महाशिवरात्री (शशक)

Submitted by mi manasi on 10 May, 2022 - 00:01

महाशिवरात्री

देवळापुढे ५० माणसं रांगेत होती. प्रत्येकाच्या हातात दूध, फुलं. मी असं काही नेत नाही. फक्त पाणी होतं. मोठी रांग होती. उभी राहिले.

रांग सरकत होती. थोड्या अंतरावर एक कचरा वेचणारी, सगळा देह कचरा पेटीत घूसवून कचरा ढवळत 'सामान' शोधत होती. तिथे जवळच एका फटकुरावर तिचं ४/६ महिन्याचं मूल रडत होतं. इतकं की, त्याचे ओठ थरथरत होते.

कसंसच झालं. वाटलं, तिलाही झालंच असेल. पण काय करेल.

मी तिला आवाज दिला. ती बाहेर आली. विचारलं..
"ये सामानसे तुम्हे कितने पैसे मिलेंगे?"

म्हणाली.. "४०-५०"

मी ५० रु. दिले. म्हटलं..
अब मिल गये है ना..बच्चेको लेलो.
तिने हात जोडले..

देवळात मानवतेवर किर्तन सुरु होतं.

मी मानसी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. पहिल्या ओळीत 'मी असं काही नेत नाही. फक्त पाणी होतं.' हे वाचून वाटलं होतं की पाण्याचा काहीतरी सिग्निफिकन्स येईल पुढे. पण ठीक आहे. कथेतून चांगला संदेश दिलात.

असं झालंय खरं !
दूध असतं तर त्या बाळाला दिलं असतं पण कदाचित तिने काम सोडून ते पाजलं नसत.
नेत नाही कारण.. अशा गर्दीच्यावेळी सगळं एकावर एक घातलं जातं. नीट वेळ मिळत नाही. त्या व्यवसायावर कितीकांचे संसार चालतात म्हणून न्यायला हवं हे खरं !
प्रतिसादासाठी धन्यवाद !

>>>>>>>त्या व्यवसायावर कितीकांचे संसार चालतात म्हणून न्यायला हवं हे खरं !
हा!!! त्या पुजार्‍यांना नीट माहीत असते संसार कसे चालवायचे ते.
मी एकदा फुलांची माळ नेलेली हनुमानास घालायला, तर याने ती का ढून घेउन बळेच रुईच्या पानांची हातत कोंबली व नंतर पैसे मागत होता. तेव्हा ..... त्यांची चिंता इल्ले!

मी बाहेर सामान विकणाऱ्यांबद्दल म्हटलं आहे.. तुमच्यासारखा अनुभवही येतो. हे खरं आहे. पण..
जीवो जीवस्य जीवनम् !
आपण सगळेच अशा समाजव्यवस्थेचा भाग आहोत. करोना काळात याचा प्रत्यय आला. कोणी सन्मार्गाने मिळवतो कोणी लबाडीने.

मनापासून धन्यवाद !