प्राणदीप वाहू देत

Submitted by द्वैत on 6 August, 2022 - 10:15

प्राणदीप वाहू देत
पाण्यावर दूरदूर
घनगंभीर क्षितिजाशी
उमटू दे सप्तसूर

न्हाऊनिया चांदण्यात
पानपान फूलफूल
विजनातील वृक्षांची
उतरु दे मरणभूल

तिमिराच्या खोलातून
ऐकू ये घंटारव
गवताच्या पात्यांवर
थरथरता ओले दंव

सांभाळून गंधबीज
मातीची गर्भकूस
धुंडाळे गगनातून
मेघांचा मागमूस

देहाच्या सावलीस
श्वासांचे स्वप्नभास
संध्येचा पैलतीर
द्वैताच्या आसपास

द्वैत

Group content visibility: 
Use group defaults