पंचमीचा झोका माझा...

Submitted by जगदिश ढोरे आसेगावकर on 29 July, 2022 - 03:22

उंच माझा झोका,
घेई गगनाचा ठेका..

नारळाच्या दोरीचाही असे,
त्यास आनंद रे लेका..

आड्या फांदीला टांगला,
पंचमीचा सण बघा...

वाऱ्यासंग धाव घेत,
आसमाना मारी रेघा..

दोन सया गं सोबती,
एकमेका झुलवती..

श्रावणात धरणी जणु,
फुल पानं डोलवती....

झोका चढता चढना,
पाय थकले हाकुन...

बालपणाच्या खेळालाही,
आता ठेवलं झाकून...

नाही झोका कुठं बाई,
हारपली गं वनराई..

गॅलरीच्या झोक्याला गं,
सर पंचमीची न्हाई..

©® जगदीश ढोरे आसेगावकर
दिनांक :- २९-०७-२०२२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users