शाब्दिक चकमक

Submitted by Swamini Chougule on 28 August, 2022 - 13:05

#शाब्दिक_चकमक
मी, “Hi कशी आहेस?”

ती,“ मी मानुसघाणी आणि तुसडी आहे.”
( हे स्वतःबद्दल आत्मप्रौढीने सतत सांगितलेलं चालतं बरं का! दुसऱ्याच्या पोस्टचा मात्र पोस्टमार्टम करून स्वतःला हवं ते लिहायचा घाण वकूब असतो लोकांचा)

मी,(‘मी तब्बेतीबद्दल विचारले होते.’हे मनात’) “ “तुम्ही काय करता मॅडम?”

ती,“ माझ्या मैत्रिणी काय नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा नैत त्यांच्या क्षेत्रातल्या सोनं आहेत त्या सोनं!”

मी,“ मी तुम्ही काय करता विचारले?”

ती,“ते जावू दे. काय ग स्वतःला लय देखणी समजते म्हणे. माझ्या मैत्रिणी शब्दशः देखण्या आहेत. अप्सरा त्यांच्यासमोर पाणी भरतात पाणी!”

मी,“ नाही वो मी असं काही समजत!मी वेगळं म्हणाले होते तुम्ही वेगळं समजत आहात.(मैत्रिणीच काय कौतुक सांगते. स्वतःकडे बघ की एकदा अर्थात हे देखील मनात!)

ती,“ लय लेखिका म्हणून लिवते. व्याकरण कळतं का तुला? उथळ पाण्याला नुसता खळखळाट! माझ्या मैत्रिणी असं लिवतात की पाणिनी बी त्यांच्यासमोर पाणी भरेल. सुधार जरा!”

मी,“ मराठी टायपिंग शिकत होते वो! आता मस्त लिहते मी”( ‘हिला आणि हिच्या मैत्रिणींना पाणिनी जहागिरदारी देवून गेला वाटत.’ अर्थात हे देखील मनात)

ती,“ काय ग लाईक आणि कमेंट करत नाहीत लोक त्यांना भीती वाटते म्हणे तू प्रसिध्द होशील म्हणून काय च्या काय लिवते.”

मी,“ तो विनोद होता वो! फ्रेंडशिप डे दिवशी केलेला.(ही बाई डोक्यावर पडली का मी मनातच)

ती,“ तुला माहिती का माझ्या मैत्रिणी माझ्या पोस्ट लगेच लाईक आणि कमेंट करतात. त्या खूप भारी आहेत. देखण्या आहेत. त्यांच्या फिड मधलं सोनं आहेत.डाऊन टू अर्थ आहेत. ब्ला ब्ला ब्ला....” तोंडाचा पट्टा सुरूच

मी, अर्थात सगळं मनात ‘ या बाईजवळ स्वतः बद्दल काय आहे की नाही सांगायला? की कृपामाईमधून पळून आली ही तसचं दिसतंय.अरे देवा! भागो

#वेडावलेली_स्वामिनी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults