आक्षेप - शेवट सुचवा

Submitted by एस अजित on 25 March, 2010 - 11:10

'बेटा हे माझे तुला शेवटचे पत्र. तुझ्या मनात माझी काय प्रतिमा शिल्लक राहीली आहे मला माहीत नाही. ती कशी असावी याचा माझा काही आग्रह नाही, पण माझ्या मनातील विचार तुला कळावे म्हणून हा पत्रप्रपंच.

तो माझ्या आयुष्यात आपल्या बाबांच्यापुर्वीच आला होता. बी.ए. ला आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. त्याच्यासोबत असताना मला एक छानशी अनुभुती होत असे. सुरक्षित वाटत असे. विविध विषयांवर एकमेकांचे विचार ऐकणे, तासंतास एकमेकांशी बोलत राहणे, महाविद्यालयातील विवीध कार्यक्रमात दोघांनी मिळुन भाग घेणे सगळं छान सुरु होतं.

बी.ए. च्या दुसर्‍या सेमिस्टरला आपले बाबा आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजु झाले. अल्पावधीतच ते आमच्या वर्गात प्रिय झाले. आमच्यासोबत ते बर्‍याचवेळा येत असत. आमच्या वयातील अंतर काही फार नसल्याने ते आम्हाला आमच्यातील एक वाटत असत. त्याच्यातील आणि माझ्यातील जवळीकीचा अंदाज सुरुवातीलाच बाबांना आला. त्याबद्द्ल त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा देखिल केली होती.

पहिलं वर्ष व्यवस्थित पार पडलं. आप्पांनी माझ्यासाठी स्थळं बघायची का अशी आईकडे विचारणा केली. आईनं ते माझ्या कानावरं घातलं. बी. ए. पुर्ण होऊ दे असं मी त्यावेळी आईला सांगुन वेळ निभावून नेली. या संदर्भात आप्पांशी स्पष्टपणे मी बोलणे त्याकाळी अजिबातच शक्य नव्हते. जी काही चर्चा व्हायची ती आई मार्फत.

मी हा प्रसंग त्याच्या कानावर घातला. शिक्षण अजुन सुरु असल्याने काय करावे असा प्रश्न होताच. तरी मी घरी तसे सांगावे असं त्याचं मत होतं. माझ्याने त्यावेळी हिंम्मत झाली नाही, पण अगदीच प्रसंग उभा राहील त्यावेळी धीर करु असं ठरविले.

तसा प्रसंग एवढ्या लवकर समोर उभा ठाकेल असे वाटले नव्हते. एक दिवसं कॉलेजसाठी निघतांना आईने मला ते सांगितले एक स्थळ सांगुन आले आहे. उद्या ते आपल्या घरी येणार आहेत तुला बघायला, आणि मुलगा तुमच्याच महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पायाखालची जमिनच सरकल्यासारखे वाटले.

आईला सगळा प्रकार सांगितला. आई प्रचंड घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. ती मटकन खाली बसली. आप्पाना हे कसे सांगावे हा गहन प्रश्न तिच्यासमोर उभा राहीला. मीच तिला आधार देऊ लागले. थोड्या वेळाने शांत झाल्यावर तिने मला महाविद्यालयात जायला सांगितले. म्हणाली मी बोलुन बघते आप्पांशी. ऐकतील की नाही हे मी नाही सांगु शकत. घरातुन निघताना आईला विचारले मुलाचे नांव काय ? आईने आपल्या बाबांचे नाव सांगितले. मला हसावे की रडावे तेच कळेना. धीर करुन महाविद्यालयात गेले.

त्याच्या कानावर सगळं घातलं. दोघेही गंभिर झालो. थोड्यावेळाने आपले बाबा आमच्या जवळ आले. मला विलक्षण संकोचल्यासारखे झाले. काय विचित्र परिस्थितीत मी अडकले होते माझं मलाच ठाऊक. काय करायचं ठरवलं आहे ? आपल्या बाबांनी आम्हाला सरळ सरळ प्रश्न केला. सरं तुम्ही या स्थळाला नकार द्या. काय म्हणून ? आपल्या बाबांनी मला विचारले. माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले.

दोघांनी माझी समजुत काढ्ली. आप्पा काय म्हणतात यावर संगळं अवलंबून होते. घरी जाऊन काय वाढुन ठेवले आहे याची भयंकर धास्ती वाटत होती. भीत भीत घरात प्रवेश केला. घरात विलक्षण शांतता होती. घरात फक्त आईच होती. तिच्यासमोर उभी राहीले. आईने मान हलवुनच सांगितले. नाही. शक्य नाही.

संपले. माझ्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. आता काय? थोड्यावेळाने आप्पा बाहेरुन आले. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर बसुन मला समोर उभे केले. माझ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले. तुला कसे सांभाळेल तो? शिक्षण सुरु, नोकरी नाही. आप्पा नोकरी मिळेल ना बी. ए. झाल्यावर. आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय? तो आपल्या जातीचा नाही त्यामुळे हे शक्य नाही. उद्याच्या तयारीला लागा, आणि हो या प्रकाराची कुठेही वाच्यता केलेली मी खपवून घेणार नाही.

माझे प्राणच कंठाशी आले. आता सगळं काही आपल्या बाबांच्या हाती होते. दुसर्‍या दिवशी तो सोपस्कार पार पडला. आता आपल्या बाबांकडून काय उत्तर येते यावर संगळं अवलंबून होते. दुसर्‍या दिवशी मला महाविद्यालयात जाण्याची हिंम्मतच होईना. काय करावे काही सुचत नव्हते. पण गेले नाही तर त्याच्याशी बोलणे कसे होणार या विचाराने मनाचा निग्रह करुन मी महाविद्यालयात गेले. आपल्या बाबांनी आम्हाला दोघांना बोलावुन घेतले. परत एकदा विलक्षण विचित्र परिस्थीती उभी राहीली.

आपले बाबा आम्हाला म्हणाले तुम्ही थोडं धाडसं केलं तर काही बिघडणार नाही. काही काळानंतर संगळं काही सुरळीत होईल अश्या घटना घड्ल्या आहेत. त्यात आजकाल एवढं विशेष राहीले नाही. मी तुमच्या सोबत आहे. त्याचं म्हणणं होतं मी आप्पांना समजवावे. त्याला आमच्या नात्यात कुणाचाही आक्षेप नको होता. जे कधीही शक्य नव्हते.

मग माझ्या अग्निदिव्याचा दिवस उजाड्ला. आपल्या बाबांचे आणि माझे रितसर लग्न झाले. एका जिवलग मित्राप्रमाणे त्यानी मला सांभाळले. लग्न झाल्याबरोबर पहिल्या एकांतात त्यांनी मला विचारले तुला त्याच्याकडे जायचे आहे का? आता तु माझी बायको आहेस, आणि मी तुझ्या सोबत आहे.

मी आपल्या बाबांना विचारले सगळं माहीत असुन देखील तुम्ही लग्नाला का तयार झालात? ते म्हणाले हे बघ मी तुला नकार दिल्याने काय फरक पडला असता? मला आधीपासुनच सगळं माहीत होतं म्हणून ठीक, त्यामुळे तुझ्या मनात अपराधी भावना निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. समजा मी नकार दिला असता आणि तुझं लग्न तिसर्‍या कुणाशी झाले असते तर तिघांची फसवणूक झाली असती. मी तुला परत एकदा सांगतो, तुला त्याच्याकडे जायचे असल्यास माझी हरकत नाही फक्त जाण्यापुर्वी सांगून जा.

माझ्यात तेवढी हिंम्मत नव्हती. मनाचा निग्रह केला. आपल्या बाबांचा स्विकार केला. तुझा जन्म झाला. तुझं शिक्षण, लग्न, तुझं मातृत्व संगळं व्यवस्थित पार पडलं तु सुखात आहेस हे बघुन जीवन धन्य झाले. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली. विचारले तुला त्याच्याकडे जायचे असेल तर तु अजुनही जाऊ शकतेस.

मधल्या काळात आई गेली, आप्पादेखील गेले. हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का? माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.'

या कथेचा शेवट ती आपल्या आयुष्याच्या शेवटाने करते असा माझा विचार होता. तो मी तुमच्यावर सोपवतो. वाचकांनी आपल्या सोईचा शेवट सुचवावा.

१. मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली.

२. आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतच आयुष्य घालविले.

३. आक्षेप आणि परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.

मित्रहो प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. धन्यवाद.

गुलमोहर: 

एक्दा आहे ती परिस्थिती स्वीकारल्या नन्तर परत वेगळा विचार करून निर्णय बदलणे योग्य नाही.
दोन नम्बर पर्यायच योग्य......

आपले बाबा' इटसेल्फ हॅज अ बिग स्टफ इन इट. लेखक त्यातून काहीतरी सुचवू इच्छित आहे, पण ते कुणाच्याही लक्षात येत नाहीये. अरेरे, अरेरे.

>>> अरे रे इन्सस्ट करून ठेवलंय..

तुफान धागा....

अजुन एक शेवट

प्रिय आइ - तुला आइ म्हणु की नको ? कारण तुझ्या पोटी जन्माला आलेला मी आप्पाच आहे .
हे समजल्यावर दुरुस्त करुन तु परत पत्र लिहिशील किंवा हे पत्र फाडुन टाकशील याची खात्री आहे.
नाहितर मी हवेत नकारार्थी हात हलवणारा तोच जुना आप्पा आहे !

आईग्गं Rofl काय ती स्टोरी आणि काय एकेक प्रतिसाद !! बापरे‌ पोट दुखतंय हसून हसून..आपले बाबा,.. Lol उठाले रे बाबा..

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता,
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या,
धिक्तां च तं च मदनं च इमां च मां च ॥
The woman whom I adore has no affection for me; she, however, adores another who is attached to some one else; while a certain woman is in love with me even when I do not reciprocate the feelings. Fie on her, on him, on the God of Love, on that woman, and on myself.

शशक स्पर्धेदरम्यान राहून राहून आठवण आली. Proud

पुरस्कार देताना इथल्या प्रवेशिकांचा पण विचार व्हावा. ही कथा जनक आहे शशक स्पर्धेची Lol

हे रत्न इतकी वर्षं कुठे लपलेलं होतं Happy हहपुवा
पण ती सारखी स्वतःच्या नवऱ्याविषयी बोलताना सारखं आपले बाबा म्हणते ते विचित्र वाटलं...
सगळे शेवट भन्नाट आहेत. लेखकांचं याविषयीचं मत वाचायला आवडलं असतं.

Pages