दडलेला प्राणी

Submitted by सामो on 15 May, 2022 - 08:36

केट पेरीच्या दंडावरती एक सुंदर वाक्य गोंदवलेले आहे - अनुगच्छतु प्रवाहं. अर्थात गो विथ द फ्लो. किती मस्त आहे ना अर्थ. हे लोक म्हणजे - चंचल प्रवाहामध्ये मासोळीसारखे सुळसुळ पोहणारे. फारसा लोड घेत नाहीत की विरोध करत नाहीत. जे समोर येइल ते आपलेसे करत, स्वीकारत एक प्रवाही जीवन जगणारे.
तर काही लोक सरड्यासारखे असतात वेळोवेळी रंग बदलून स्वतःला काटेकोरपणे गर्दीत लपवुन छपवुन टाकणारे. कधीच उठुन न दिसणारे. कोणत्याही एका मतावर ठाम रहाणे जमतच नसेल यांना. जिकडे पारडे जड तिकडे झुकणारे.
काही लोकांना भित्र्या सशाचे काळीज मिळालेले असते. जरा कुठे झाडाचे पान पडले की आभाळ कोसळले असे वाटून सैरावैरा पळणार्‍या सशाची गोष्ट आहे ना तसे. यांची कल्पनाशक्तीच मूळात दांडगी असते व त्यात काही नकारात्मक थोडेसे खुट्ट झाले की तिला बहर येतो.
काही जण खारीसारखे सतत काही ना काही साठा करण्यात व्यग्र - मग ते कविता असो की उत्तम अवतरण वाक्ये असो. यांच्याकडे बरेच साठे असतात. काही चतुर खारी तर असे मस्त मस्त खजिने जमवुन नंतर खाजगी वेळांत त्यांचे रवंथ करत असतात - कोणासारखे तर गायी बैलांसारखे अगदी.
जे जे सुंदर, सुवासिक ते ते ग्रहण करणारी फुलपाखरे पाहीली आहेत का तुम्ही. प्रत्येकामधे काहीतरी शिकण्याजोगे सापडतेच यांना. बर्‍यापैकी नॉनजजमेंटल व उत्तम ते ग्रहण करणारे. समोरच्या व्यक्तीतील, फक्त गुणांचे ग्राहक असतत ही फुलपाखरे. यांच्या सहवासात आपल्याला आपले सद्गुण कळतात जे की अन्य लोकांच्या जजमेंटल वृत्तीमुळे पार आपल्याच विस्मरणात गेलेले असतात.
पाहीलेल्या लोकांत नकला करणारी, माकडेही होती. यांना प्रँक्स भयंकर आवडतात. मग अमक्या मित्राचा त्याच्या नकळत डबाच संपव असो. की कोणाचे लेग पुलिंग असो. हे लोक नेहमी वात्रटसारखे माकडचाळे करत खिदळत असतात. बर्‍याच प्रमाणात हॅपी गो लकी दिसतात.
मेंढेही भरपूर पाहीलेत. दिसला सावज, जा द्यायला टक्कर. मला वाटतं आभासी सार्वजनिक व्यासपीठांवरती हे बेणे बरेच दिसतात. जिकडेतिकडे जाउन टक्कर द्यायची खुमखुमी असणारे.
सतत गोल ओरिंएटेड लोक मला डोंगराळ प्रदेशातील शेळ्यांसारखे वाटतात. माउंटन गोटस. गुगलवरती शोध घेउन बघा या शेळ्या सतत कोणत्या ना कोणत्या अवघड सुळक्यावर चढण्याच्या स्पर्धेत भाग असल्यासारख्या सुळक्यांच्या शोधात असतात. तोच अविरत छंद. अवघड माथा शोधायचा आणि तो माथा सर करायचा.
हां विचारी हत्ती, विवेकी माणसे, सावध चित्ते व डुखी साप व सतत स्वतःचा बचाव करणारे खेकडेही पाहीलेले आहेत.

या सर्व प्रकारच्या वल्ली पाहून खरच मनात विचार येतो - आपल्या आत एखादा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी दडलेला असतो का? आणि हा प्राणी राशींमधुन दिसतो की काय. अर्थात राशी पुरेशा नाहीतच. पण निसर्गात आढळून येणारी ही विविध प्राणीवैशिष्ट्ये मानवांत आढळतात आणि हो एखादे वैशिष्ट्य ठळकपणेही आढळते. बरेचदा लोक आपल्या देहावरती काहीतरी सिग्नीफिकंट म्हणजे त्यांना अतिशय महत्वपूर्ण असणारे असे वाक्य/ प्राणी/ चित्र गोंदवुन घेतात. इट मीन्स अ लॉट टू दॅट परसन. नेटिव्ह अमेरीकन लोकांमध्ये तर टोटेम असतो. प्रत्येक व्यक्तीचा एक टोटेम - a natural object or animal that is believed by a particular society to have spiritual significance and that is adopted by it as an emblem. तो कधी गरुड असेल तर कधी अस्वल, लांडगा, वाघ काहीही. त्यामागे असाच विचार असावा.

माफ करा लेखात, विशेषणांची व प्राणीजगताची जंत्री झालेली आहे. 'अनुगच्छतु प्रवाहं' या सुंदर मंत्रामुळे हे सर्व विचार येत गेले. आणि हो हे सर्व लोक पहाण्यातले आहेत. तुमच्यामध्ये असा /असे प्राणी दडले आहेत का? असणारच त्यांचा मागोवा घ्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटले होते , ते रोज पेपरात एक फोटो येतो , ह्यात मांजर शोधा , अन त्यात साप शोधा तसे आहे की काय

असा एकचं प्राणी दडलेला आहे नाही वाटतं.
त्या त्या वेळी त्या त्या परिस्थतीत वेगवेगळे प्राणी बाहेर येतं असतील.

>>>>>नोंद: सापाची स्मरणशक्ती फार कमी असते, तो डूख धरत नाही
होय तो पॉइन्ट केवळ मिथ असेलही.
>>>>>>>ज्योतिषात जे योनी प्रकरण असतं ते काय?
माहीत नाही.

ईंटरेस्टींग लेख आहे.

लहानपणी शाळेला दांडी मारून मद्यप्राशन करणाऱ्या मित्रांसोबत विरासत पाहिला होता थिएटरात. त्यात अमरीशपुरीच्या ऊच्च संस्कारात वाढलेल्या अनिल कपूरच्या तोंडी एक डायलॉग होता, "मेरे अंदर के जानवर को मत जगा बल्ली" ..
नेमका कुठला जानवर हे सांगत नाही.
पण शेवटी क्लायमॅक्सला तो जानवर जागतोच आणि अनिल कपूर त्या बल्ली ठाकूर उर्फ मिलिंद गुणाजीचा मुडदा पाडतो.
आणि पुन्हा तोच डायलॉग मारतो, बोला था ना मेरे अंदर के जानवर को मत जगा...
जणू तो वध अनिल कपूरने न करता त्याच्यातील जनावरानेच केला.

त्या दिवशी एक गोष्ट मनात कायम ठसली. आपल्या प्रत्येकाच्या अंगात एक हिंस्त्र श्वापद दडून बसले असते. आणि तशीच वेळ आल्यास ते बाहेर पडते. अगदी आपण आदर्श हिरो, संस्कारी स्त्री-पुरुष वगैरे असलो तरीही...

विवेक बेळे यांच्या नाटकांमध्ये हे 'दडलेला प्राणी ओळखा' प्रकार फार आणि मजेदार प्रकाराने असतात. त्यांची नाटके पाहिली नसल्यास बदाम राणी गुलाम चोर हा सिनेमा पहा. कुठल्याही व्यक्तीचं वर्णन करताना एखाद्या प्राण्याची उपमा येतेच येते. ती पण अशा प्रकारे, की तिचा obvious अर्थ नसतो, पण कुठला तरी असा गुणधर्म की ज्याचा आपण एरवी विचार करत नाही, पण तो संवाद ऐकल्यावर एकदम पटतो. आत्ता पटकन उदाहरण आठवत नाहीये, तो सिनेमा पाहिलात तर लक्षात येईल.

उत्तम लेख. .

असा एकचं प्राणी दडलेला आहे नाही वाटतं.
त्या त्या वेळी त्या त्या परिस्थतीत वेगवेगळे प्राणी बाहेर येतं असतील.+१

पण तरीही कुणाचं तरी एकाचं प्राबल्य असतच.

अनुगच्छतु प्रवाहं ते आत दडलेला प्राणी !!!! पण आवडला हा विचार प्रवास.

स्वतःला 'भुंगा' हाच प्राणी/कीटक पटकन जुळतो. दिवसभर फुलपाखरी वृत्तीने उंडारून संध्याकाळी गुपचुप रेशीमकोषात, आपल्या घरी.
सूर्यपूजक, रस-रसना चोखंदळ. निरीह, पण कुणी हल्ला केल्यास करकचून दंश Happy

आता हा प्रश्न अनेकांना विचारीन - आप के अंदर कौन सा जानवर छिपा है ? Wink

माझ्यात दडलेला प्राणी कोणता ते काय अजुन कळलं नाही. पण व्रृश्चिक राशी असल्याने त्या राशीप्रमाणे डंख मारण्याचे गुण आहेतच.

निवडणूक आली की प्राणी बाहेर येतात

एकच वाघ अमुक तमुक , उरलेले कोल्हेकुत्रे

माणसांची निवडणूक अन हे प्राणी का येतात ?

>>>>>>>>सूर्यपूजक, रस-रसना चोखंदळ. निरीह पण कुणी हल्ला केल्यास करकचून दंश Happy
भुंगा सूर्यपूजक कसा? की आपण स्वतःबद्दल केलेले वर्णन आहे ते?

>>>>>>पण व्रृश्चिक राशी असल्याने त्या राशीप्रमाणे डंख मारण्याचे गुण आहेतच.
वृश्चिक रास सर्वाधिक मिसा-अंडरस्टुड रास मानली जाते. लोकं लगेच " अय्या मोस्ट पॅशनेट रास' म्हणत आनंदाने, उड्या मारायला लागतात नाहीत घाबरुन जातात.
पण मी पाहीलेल्या सर्व लोकांत सर्वाधिक शांत लोक या राशीचे होते व त्या खालोखाल वृषभ. वृषभेचा शांतपणा एखाद्या गायीचा हिरवळीत बसून शांतपणे रवंथ करणारा होता तर वृश्चिकेचा 'स्टिल वॉटर रन्स डीप डीप' वाला.
हां दंश मारतात हेही अनुभवलेले आहे. पण माझी (इमोशनल नॉट फिझिकल) क्रश मैत्रीण - वृश्चिक चंद्र- तूळ लग्न व कन्या सूर्य होती/आहे.

हां सातव्या घरात मंगळ, ११व्यात सू-बु युती (वगैरे अन्य चिल्लर गोष्टी अलाहिदा.) पण मुख्य - वृश्चिक चंद्र- तूळ लग्न व कन्या सूर्य महत्वाकांक्षी- अचिव्हर- उत्तम सोशल एटिकेटस-दिसायला खूप आकर्षक. अर्क होती.

भुंगा सूर्यपूजक कसा?

भुंगा सूर्य उगवण्याच्या आधी कमलदलातून बाहेर पडत नाही, माबदौलतही सूर्य उगवल्यानंतरच उठतात.
त्यामुळे तसे लिहिले Happy

क्रश मैत्रीण - वृश्चिक चंद्र- तूळ लग्न व कन्या सूर्य होती/आहे.
एकाच वेळी एवढं सगळं कसे असेल?
माझ्या मध्ये नक्कीच अजगर आहे.

भुंगा सूर्य उगवण्याच्या आधी कमलदलातून बाहेर पडत नाही पडू शकत नाही असं म्हणायचं आहे बहुतेक. (सूर्यास्तानंतर) मिटता कमलदल होई बंदी भृं(इथे तान घ्यावी)ग.

Pages