मराठी सिरीयलस् अमेरिकेमध्ये कशा पहाता येतील?

Submitted by सूरमाधुरी on 8 June, 2022 - 00:01

नमस्कार! मराठी सिरीयलस् अमेरिकेमध्ये कशा पहाता येतील?

Group content visibility: 
Use group defaults

माझ्या जुन्या घरचे टाटा स्कायचे आणि इथले व्हिडीओकॉनचे डिश अ‍ॅण्टेना, सेट टॉप बॉक्स आणि केबल मराठी / हिंदी सिरीयल्स आणि न्यूज चॅनेल्सना वैतागल्याने काढून टाकले आहेत. ते पडूनच आहेत. जर तुम्हाला उपयोग होणार असेल तर दोन्हीही देऊ शकतो. कसलीच अपेक्षा नाही.

एक विचारतो -
गूगल प्ले स्टोरवरून भारतात android apps download केली तर ती नंतर अमेरिकेत चालतील का?( किंवा not available in your country असा मेसेज येईल?)

JioNews , JioTv वगैरे?
------------
Jio apps चे लॉगिन भारतातल्या जिओ वर ओटीपी मिळवून करायचे.
JioTv ,वर बरेच मराठी आणि इतर चानेल्स wifi वापरून पाहता येतात. ( फोनमधे Jioचे simcard नसले तरी.)
[ JioCinema app मात्र Jioच्याच डेटावर चालते.]

+१ स्लिंगसाठी.

पण कशाला? मिपावर 'आजी'ने लिहिलेला लेख वाचा आणि पुनर्विचार करा! बाय द वे, "श्रीयुत गंगाधर टीपरे"च्या तोडीचं काही सापडलंच तर ईथे जरूर कळवा. That was a masterpiece.

Sling - Colors Marathi, Sony Marathi
Zee5 usa - Zee Marathi, Marathi & other lang. movies/ Web Series - this one has $45 per/year deal - app is available on Roku and other platforms
Hotstar now with Hulu - has Star Pravah related content. (Zee5 is better deal than Sling and Hulu-Hotstar)
These are all legitimate options.

बहुतेक सगळी सिरियल्स एक आठवड्याच्या अंतराने यु ट्ञुब वर दिसतात
स्वानुभव... मी सध्या सियॅटल मध्ये आहे

+१११११ ..बहुतेक सगळी सिरियल्स एक आठवड्याच्या अंतराने यु ट्ञुब वर दिसतात
स्वानुभव...

किचन कलाकार चे एपिसोडस कुठे पाहायला मिळतील कोणाला माहिती आहे का ?
>>>https://www.gillitv.net/tvshow/mast-masaledaar-kitchen-kallakaar/
पण कशाला? मिपावर 'आजी'ने लिहिलेला लेख वाचा आणि पुनर्विचार करा! >>> मोस्टली हे व्हिजिट करण्यारा ज्येनासाठी असत, त्याना इथे प्रचन्ड कटाळा येतो ,कितिही कमी वेळासाठी आले असतिल तरी त्याना देश आणी डेली सोप्स याची सवय असते.