तमिळनाडूचा इतिहास भाग - ५

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 3 September, 2022 - 17:26

तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली.

मी विचारलं- “आणी ब्राह्मण?”

तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत. सगळे तमीळ एका बाजूला नी तैम्ब्रेम एका बाजूला.”

“परंतू, ऊत्तर भारतात सवर्णांत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य सगळे येतात”

“ऊत्तर भारत आर्यावर्त आहे, जिथे आर्य राहतात, आर्यात ते असेल पण हा द्रविड भाग आहे.”

“कसा आर्यवर्त? वैदिक काळातील? मागच्या दोन हजार वर्षात तर कधीही आर्यवर्त नव्हता.”

“तरीच आर्य थेअरीवर ऊत्तर भारतीय तूटून पडलेत”

“म्हणजे?”

“त्याना वाटलं की ते युरोपीय वंशाच्या समकक्ष म्हणवले जातील, तुम्हाला असे ब्राम्हण मिळतील की जे स्वतला आर्यपुत्र म्हणवतील नी आर्यवर्ताची कल्पनाही करत असतील.”

“पण हा आर्य वंश मॅक्समूलरची देणगी आहे”

“कुणी विरोध केला का? डिबेट तर हा आहे की आर्य भारतातीलच आहेत की भारताबाहेरून आलेत? आर्य वंश नसण्यावर काही चर्चा होते का?”

“हे शक्य आहे की हजारो वर्षांची मुस्लिम राजवट आणी मग ब्रिटीश राजवटीत राहून ह्या “आर्य” शब्दाने त्यांचा काॅन्फिडंस वाढवला असेल.”

“अचूक, बाॅंम्बे आणी कलकत्तातील प्रेसीडेंसीचा ब्राम्हणांनी तर ह्याचं स्वागत केलं. टिळकांनी आपल्या पुस्तकात मॅक्समूलरचे मनापासून आभार मानलेत, आणी त्यांच्या अनूवादीत रूग्वेदात संदर्भ वापरलेत.”

“पण ईग्रजांनी स्वतला भारतीय वंशासमान का मानलं? त्याआधी तर ते स्वतला श्रेष्ठ मानायचे.”

“हा १८५७ त्या क्रांती नंतरचा मास्टरस्ट्रोक होता. पहीले हे की भारतातील शूद्र समाज आर्यांपासून वेगळा झाला. दुसरा हा की दक्षीण द्रविड समाज त्यांच्याहून भिन्न झाला. मुसलमान तर आधीच वेगळे होते. भारत चार विभागात विभागला गेला, मग काय लढला असता?”

“भारत तर विभागलेलाच होता, ब्राम्हण तर शूद्रांना आधीही ऊंबर्यात ऊभे करायचे नाही”

“तो दोष युरोप नी अमेरीकेत सुध्दा होता, ईंग्लंड च्या सध्याच्या राजघराण्याची गोष्ट ऐकतच असतो. फिरंग्याहून वंशभेदी जगात कुणी झाला का? बंगालचे मुख्यमंत्री डाॅ. बीसी राॅय ना अमेरीकेत एका गोर्या वेट्रेसने जेवण वाढायला नकार दिला होता.”

“हम्म…. ऊत्तरेतील ब्राम्हण स्वतला आर्य म्हणू लागले मग तमीळ ब्राम्हणांनी काय केलं?”

“त्यांनी काय केलं असतं? ते तीन टक्के होते. तिथे ९७ टक्के द्रविड होते, जर ही ईंग्रजांची आर्य-द्रविड थेअरी आली नसती तर ते त्यांच्यासाठी चांगलंच होतं. ते भारतातील सर्वोत्तम बुध्दीमानांतील एक होते.”

“होते म्हणजे?”

“साठ च्या दशकापर्यंत अनेक तमीळ ब्राम्हण चुपचाप पळून गेले. द्रविड आंदोलनाचं मूळच ब्राम्हणवादाचा विरोध होता. त्यावेळी विद्यार्थांना जानवं कपड्याच्या आत लपवावं लागे, नाहीतर शाळेत कुणीही तोडायचं.”

“पण ब्राम्हणांनी ह्या आंदोलनात स्वतः सहभाग का नाही घेतला?”

“काॅंग्रेस मध्ये तर अनेक ब्राम्हण होते, राजगोपालचारी ब्राम्हण होते. “द हिंदू” वर्तमानपत्र ब्राम्हणांचं होतं. कितीतरी ब्राम्हण जानवं तोडून आपलं आडनाव त्यागून समाजवादीनी डावे झाले.”

“इंद्रा नूयी, सुंदर पिचाई, हे लोकं तर तैम्ब्रैमच आहेत?”

“तीन विज्ञान नोबेल विजेता, गणीतज्ञ रामानुजन, अमेरीकेच्या ऊपराष्ट्रपती कमला हॅरीसपण अर्ध्या तैम्ब्रैमच आहेत.”

“म्हणजे भारताचे ऊत्तरी टोक कश्मीर आणी दक्षीण टोक तमिळनाडू दोन्हींवरून ब्राम्हणांचं पलायन झालं, कारण ऊर्वरीत ९७ टक्क्यांशी तारतम्य बसलं नाही?”

“तीन टक्केवाल्यांना कधीही तारतम्य बसवायची गरज पडत नाही. तुम्ही आरशात पहा नी विचार करा की तुम्ही सो-काॅल्ड “आर्य” ह्यासाठी किती जबाबदार आहात? जर आर्य नसते तर द्रविडही नसते”
…………….

“तमीळ ब्राम्हण महामानव होते? जे तीन तीन नोबेल जिंकले?”

“महामानव? हे काय असतं?”

“अनूवांशीक किंवा वांशीक श्रेष्ठता?”

“ह्या श्रेष्ठतेची हवा एकोणीसव्या शतकात डार्विन बरोबर आली. एकविसाव्या शतकातील “मानव पलायन अनुवांशिकते (Human migration genetics) सोबत फूस झाली.”

“म्हणजे?”

“जगात असं कुठलंच क्षेत्र नाही, जिथे मानव दुसर्या क्षेत्रातून आला-गेला नसेल.”

“मग कुणी मूळनिवासी कसा होतो?”

“मूळनिवासी ही कन्सेप्ट तेव्हाच शक्य आहे , जेव्हा येनारे जाणारे रस्ते नैसर्गीक किंवा ईतर कारणाने बंद असतील. जसं आॅस्ट्रेलिया सारख्या बेटावर आदिवासी रहायचे, आणी जहाजांचा शोध लागला नव्हता. ते शतकानूशतके बाहेरच्या मिश्रणाविना राहीले”

“आणी भारतात?”

“भारतात तर असंख्य क्षेत्रातून लोक आले. हजारो वर्ष फक्त बाहेरचेच नाहीतर आतलंही मिश्रण झालं. शेवटी हा संधींचा देश होता आजच्या अमेरीके सारखा.जर कुणी ठरवलंच की हजारो वर्ष एकाच ठिकाणी एकाच कुटूंब समुहात वंश ठेवायचा तर तो मूळनिवासी म्हटला जाऊ शकतो. पण अन्नासाठी भटकनार्या युगापासून ते जागतीक अर्थकारणापर्यंत ही एक अशक्य कल्पना आहे.”

“म्हणजे आता वंशाचा काहीच अर्थ नाही? द्रविड कुठलाच वंश नाही? काॅकेशीयन कुठलाही वंश नाही?”

“आता स्वजातीय समूह (ethinic groups) किंवा पाॅपुलेशन चे प्रयोग होतात, ज्याच्यात वेगळ्या अनुवांशीकतेचे लोकही राहू शकतात.
ऊदा. अभिनेता टाॅम अल्टरचा मूलगा जॅमी अल्टर सांस्कृतीक रूपात काॅकेशियन म्हटला जाईल? अमेरीकेतील प्रत्येक तिसरे कुटूंब भिन्न अनुवांशिकतेचे आहेत, ते काय म्हटले जातील? वंशाची संकल्पना काही कुपमंडूक वृत्तीच्या लोकापर्यंतच मर्यादीत राहील.”

“मग तमीळ ब्राम्हण इतके पुढे कसे गेले? तीन नोबेल कसे जिंकले? गुगल नी पेप्सीचे सीईओ कसे बनले?”

“ब्राम्हण म्हणजे काय? ते काय मदुराईच्या मंदिरात घंटा बडवत बसले होते? ते पाश्चात्य शिक्षण घेऊन तिथे पोहोचले.”

“रामानुजन? सी वी रामन?”

“ईग्रजांच्या आगमनानंतर जेव्हा पाश्चात्य शाळा-काॅलेज ऊघडले तेव्हा त्यात ब्राम्हणांनी भरपूर शिक्षण घेतले. ते त्यांना सूट करायचं. मद्रास प्रेसीडेंसीच्या सगळ्या मिशनरी शाळांत सगळ्यात जास्त ब्राम्हणच शिकले. तमीळ ब्राम्हण सर्वात आधी सुट-बूटात आले, नंतर मुंबई नी कलकत्त्याचे ब्राम्हण.”

“काही आकडेवारी?”

“ऐकोनीसव्या शतकात मद्रासमध्ये १६ आयएएस अधिकारी निवडले गेले. ज्यात पंधरा ब्राम्हण होते, २७ अभियंत्यात २१, ह्याचप्रमाणे जास्तीतजास्त प्रशासनीक पदांवर, शिक्षण संस्थात. जरी ते लोकसंख्येच्या ३ टक्के होते.”

“ते शिकत जास्त असतील? बुध्दी तीक्ष्ण असेल?”

“त्यांची जागरूकता होती ही. त्यांनी आपली सामाजीक गतीशिलते (social mobility) साठी शिक्षणाचा वापर केला. त्यांनी मंदीर, यजमान सोडले नी ईंग्रजी शिक्षणात कौटूंबीक वातावरण बनवून शिकू लागले.”

“हो! ईंद्रा नूयी यांनी एका मूलाखतीत सांगीतले होते की त्यांच्या घरात दिवसभर अभ्यासच चालायचा, खेळणं-कूदणं आजिबात नाही.”

“शेंडीला दोरी बांधून शिकायची गोष्ट तर नाहीना सांगीतली?”

“काही असो, ह्यात कुणाला काय समस्या होती?”

“शिक्षणाशी काही समस्या नव्हतीं. पण जेव्हा तीन टक्के असलेला वर्ग सर्व प्रमूख पदांवर दिसू लागतो तेव्हा ही गोष्ट बहुसंख्यक वर्गाला टुचू शकते. मॅक्समूलर ने १८५७ च्या क्रांतीनंतर एक गोष्ट सांगीतली होती…”

“काय?”

“भारताला आम्ही एकदा शक्तिने पराभूत केलं. पुन्हा एकदा पराभूत करू. शिक्षणाने!”

(क्रमशः)

मूळ लेखक- प्रविण झा.

Group content visibility: 
Use group defaults

May i know why are you posting this book here.. honestly there is no useful information in any part

प्राजक्ताताई यु नो? मी तुम्हास काहीतरी युसफूल ईन्फो मिळावी म्हणून धागा काढलेला नाहीये. सो कूड यू प्लिज स्टे अवे?

जे संवाद आहेत ते म्हणजे मूळ लेखक- प्रविण झा. या पुस्तकातील नायक आणि कुणी तमिळ माणूस यांच्यातली चर्चा याचे स्वैर भाषांतर आहे काय?

तमिळनाडू इतिहास - एक चर्चा असा लेख आहे. संदर्भ दिलेला इतिहास दिसत नाही.
----------------
आताचे आर्यावर्त म्हणजे आर. के. लक्ष्मणन यांनी वर्णन केलेला काल्पनिक भाग असू शकतो. द्रविडमुनेत्रकळ्हम चळवळीमुळे तैम्ब्रेम केरळातील पालघाट (आता पलक्कड) भागात स्थलांतरित झाले. ते मिश्र तमिळ मलयालम बोलतात.
-------------
पण ते बाजूला. मोठे चौपट भाग अपेक्षित आहेत. विनोदी लेखन संवाद आहेत. भराभर वाचून होतात हे छोटे भाग.

प्राजक्ताताई यु नो? मी तुम्हास काहीतरी युसफूल ईन्फो मिळावी म्हणून धागा काढलेला नाहीये. सो कूड यू प्लिज स्टे अवे? >>> no

no >>>>
खरं तर लेखमालेला मिळनारा ऊदंड प्रतिसाद पाहून मी पुढील लेख प्रकाशीत न करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्राजूताईंची प्रतिक्रीया पाहून मला पुढील लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. धन्यावद प्राजूताईं Happy