'फेमिनिस्ट'

Submitted by वेलांटी on 15 May, 2022 - 05:53

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट !! तिचं आजचं भाषण अतिशय गाजलं. कायक्रमाचा समारोप करताना आयोजकांनी अगदी भरभरून कौतुक केलं तिचं. त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या तोंडी तिचंच नाव! ती स्वतःवरच जाम खूश झाली. एक धडाडीची फेमिनिस्ट म्हणून ती ओळखली जात होती. अतिशय धीट विचारांची होती ती. अल्पावधीतच तिने नाव कमावले होते.
तिने नवर्याला कॉल केला. 'मी पार्किंगजवळ पोहोचतेय, लवकर ये'. वीस मिनिटे ती वाट बघत होती. एकदाचा तो आला. 'कुठे होतास? मी कधीची थांबलेय ईथे.' 'मग काय झालं? आलो ना? माझ्या फिल्डमधले लोक आले होते, त्यांच्याशी बोलत असताना तुझा मधेच कॉल!', त्याचा त्रासिक चेहरा. ती काहीच न बोलता गाडीत बसली.
थोड्याच वेळात ते रेस्टॉरंटमधे पोहोचले. 'येताना घरी जाऊन मिनूला घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं, तिला ईथली पावभाजी खूप आवडते.'
'काही नको! नाही आणलं तेच बरं! एक तर तिचं आवरण्यात वेळ गेला असता, वर तिला खायला तास लागतो, त्यात ती सगळं कपड्यांवर सांडून अवतार करणार आणि त्या अवतारात आपल्याबरोबर चार लोकांत फिरणार , त्यापेक्षा घरी मावशी तिला चारून ,आपण जायच्या आत तिचं आवरून ठेवतील. तिला आणून नसते उपद्व्याप कशाला करायचे?' त्याचा मुद्दा बिनतोड होता.
ती सहज ईकडेतिकडे पाहत होती, ईतक्यात बाजूच्या टेबलवर एक विवाहित जोडपे आपल्या तान्ह्या बाळाला येऊन घेऊन बसले. बहुतेक जवळच्या एखाद्या खेडेगावातील असावे. त्यांचे राहणीमान, पेहराव त्या रेस्टॉरंटच्या वातावरणाशी अगदीच विजोड होता. तिला थोडीशी दया आली त्या बाईची. बिचारी बाळाला घेऊन अवघडून बसली होती. पण दोघेही एकंदर खूष दिसत होते.
वेटर मेनूकार्ड घेऊन आला. तो,'आधी मला एक कॉफी पाठव.मग नंतर बघू. तूला काय पाहिजे ते मागव लवकर. परत आणि काय मागवायचं यावर वेळ घालवू नको. मला एक मिटींग आहे संध्याकाळी.' तरीपण ती विचारात पडली, पावभाजीच खायची होती तिला, पण जाऊदे नंतर मिनूबरोबर असताना खाऊ. मग तिने एक सॅडविच आणि कॉफी मागवली.
वेटर निघून गेला, तशी तिची नजर आपसूकच पुन्हा त्या शेजारच्या टेबलवर गेली. वेटरने मेनूकार्ड द्यायच्या आतच तो जरा हसून म्हणाला, 'दोन पावभाजी आणि दोन चहा, आमच्या हिला तुमच्या ईथली पावभाजीच आवडते'. आणि तीही त्याच्याकडे पाहून जरा लाजल्यासारखी हसली.
दोन्ही टेबलवर आपापल्या ऑर्डर आल्या. ईतक्यात तो उठला आणि तिच्याकडे जाऊन म्हणाला, 'आण त्याला ईकडे, मी घेतो. तू खा सावकाश. मी नंतर खातो, तुझं झाल्यावर.' ती नको नको म्हणत असताना त्यानं बाळाला घेतलं अन त्याची चड्डी बदलू लागला. शेजारच्या टेबलवरून ही कौतुकाने पाहू लागली, ईतक्यात 'अगं ये, लक्ष कुठंय? मला मिटिंग आहे, टाईमपासला वेळ नाही!' ती तुटल्यासारखी पाहतच राहिली. परत एक नजर शेजारच्या टेबलवर वळलीच. तिच्यासमोर क्षणभर मिनूचाही चेहरा तरळून गेला. काहीतरी आतमधे हलल्यासारखं झाल. कुठेतरी चुकत होतं, पण ते नेमकं काय हे तिला नीट समजंत नव्हतं!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेमिनिस्ट शीर्षकाचा संदर्भ कळला नाही. पण कळले ते असे की दोघेही करीअरला प्राधान्य देत फॅमिली टाईम हरवून बसलेत. याचे त्याला काही वाटत नाहीये. पण हिचे काळीज तुटतेय. जर त्याने आपल्याला मदत केली तर आपण ते ही सुख मिळवू असे तिला त्या जोडप्याकडे बघून वाटतेय. पण जर पोरांची जबाबदारी आपल्या एकटीवरच येणार असेल तर मग ते तिलाही नकोय. आजच्या काळात तर मुलांना जन्म द्यायच्या आधीच किंबहुना लग्नाच्याही आधीच होणाऱ्या मुलांची जबाबदारी काय कशी वाटून घ्यायची हे एकमेकांशी क्लीअर करून घ्यावे.

सदर व्यक्ती धीट विचारांची आजिबात वाटली नाही बुवा. धडाडीची फेमिनिस्ट असल्याचे तुम्ही लिहून दिले म्हणून आम्हाला समजले, बाकी ह्या बाई नवऱ्याचे ऐकणे इतकेच करताना दिसल्या.

नवऱ्याला,पुरुषांना पावलो पावली जो पर्यंत स्त्री शिव्या देत नाही तो पर्यंत तिला फेमिनिस्ट म्हणता येणार नाही.
पुरुषांना शिव्या आणि त्यांच्याच सहवासात मौज मज्जा ही व्याख्या योग्य आहे.

विरोधाभास दाखवायचा असेल हेचं डोक्यात आलं Happy

पण आतापर्यंत अशा कथांमध्ये तुलना दाखवताना शहरी नवरा समजूतदार वगैरे आणि खेडवळ नवरा अधिकार वगैरे गाजवणारा कधी पाहिला पक्षी वाचला नाही Lol

मी जेवढं पाहिलंय, खेड्यात नवरेशाही जास्तं चालते. Wink

विरोधाभास दाखवायचा आहेच पण त्या बरोबर स्त्री पुरुष सहजीवन हक्क न गाजवता पण जगू शकतात
त्या साठी एकमेकांच्या भावना समजून घेण्याची कुवत दोघात असावी लागते.
आणि ही कुवत शिक्षण शी संबंधित नाही,आर्थिक स्तर शी पण संबंधित नाही.
असा काहीसा अर्थ आहे कथेचा.

आणि ही कुवत शिक्षण शी संबंधित नाही,आर्थिक स्तर शी पण संबंधित नाही
>>>>>>

कथेत हा विचार असेल पण याच्याशी सहमत नाही
ऐकायला हे आदर्श वाटले तरी हे शिक्षणाशी वा आर्थिक स्तराशी संबंधित असते. बलवान कडी नेहमी कमजोर कडीला दाबणार हा निसर्गाचा नियम आहे.
वर आबा यांचे निरीक्षण खेड्यात नवरेशाही जास्त चालते हे योग्य आहे. याचे कारण तेथील स्त्री तितकी सक्षम नाहीये.
स्त्री-पुरुष समानता वा पुरुषांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यावी ही अपेक्षा पुरुषांचे प्रबोधन वा विचारांचे शुद्धीकरण करून पुर्ण होणार नाही. तर त्यासाठी स्त्रीसक्षमीकरण हाच एक मार्ग आहे.

>>>>>अरे पण मुक्या प्राण्यांवर दया करा म्हणणाऱ्या लोकांनी चिकन मटण खाऊच नये का?
लोल

च्रप्स यावर वेगळा धागा काढा.
मांसाहार करणाऱ्यांच्या मनात भूतदया नसते हा सर्वसाधारण गैरसमज आहे. दूर व्हायला हवा.

मांसाहार करणाऱ्यांच्या मनात भूतदया असते. फक्त ती काही प्राण्यांपुर्तीच मर्यादित असते. आपण ज्या प्राण्यांचे मांस खातो त्याच्या बद्दल भूतदया नसते (I hope !)

त्यामुळे कोरियामध्ये डॉग मिट फेस्टिव्हल असते म्हणलं कि त्यांची भूतदया उफाळून येते आणि सांस्कृतिक वर्चस्ववादातून ते डॉग मिट फेस्टिव्हल या प्रथेचा आदर न करता तिथे ऑलिम्पिक घेऊ नका अशी मागणी करतात.

आपण ज्या प्राण्यांचे मांस खातो त्याच्या बद्दल भूतदया नसते (I hope !)
>>>
तुम्ही असे होप का करता?

असो, यावर ईथे फार अवांतर नको, काम उरकले वेळात तर नवीन धागा टाकतो

आपण ज्या प्राण्यांचे मांस खातो त्याच्या बद्दल भूतदया नसते>>>

भुतदया म्हणजे नक्की काय? जे शाकाहारी असतात ते ही तथाकथीत भुतदया सर्वच प्राणिमात्राबद्दल बाळगुन असतात की केवळ कोंबडी,द्डुक्कर, म्हैस, बैल, बोकड याबद्दलच बाळगतात ? सर्वच प्राणिमात्राबद्दल असेल तर रस्त्यावर चालताना एखादा कुत्रा मागे लागला तर त्यान्ची प्रतिक्रिया काय असेल? घरात कबुतरे त्रास देत असतील तर ते कबुतर जाळी लावुन घेतात का? मुम्बैत सन्जय गान्धी उद्यानाच्या जवळ घर असेल आणि रात्री बिबट्या गेटवर येऊन बसत असेल तरी भुतदया शिल्लकित राहते का? असो.

मी मिश्राहारी आहे. म्हणुन दिसेल त्या कोंबडीत व बोकडात मला बिर्याणी व रस्सा दिसत नाही. कोंबडी व बोकडाची छोटी पिल्ले मला गोन्डस वाटतात, त्यांच्या जागी चमचमीत सुप दिसत नाही. मी फिश टँकमध्ये मासे पाळते व न चुकता त्याना खाऊ खायला घालते. त्याना बाहेर काढुन तळायचा विचार करत नाही.

भूतदया म्हणजे प्राणीमात्रांबद्दल प्रेम असणे, किमानपक्षी मी तरी तसेच समजतो.

>>>>>सर्वच प्राणिमात्राबद्दल असेल तर रस्त्यावर चालताना एखादा कुत्रा मागे लागला तर त्यान्ची प्रतिक्रिया काय असेल? घरात कबुतरे त्रास देत असतील तर ते कबुतर जाळी लावुन घेतात का? मुम्बैत सन्जय गान्धी उद्यानाच्या जवळ घर असेल आणि रात्री बिबट्या गेटवर येऊन बसत असेल तरी भुतदया शिल्लकित राहते का?

तुम्ही दिलेली सगळी उदाहरणं प्राण्यांकडून माणसांच्या आयुष्यात काहीतरी न्यूसन्स करत आहेत अशी आहेत. "बिबट्या माणसाला खायला आल्यावर तुमची भूतदया कुठे जाते?" हा विचित्र प्रश्न आहे.

म्हणजे मला इतर मनुष्यांबद्दल कणव वाटते- तर तुझ्या घरी आलेल्या चोराला चोरी का करू देत नाहीस टाईप प्रश्न झाला.

>>>>कोंबडी व बोकडाची छोटी पिल्ले मला गोन्डस वाटतात, त्यांच्या जागी चमचमीत सुप दिसत नाही.

मुद्दा समजला नाही. तुम्हाला ती मोठी झाल्यावर त्यात चमचमीत सूप दिसणारच आहे ना, मग लहानपणी गोंडस दिसण्याने काय फरक पडतो समजले नाही. पिल्लं गोंडस वाटण्याचा मुळात भूतदयेशी काहीच संबंध नाही- जर त्या क्युट वस्तू लहान लहान जागांमध्ये इनह्युमन परिस्थितीमध्ये वाढवून शेवटी शिजवून खायची हा प्लॅन फिक्स्ड असेल तर.

>>>>जे शाकाहारी असतात ते ही तथाकथीत भुतदया सर्वच प्राणिमात्राबद्दल बाळगुन असतात की केवळ कोंबडी,द्डुक्कर, म्हैस, बैल, बोकड याबद्दलच बाळगतात ?

डिपेंड्स. शाकाहारी असणे हे नैतिक भूमिकेतून असू शकते- कि प्राण्यांना मारून खाणे आणि वनस्पतींना खाणे यातला वनस्पतींना खाणे हा सर्वात नैतिक पर्याय आहे. तिथे प्राण्यांबद्दल प्रेम असेलच असे नाही. प्राणी मात्रांच्या प्रेमातूनच असे निर्णय व्हावेत असे काही नाहि.

https://youtu.be/Z3u7hXpOm58
हा व्हिडीओ मला आवडणारा आहे- व्हीगन होण्यासाठी सर्वात संयत आणि तर्कशुद्ध मांडणी.

शहरी ग्रामीण श्रीमंत गरीब नवरेशाही बायकोशाही पूर्णवेळ भूतदया ठराविक भूतदया अखिल प्रजातीय भूतदया वेगन मिश्राहार मांसाहार ... कोंबडी डुक्कर मासे बकऱ्या बिबट्या बस्स एवढंच !
अजुन खुप काही प्रवास (प्रतिसादांचा) बाकी आहे.

Feminist असणे हा खूप लोकांच्या पोटपण्याचा व्यवसाय आहे ते आपला संसार सांभाळून दुसऱ्याचा उथळून लावतात. लोकांना तत्व ज्ञान सांगणे खूप सोपं असते स्वतः तर ते पाळायचे नसते.

विरोधाभासी कथा छान आहे.

कथेत क्लियरली पाव भाजी उल्लेख असतानाही च्रप्स नी उग्गाच काडी टाकली आणि तमाम जनता पुरातन कालीन व्हेज नॉनव्हेज मुद्द्या वर बोलायला लागली. Wink

Feminist असणे हा खूप लोकांच्या पोटपण्याचा व्यवसाय आहे
>>>
हे सुद्धा कर्रेक्ट आहे. हल्ली सोशल मिडीया जसे फोफावलेय ते पाहता असे बरेच लघु उद्योग सुरू झालेत. कित्येक थोडेफार प्रसिद्ध कलाकार विचारवंत समाजसुधारकाचा आव आणत वादग्रस्त विषय छेडतात, बोल्ड विचार मांडतात आणि लोकांची जुंपवून देतात.

च्रप्स मला जोक कळला होता. जनरली आय टेक प्राईड इन माय EQ अ‍ॅट लीस्ट व्हेअर कॉग्निशन इज कन्सिडर्ड.

फेमिनिस्ट वरून चर्चा एकदम कोंबडी मासे आणि बिबट्यावर आलीये
हो नां लोकं एकदम "अ‍ॅनिमिस्ट" झालीत.

च्रप्स मला जोक कळला होता. जनरली आय टेक प्राईड इन माय EQ अ‍ॅट लीस्ट व्हेअर कॉग्निशन इज कन्सिडर्ड.
>>> थँक्स सामो - मी तुमच्याबद्धल म्हणत नव्हतो Happy

Pages