चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिलन तिच्यावर अटॅक करतो , ती बेशुद्ध पडते, व्हिलन गैरकृत्य करणार असतो, तेवढ्यात तिचे पहिले मूल पाळण्यात असते ते रडू लागते, त्याने व्हिलनचे हृदयपरिवर्तन होते व तो निघून जातो

ती बेशुद्ध पडलेली असते , तोवर नवरा येऊन जे करायचे ते करून जातो.

मग ती दुसर्यादा प्रेग्नन्ट होते , तिला नवरा येऊन गेल्याचे माहीत नसते , तिला वाटत रहाते हे दुसरे मूल व्हिलनचे आहे.

शेवटी व्हिलन नवऱ्याला खरे ते सांगतो , की मी काही नाही केलेले.

कसलं ढेकळाचं रहस्य

तेंव्हा डीएनए टेस्ट नव्हत्या की काय.

गाणी मात्र चांगली आहेत. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली .

मराठी सस्पेन्स सिनेमे पाठलाग आणि हा खेळ सावल्यांचा हेच दोन अगदी माईल स्टोन आहेत

पडछाया दिगदर्शन , चित्रीकरण यात खिळवून ठेवणारा होता, पण शेवटी अगदीच फुसका होता,

आता नक्की काय घोळ आहे तो समजलाच पाहिजे आम्हाला. कुणीतरी रहस्यभेद करा. Happy
बाकी एक मूल तुझं नाही हे सांगितल्यावर मनस्ताप हे ठीक पण मग दोन्ही त्याचीच आहेत हे नंतर कळले तर इज दॅट सपोज्ड टू बी अ रीलीफ? असा प्रश्न पडला Happy

असे एक सुशि लिखीत पुस्तक पण आहे.तो नवरा बायकोशी जाम वैतागवाडी कोरडे आणि रुड वागत असतो.शेवटी ती मरताना त्याला एक पोर तुमचे नाही सांगून डोक्याला भुंगा देऊन जाते.

ती बेशुद्ध पडलेली असते , तोवर नवरा येऊन जे करायचे ते करून जातो.
मग ती दुसर्यादा प्रेग्नन्ट होते ,
>>>>>>>

हे खरेच लिहिलेय की गंमतीने? नवरा का असे बायको बेशुद्ध असताना करून जातो?

पिक्चरचे कथानक तसे आहे >>> ओके. पण का? म्हणजे बायको शुद्धीत असताना त्याच्याशी फटकून वागणारी असते का? बेशुद्ध पडलेल्या बायकोला पहिले शुद्धीत आणायला तिच्या तोंडावर पाणी मारणार की तिला प्रेग्नंट करणार? की त्याला वाटते ती कामाच्या थकव्याने झोपली आहे गाढ? उठवून त्रास नको देऊया..

मला फक्त कणेकरांचा डायलॉग आठवतो. ती बाई मरताना म्हणते की एक मूल तुझं नाही... पण तो दिवा लपलपायच्या आत असं सांग की बबड्या तुझा नाही, किंवा बबडी त्या शेजार्‍याची आहे. कन्फ्युजन कशाला टाईप.
>> इज दॅट सपोज्ड टू बी अ रीलीफ?>> अहो ती आश्शा काळे (म्हणजे ती असेल तर... असल्या पिक्चर मध्ये डोळ्यासममोर पदराच्या अणुकुचीदार टोकाने डोळ्यात न आलेलं पाणी टिपणारी आश्शा काळेच येते) अर्धवट रहस्य भेद केल्याने रहस्यभेदविदग्ध गेली ढगात. त्या पटकथाकाराने भारतीय संस्कृती टिकवायचला त्या बायकोला आणि व्हिलनला दोघांना शुचिर्भूत करण्या इतके सव्यापसव्य केले, आणि तुम्हाला त्या सगळ्या वरुन बोळा फिरवायचा आहे का?
सपोज्ड टू बू रिलीफ म्हणे! Proud भारतीय संस्कृतीला रीलीफच! Proud

Proud

सिक्वेल काढा

युट्युब , गुगल , विकिपीडिया , डॉ घाणेकर , रमेश देव विकिपीडिया सर्च केले , कुठेच काही नाही

युट्युबवर तर chaya , chhaya , chhaaya , सगळे टाकले तर गाणी तेवढी येतात

एक फक्त 04 मिनिटांची क्लिप आहे , पण त्यात तो रहस्यमय भाग नाही , त्याचे म्युझिक मात्र मस्त आहे , राग मुलतानी वाटतो

https://youtu.be/BkPX3AQDfVY

>>> ती बेशुद्ध पडलेली असते , तोवर नवरा येऊन जे करायचे ते करून जातो.
नाही नाही, तसं काही नाही. पण तिला दरोडेखोराने ती बेशुद्ध असताना काहीतरी केलं असेल असा डाउट असतो.
पॅटर्निटी टेस्ट्स नसतील अव्हेलेबल त्यांच्या गावात, किंवा ही बाब षट्कर्णी होऊ नये असं वाटत असेल - काय की!

असे एक सुशि लिखीत पुस्तक पण आहे

बहुतेक बंदिस्त की बंदिनी असे काहीतरी नाव आहे

त्यात हिरोईन मरताना तसे खोटे बोलते , एक मूल दुसर्याचे आहे म्हणून , पण लगेच तिचे परिवर्तन होते

ती पुन्हा खरे बोलायचा प्रयत्न करते , पण तोवर तिची वाचा व शुद्धी जाते व ती मरते

मरतानाही तिची स्वतःची मर्जी तिच्याच देहावर चालत नाही , ती बंदिस्तच रहाते असा काहीतरी सुशी टाईप शेवटचा डायलॉग आहे.

तेच पुस्तक ना ?

https://www.storytel.com/in/en/books/bandista-1027488

>>> बाई माझी करंगळी मोडली
हो, बरोबर. आणि रमेश आणि सीमा देव यांनी भावंडांचे रोल केलेला एकमेव सिनेमा बहुधा. Happy

पडछाया छान होता. ब-यापैकि गाजलेला. रहस्य छान टिकवलेले, व्हिलन विशिष्ट हॅट घालायचा त्यामुळे हिरोइन तसली हॅट घस्तलेल्याची पडछाया बघितली तरी घाबरायची.

भावना व रमेश देव रोलमध्ये व आपले महाग्रु त्या दोन पोरान्पैकी एक. ज्याचे चालचलन पाहुन त्याच्या बाबाला हा पोर्गा आपला नसणार हा सन्शय येत राहतो. बहुतेक हिरोइन आधी तमाशात किन्वा नाटकात काम करणारी असते व तिथला कोणीतरी तिच्या मागावर असतो. लग्नानन्तर एका प्रयोगासाठी किन्वा असेच काहीतरी कारणासाठी ती गेली असताना तो तिला गाठतो. त्याला पाहुन किन्वा त्याचा प्रतिकार करताना ती बेशुद्ध होते. तो रडणा-या मुलाला पाहुन विचार बदलुन निघुन जातो पण हिला वाटते आपल्यावर बलात्कार झाला. नवरा तितक्यात येतो का ते आठवत नाही. चित्रपट जेव्हा पाहिला तेव्हा मी अन्ड्यात होते, मुले कशी होतात हे माहीत नव्हते. त्यात मराठी चित्रपट सोवळ्यात आणि हा तर रहस्यपट, म्हणजे तिकडुनही काही मदत नाही.. त्यामुळे चित्रपट प्रत्यक्ष पाहुनही त्यातले रहस्य उलगडायला मला काही वर्षे जावी लागली. Happy Happy

असाच एक उषा नाईकचा चित्रपट होता. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…. गाणे असलेला. त्यातही ती मरताना नव-यामागे असाच काहीतरी भुन्गा लाऊन मरते.. बिचारे नवरे, बायको मेली याचे दुख करावे की असले भुन्गे सोडवत बसावे… Happy

पॅटर्निटी टेस्ट्स नसतील अव्हेलेबल त्यांच्या गावात
>>>>
मायबोलीही नसावी कदाचित त्या काळात. अन्यथा कुमारसरांच्या धाग्यावरील प्रतिसाद वाचूनही अज्ञान दूर झाले असते..

महागुरू ओव्हरऑल च नशीबवान आहेत...
बाल कलाकार म्हणून , जवानीत ... आणि आता आणखी जवानीत...
असा नट होणे नाही...

Pages