चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दस्वी पहिला , खूप आवडला.
त्यातली पॉसिटीव्हिटी , फील गुड फॅक्टर मस्त आहे

---स्पॉइलऱ अलर्ट---
अभि बच्चन परीक्षे आधी अनपेक्षित पणे यामी ला नमस्कार करतो तो सीन आवडला
अभि ला सर्व जण सोप्या पद्धतीने शिवण्याचा प्रयत्न करत आहेत ते सीन्स पण आवडले
विशेषतः - निबंध लिहिताना "शिक्षा" हा विषय आधी दिसत नाही आणि नंतर दिसतो तो प्रसंग पण छान जमलाय ,

कथानक - पुढे काय होईल हि उत्सुकता टिकवून ठेवते , शेवट पण छान ..

ट्रिपल आर च्या रामचरणचा आचार्य ठरला सर्वात मोठा फ्लॉप.
वितरकांनी मागितली 50 कोटी रुपये नुकसानभरपाई
https://mulukhmaidan.com/acharya-flops-badly-at-box-office-distributors-...

मलाही दसवी आवडलेला.
फक्त बघताना तुम्ही "जाने भी दो यारो" चित्रपट जसा बघाल त्या नजरेने बघायची गरज.
अर्थात ही तुलना नाहीये. तो क्लासिक होता.

फायनली संदीप अँड पिंकी फरार बघायला मुहुर्त मिळाला, आज बघितला.

एकंदरीत आवडला, परीणीता फार गोड, ती आवडतेच आणि कामही सहज करते, इंप्रेसिव्ह एकदम. अर्जुन कपूर अति जाड वाटला, काम काही ठिकाणी आवडलं पण कधी कधी डायलॉगज काय बोलतो ते समजलं नाही. एकच सीन भयानक वाटला, अंगावर काटा आला, पुढे ढकलला.

ते लग्नपूर्व function फार फनी होतं.

संदीपची स्टोरी पूर्ण कळली. पिंकीची मला काही कळली नाही, तो पाताळलोक वाला हीरो यात व्हिलन आहे, तो याच्या का पाठीमागे लागतो. इंग्लिश सबटायटल्स होती पण मी अर्जुन कपूर डायलॉगज कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला, काही कळलं नाही.

तिच्या बॉसची बायको शेवटी जे वागते, ती तसंच करेल हे वाटलं होतं. पिंकी पिंक ड्रेस घालतो त्यामुळे धुकधुक वाटलेली पण मा बो वरच वाचलेले म्हणून एकीकडे तसं होणार नाही वाटलं.

शेवट आवडला. टिपिकल नव्हता पण दोघांसाठी सुखद होता.

मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस >> भारी होता एकदम! आम्ही आयमॅक्स ३डी मध्ये पाहिला त्यामुळे अजून मजा आली काही काही मल्टीव्हर्स मधले सीन्स बघताना.

मध्येक्ष राईमीची आर्मी ऑफ डार्कनेस वाली कॉमेडी येत होती किंवा ड्रॅग मी टू हेल सारखे हॉरर. मागचे वाँडा व्हिजन वगैरे न बघता सुध्दा वाँडा कोण आहे ते माहिती असताना कळला.

पिंकीची मला काही कळली नाही, तो पाताळलोक वाला हीरो यात व्हिलन आहे, तो याच्या का पाठीमागे लागतो.
>>>>पिंकी suspended असतो. परीच्या बॉसला तिला मारायचेच असते, मग पोलीस कमिशनर (बहुधा) पिंकीला पुन्हा सेवेत घेण्याचं आमिष दाखवून परीला आणायला पाठवतो. तसाही तो डिपार्टमंटला महत्वाचा वाटत नाही आणि मग प्लॅन मध्ये दोघांनाही मारणार असतात.
पिंकी त्यांच्या कारचे डिटेल न देता पुढच्या कारचे डिटेल देतो. त्याला सगळा प्लॅन लक्षात येतो आणि आपण कसेही करून वाचणार नाही हे त्याच्या लक्षात येते.
आणि हा eye witness समोर आला तर police department अडचणीत आले असते म्हणून त्याला मारायला टपलेला असतो
पाताळलोक वाला

पिंकी suspended असतो >>> ह्याचं कारण समजलं नाही.

आणि हा eye witness समोर आला तर police department अडचणीत आले असते म्हणून त्याला मारायला टपलेला असतो >>> हा हा, करेक्ट. हे लक्षात आलं नव्हतं.

बाकी लिहिलेलं सर्व समजलं होतं.

थॅंक यु आबा.

डॉक्टर स्ट्रेंज-इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस >>> टोटल मॅड आणि जरासा डार्क आहे. मज्जा आली पहायला. एक जंपस्केअर विशेष आवडलंय पण स्पॉयलरभयास्तव लिहीत नाहीये Proud

थर चांगला आहे कि पिक्चर. हाच हॉलीवूडचा असता तर काय भारी म्हणत बघितला असता. अनिल कपूरचा मुलगा बॉलिवूडचा नेक्स्ट सुपरस्टार होऊ शकतो. दिसायला मस्त आहे. अ‍ॅक्शन हिरो पण वाटतो. टोटल पॅकेज आहे. डान्स बिन्स तर शिकेलच. कपूर आहे तो.
रणवीर/बीर बोअर झालेत आता.

झुंड बघितला झी ५ वर.
खूप आवडला. थोडी लांबी जास्त आहे पण चालून गेलं.
मंजुळेचे नेहेमीचे फेवरेट चेहेर दिसले.
अंकुश झालेल्या मुलाचं काम भारी आवडलं. सगळी गँग खरंच झोपडपट्टीमधली असावी. टीपिकल मंजुळे स्टाईल आहेच. पण यावेळी यात म्युझिकचा फारसा प्रभाव जाणवला नाही.

झुंड शनिवारी अर्धा पाहिला. नाईलाजाने सोडावा लागला. अन्यथा फूटबॉल मॅच रंगात आलेली.. तिथून पुढे स्टोरी काय जाते याची उत्सुकता आहे.. कदाचित खरा पिक्चर पुढे असावा. हिरो हिरोईनची लव्हस्टोरी कशी पुढे जाते वा जाते की नाही याचीही उत्सुकता आहे.. शेवट तसेही ईथे फुटलाय. त्यामुळे त्याची उत्सुकता कमी आहे.

मागे कुठल्या तरी पानावर 'वास्तुपुरुष' ओटीटीवर नाही अशी चर्चा झाली होती. रिलायन्स जिओ च्या जिओ सिनेमा या ॲपवर तो उपलब्ध आहे. (पण बहुतेक त्यासाठी जिओचा नंबर असणं आवश्यक आहे)

थर आवडला. वेस्टर्न सारखा वाटला. ओटीटी वर पाहण्यासारखा आहे. थेटरात पैसे खर्च करून नसता पाहिला. अनिल कपूरचे पात्र लिहिलेय छान.
हिंसा बघवत नाही. अमानवी आहे. अनावश्यक बेडसीन असल्याने बाप ज्या सिनेमात आहे त्यातच मुलाला असा सीन करायला लावतात कि काय असे वाटले होते.
त्याचे डोळे सोनम कपूर सारखेच आहेत.

त्याचे डोळे सोनम कपूर सारखेच आहेत. >>> बोलताना तोंडाची, जबड्याची हालचालही तिच्यासारखीच आहे.

हो, हिंसा अमानवी आहे. इतका रक्तस्त्राव होऊनही माणूस जिवंत राहू शकतो का, असा प्रश्न पडला. म्हणूनच त्या सिद्धार्थचा वावर तसाच इन्टेन्स असायला हवा होता, जो १० टक्के सुद्धा जमलेला नाही. भावना मेलेला मनुष्य दाखवायलाही अ‍ॅक्टिंग करावीच लागते.

नेटफ्लिक्सवर A Simple Favor पाहिला. थ्रिलर + कॉमेडी असं जबरी कॉम्बो आहे. सगळ्यांचीच कामं अप्रतिम झाली आहेत. अगदी शाळेतल्या मुलांचे तीन पालकही मजा आणतात. दोन छोटी पोरंही भारी गोड आहेत. ब्लेक लाईवली काय भारी दिसते. चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो आणि गेस करत ठेवतो. नक्की बघा. लहान मुलांसाठी नाहीये हा सिनेमा. (रेटिंग A आहे)

A Simple Favor बघणेबल आहे.

दोन छोटी पोरंही भारी गोड आहेत. ब्लेक लाईवली काय भारी दिसते. >>>> +1000000
तिचं घरही भारी आहे.

मागे कुठल्या तरी पानावर 'वास्तुपुरुष' ओटीटीवर नाही अशी चर्चा झाली होती. रिलायन्स जिओ च्या जिओ सिनेमा या ॲपवर तो उपलब्ध आहे. (पण बहुतेक त्यासाठी जिओचा नंबर असणं आवश्यक आहे) >>> हा बघायचा आहे, नवऱ्याकडे आहे जिओ पण मला मोबाईलवर बघावा लागेल, मला ते असह्य होतं. मी youtube वगैरे पण डेस्कटॉपवर बघते.

रवींद्र मठाधिकारी (धुंद रवी) ने लिहीलेला लकडाऊन ओटीटी वर आला आहे. या वीकएण्डला मुहूर्त मिळू दे हीच प्राईमचरणी प्रार्थना.

पहिल्या दिवशी लकडाऊन दहा मिनटांत बंद केला.
दुसऱ्या दिवशी पुढच्या दहा मिनिटात बंद केला..आता नाही बघणार..पांचट जोक्स, बोरींग अभिनय.

काल हा सिनेमा सापडला तेव्हां योगायोगाने दहाच मिनिटे पाहता आला. चांगला वाटला. वेळात वेळ काढून थोडा वेळ अजून पहावा लागेल.

पसंद अपनी अपनी. काहींना बॉडी शेमिंग व तत्सम हीन अभिरूचीचे विनोद अजिबात आवडत नाहीत पण दक्षिणेत ही गोष्ट खूप कॅज्युअली घेतात. त्यांच्याकडे बॉडी शेमिंगवरच जास्त भर असतो. दुसरा पुरूषसत्ताक विनोदाचा. हिरॉईन बिनडोक असते आणि हिरो तिला वठणीवर आणतो हे खूप कॉमन असतं. बॉलीवूडमधे ऐंशीच्या दशकापर्यंत होतं ते. क्वचित किंवा सहजच आलेला विनोद चालू जातो . पण मुद्दामून केले जाते आणि बरेच जण आवडीने बघतात ते.
https://inmathi.com/2022/04/02/in-tamil-cinema-body-shaming-makes-for-gr...

https://www.deccanherald.com/living/as-you-like-it-722615.html

@च्रप्स, असंच वाटायला लागलंय खरं...

एकतर मराठीत काही छान बघायला मिळत नाही नवीन काही बघायला जावं तर असा हिरमोड होतो.
काल प्राईमवर ग्रे पण पंधरा मिनटं पाहिला..वैभव तत्ववादी च्या फैमिली ला मारतात त्या सीनपर्यंत..काहीच थ्रीलींग नाही, मला वाटलं सगळे बेशुद्ध पडलेत आता उठतील पण नाही ते मेले होते..गुंडांना बघून हसू येत होतं..जाऊ द्या, सोडला तो पण सिनेमा अर्ध्यावर.

Pages