईपर्यंत तरी ते घर कुणी उघडायची शक्यताच नव्हती. तो त्याच्या आऊटहाऊसच्या पायरीवर बसला.

नेहमी रघूच चालवायचा ती कार. आदल्या दिवशी त्याने ती मेकॅनिक कडे नेऊनही आणली होती. पण त्याच्या अचानकच्या प्रचंड सर्दीमुळे तो गेला नाही कारवर...

नवीनच लागलेल्या तपकिरीच्या सवईने, त्याचा हात खिशाकडे गेला..

मध्येच थबकून त्याने मनगटाचा वास घेतला. मॅडम साहेबांना म्हणत होत्या तसा (तेवढं इंग्लीश त्याला कळलं होतं..) त्याच्या शरीराचा वास येतो का ते बघायला..
*****************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

या रघूने गाडीचे ब्रेक फेल केले वाटते.
रघूला एकूण भलताच ड्यांबिस माणूस करून टाकले आहे बहुतेकांनी Happy

छान.
‘अंगाला वास’ या संदर्भामुळे पॅरासाइट चित्रपटाची आठवण झाली

धन्यवाद मैत्रेयी, स्वाती.
‘अंगाला वास’ या संदर्भामुळे पॅरासाइट चित्रपटाची आठवण झाली>> हो. तेच डोक्यात होतं लिहितांना.

छान.