आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

काय लिहिलंय??
अनेक शेतकरी स्वतः ऑरगॅनिक फार्मिंग करतात. त्यांचे प्रॉडक्ट लोक जास्त पैसे देऊन विकत घेतात. कुलकर्णींचा ऑरगॅनिक आणि जीएमओला विरोध आहे का?
कमाल जमीनधारणा वगैरे काही नियम आता नाहीत का? बिल गेट्स प्रचंड प्रमाणात शेतजमिन घेत सुटला आहे.

> अनेक शेतकरी स्वतः ऑरगॅनिक फार्मिंग करतात. त्यांचे प्रॉडक्ट लोक जास्त पैसे देऊन विकत घेतात.

त्यात काही चूक नाही. पण वंदना शिवा सारखे लोक केवळ ऑरगॅनिक प्रॉडक्ट प्रमोट करून थांबत नाहीत. ते आधुनिकतेला थेट विरोध करून बंदीच घलतात. जगाची लोकसंख्या ७०० करोड च्या आसपास आहे. पूर्ण ऑरगॅनिक केले तर जेमतेम ६०० करोड लोकांनाच पुरेल इतके अन्न तयार होईल. उरलेल्या १०० कोटी लोकांना आत्महत्या करावी लागेल. ऑरगॅनिक फूड च्या उदात ध्येयासाठी स्वेच्छेने आत्महत्या करू इच्छिणार्‍या लोकांची यादी करूयात का ?

ऑरगॅनिक फूड हे एक बोगस फॅड आहे असे माझे मत आहे, पण एखाद्या देशाने यावर बंदीच आणावी असे मी सुचविणार नाही.

कीटक नाशक चा वापर,रासायनिक खतांचा वापर,हायब्रीड बियानाचा वापर सुरू झाला म्हणून शेती उत्पादन वाढले हे अर्धं सत्य आहे.
सिंचनाच्या सुविधा,विजेची सुविधा,शेतकऱ्याची भांडवल गुंतवणूक करण्याची क्षमता(सरकारी अनुदान,शेती कर्ज ह्या मार्गाने किंवा स्व क्षमता)ही कारण पण शेती उत्पादन वाढण्यास जबाबदार आहेत.
हे पूर्ण सत्य आहे .
४० वर्ष पूर्वी ची शेती मला चांगली आठवत आहे.
तेव्हाच काळ हा परिवर्तनाचा काळ होता आणि त्याचा मी साक्षी पण आहे.
प्लस पॉइंट तेव्हाचे.
रोगाला सहज बळी न पडणारे नैसर्गिक उत्क्रांती मधून निर्माण झालेले देशी वान.
योग्य हवामान,पावसाचा लहरी पण आता पेक्षा कमी.
आता उलट हवामान मध्ये प्रचंड बदल होत आहे .त्या पिकांवर रोग पडण्याचे प्रमाण पण जास्त आहे .
विपरीत हवामान मुळे उत्पादन वर पण परिणाम होत आहे...
हायब्रीड बियाणे चे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत .
फक्त फायदे नसतात.

ओके. Environmentalists अनेकदा टोकाच्या भूमिका घेतात. पण वंदना शिवा यांचे बरेचसे मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. बिल गेट्सभटजीला तर तिने पूर्णच परदाफाश केला आहे.

इम्रान खान चं काय झालं आणि?
भारतीय पुरोगामी पदराचा/शर्टाचा बोळा तोंडात खुपसून स्फुंदून स्फुंदून रडतील की काय आता. किती लाडका होता तो त्यांचा. स्टेट्समन काय नी केअरिंग काय.

जेव्हा तो पाकिस्तान चा पंतप्रधान झाला तेव्हाच त्याचा पुढे बँड वाजणार हे निश्चित होतं. कसलेले राजकारणी तेथील लष्करासमोर टिकू शकले नाहीत, हा तर फक्त क्रिकेटपटू होता मग याची गठडी बांधायला त्यांना किती वेळ लागणार ?
बरं हा उठसुठ शासकीय प्रक्रियेत जनतेला दखल द्यायला प्रवृत्त करत असतो केजरीवाल प्रमाणे . आणि तेथील जनताही त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत चेकाळत निघाली इस्लामाबाद ला!
नुकतेच तेथील न्यायाधीशांनी संसद बरखास्त करण्याचा इम्रान चा निर्णय अवैध ठरवला असता इम्रानने विरोधदर्शवण्यासाठी उन्मदित लोकांना बोलावले .

काल तर तेथील विरोधी पक्षांनी इम्रानला टोले लागवताना भारतात वाजपेयींनी एक मताने सरकार पडू दिले , पण भारतीय घटना हायजॅक केली नाही हे उदाहरण दिले !
हे आपल्या पुरोगाम्यांच्या नजरेतून निसटले असावे !

रात्री 12 वाजता अविश्वास प्रस्ताव पास होऊन इम्रान ला विरोधकांनी हाकलून दिले .
लष्कराची नखे लागलेल्या पाकिस्तान मधील इथून पुढील राजकीय घडामोडी बाबत उत्सुकता आहे .

सिद्धू एक मोठी पनौती असल्याचे सिद्ध झाले !
पंजाब च्या कॅप्टन नंतर पाकिस्तानच्या कॅप्टन ला देखील घालवले .
आता सिद्दु ने पुढील टार्गेट केजरीवाल आणि ममता बेगम धरायला हरकत नाही .....

वंदना शिवा या शेतकरी नाहीत, त्यांनी शेतात जाऊन कधी काम केलेले नाही. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर नाही. >> अॉफ कोर्स त्या शेतकरी नाहीत! पण त्यांची नवधान्य नावाची एक संस्था आहे ज्याच्या माध्यमातून त्या भारतभरातील शेतकऱ्यांना तिथली स्थानिक वाणे जपण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी मदत करत असतात. त्या संस्थेचा देहरादून जवळ कँपस आहे जिथे सेंद्रिय शेतीमधले प्रयोग चालू असतात. त्या स्वतः शेतकरी नसल्या तरी त्यांचा शेतीशी निकटचा संबंध आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांविषयीचे भारतीय धोरण ठरविण्यात मोलाचा वाटा आहे. भारतात सीड पेटंट होऊ शकत नाही. अमेरिकेत जी शेतीची आणि जमिनीची वाट लागली आहे त्या साठी या माँन्सँन्टो, बायर कंपन्यांच्या लॉबीने आपल्या बाजूने वाकवून घेतलेले कायदे जबाबदार आहेत. आपल्या सुदैवाने वंदना शिवा यांच्या सारख्या जागरूक आणि निसर्गाचे भले चिंतणाऱ्या व्यक्तींमुळे या लॉबीला भारतात अजूनतरी मुक्तद्वार मिळालेले नाही.
राउंडअपचे आणि रासायनिक शेतीचे भयानक दुष्परिणाम होतात.
अन्नसुरक्षेचा बागुलबुवा दाखवून या कंपन्या निसर्गाची आणि माणसांच्या आरोग्याची प्रचंड हानी करत आहेत. जगातील सर्व लोकांना आरोग्यदायी, सकस आहार सेंद्रिय शेतीतून मिळेल हे निश्चित पण त्यातून नफेखोरी करता येणार नाही.
If you stop externalizing the cost to the environment and human health in today's industrial, chemical agriculture then you will not be able to feed even 10% of the world's population today with the current agricultural practices.
Vandana Shiva has proposed the concept of "health per acre" and "nutrition per acre" instead of "yield per acre" which is quite revolutionary.
विकु, वंदना शिवा यांच्या बद्दल तुम्हाला जी माहिती आहे ती फार एकांगी आहे असं मला वाटतं. त्या बोगस नाहीत. भाषणांमध्ये बोलण्याच्या ओघात त्यांच्या कडून तपशीलाच्या चुका होतात हे मला माहीत आहे. पण आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांचे डावपेच त्या अचूक ओळखतात. She is also familiar with the inner workings of the international organizations such as WTO, UN etc. I always watch out for what she says, for she is one of the very few people who have such vision and clarity.

पाकिस्तान मध्ये लष्कर खूप जास्त हस्तक्षेप करते तेथील लोक नियुक्त सरकार पेक्षा लष्कराचा प्रभाव च सत्तेत जास्त आहे.
त्या मुळे अनेक वेळा लष्कर नी लोकनियुक्त सरकार ल अडचणीत आणले तरी अजून तिथे
खुले आम लष्करी राजवट आली नाही हे त्यांचे नशीब च.
भारतात लष्कर राजकारणात हसत्क क्षेप करत नाही.
राज्य घटनाच त्यांना तसे अधिकार देत नाही.
म्हणून तर जाणती लोक सांगत अस्तात.
लष्कर वरून राजकारण करू नका.
लष्करी कारवायांचा उपयोग राजकारण साठी करू नका.

Screenshot_20220410-121728_Twitter.jpg
हा झाला विनोद !
तरीपण धर्मावर आधारीत देशाचे दोन तुकडे केल्या बद्दल या दोन्ही महात्म्यांचे उपकार भारतीय बहुसंख्य जनता कधीच विसरणार नाही .

> जगातील सर्व लोकांना आरोग्यदायी, सकस आहार सेंद्रिय शेतीतून मिळेल हे निश्चित पण त्यातून नफेखोरी करता येणार नाही.
हे जरा त्या वेड्या श्रीलन्कन लोकाना समजावून सांगाल का ? ते कधी नव्हे ते तांदूळ आयात करत आहेत.

ऑर्गॅनिक शेतीवर बंदी आणा असे आम्ही कुठेही म्हणत नाही पण वंदना शिवा सारख्या लोकांनी भारतात बीटी वांगी आणू दिली नाहीत. त्या वांग्यांना किटकनाशके कमी लागतात. किटक नाशक कम्पन्यांनी वंदना शिवांचे उपकारच मानले पाहिजेत. गोल्डन राईस लाही विरोध. कापसा बाबत सुदैवाने शेतकर्‍यांनी शिवा यांचे ऐकले नाही व आज भारतात ९०% पेक्षा जास्त कापूस हा बीटी आहे. भारत आज कापूस निर्यात करतो. काही शेतकर्‍यांनी कायदे भंग आंदोलन म्हणून बीटी वांगी लावली तर थयथयाट केला. ( त्यंचा चेहरा कुंडलिनी फेम निर्मला मातांसारखाच दिसतो, कल्ट च म्हणायचा हा एक ! :))

एक कळत नाही, ऑर्गॅनिक शेती इतकी भारी असेल तर शेतकरी ती करतीलच की, त्यंच्यावर जबरदस्ती का ?

असो हे विषयांतर होते आहे.

विकु, रासायनिक शेती (बीटी कॉटन सकट) मधल्या अनेक घटकांची किंमत externalize केलेली असते. म्हणून ती आज किफायतशीर असली तरी शाश्वत नाही. कारण आज ना उद्या तुम्हाला त्या externalize केलेल्या गोष्टींची किंमत मोजावी लागेल.
श्रीलंकेने केलेल्या धोरणात्मक चुका लक्षात न घेता तुम्ही सेंद्रिय शेतीलाच नावे ठेवता आहात. हे काही योग्य नाही.

जिज्ञासा
जी तुमच्या मता शी सहमत आहे बीटी बियाणे म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही.
पण बिया मध्ये जेनेटिक बदल करून त्या पिकाचे गुणधर्म बदलायचे असा काही तरी प्रकार असावा.
पण संकरित बियाण्या विषयी मी माझे मत मांडू शकतो.
दोन जातीचा संकर करून नवीन जात निर्माण करणे म्हणजे संकरित बियाणे.
इथे पण गुणधर्म बदलतात पण पूर्णतः अनैसर्गिक नसतात.
पण bt बियाण्यात पूर्णतः कृत्रिम रीती ने बदल केला जातो.
पारंपरिक बियाणे तुम्ही किती ही वर्ष वापरू शकत होता पण संकरित बियाणे तसे वापरता येत नाहीत उत्पादन क्षमता ती मिळत नाही.
त्या मुळे दर वर्षी तुम्हाला नवीन बी खरेदी करावे लागते.
ते तुम्ही घरी निर्माण करू शकत नाही.
Bt बियाणे तर त्या पुढची स्टेप झाली .
त्या पिकांचे बीज रुजणार च नाहीत .
तुम्हाला प्रतेक वेळी खरेदी करावेच लागेल.
परत ती निर्मिती करणारी कंपनी कोणते जीन्स बदलेल हे माहीत पडणार नाही त्या वर तुमचे नियंत्रण नसेल.
त्या मुळे जमिनी ची नासाडी पासून पर्यावरण हानी पर्यंत .
आणि अन्न धान्य चे पोषण तत्व कमी होण्या पासून माणसाला हानिकारक ठरतील असे अन्न धान्य .
निर्माण होण्या पर्यंत काहीही ही होवू शकत.
परत स्वामित्व हक्क हा कायदा डोक्यावर बसेल ते वेगळे.
आपल्या पारंपरिक बियाना वर कोणीच हक्क सांगू शकत नाही.
आपण आपल्या मनाचे राजे आहोत.
पण bt बियाणे शेतकऱ्यांचे स्वतंत्र पण हिरावून घेवू शकते.

त्या वांग्यांना किटकनाशके कमी लागतात. किटक नाशक कम्पन्यांनी वंदना शिवांचे उपकारच मानले पाहिजेत. गोल्डन राईस लाही विरोध. कापसा बाबत सुदैवाने शेतकर्‍यांनी शिवा यांचे ऐकले नाही व आज भारतात ९०% पेक्षा जास्त कापूस हा बीटी आहे. भारत आज कापूस निर्यात करतो
>> कॉस्ट काय?
अमेरिकेत GMO च vaan विकत घेत रहावं लागतं.
बिया गोळा ना करता येणं.
स्वतः: g m o वापरलं नसेल आणि पोलिनेशन मुले जरी संस्कार झाला (जो होणारच) तरीही बिया कंपलासरी विकत घ्यायला लागण, त्यामुळे शेतकऱ्यांची लागलेली वाट,
मुख्य म्हणजे जाणारी स्वायत:ता
हे सगळं त्यांच्या प्रयत्नाने टळत आहे ह्याकरता मी त्यांची शतश: ऋणी आहे!

अगदी साधं उदाहणादाखल.
नैसर्गिक रीती नी उत्क्रांत झालेली स्थानिक आंब्याची झाडे ह्यांचे उदाहरण देता येईल.
ही झाडे खूप मोठी होतात,उंच वाढतात पण आणि पसरतात पण
त्यांचे आयुष्य पण 100 ते 150 वर्ष असते.
एका झाडाला पाच सह हजार (जास्त च पण कमी नाहीत)आंबे येतील इतके ते मोठे
असते.रोगाला बळी पडत नाहीत.
पाणी कमी पडले तरी त्यांच्या फळं देण्यावर फरक पडत नाही.ते स्वतःची सोय स्वतः करतात.
प्राण्यांना सावली,अनेक पक्षांना घर, चारा सर्व पुरवतात.
आता ची संकरित आंब्याची झाडे आकाराने खूप लहान असतात.त्यांचा आकार लहान म्हणजे फळं पण एका झाडाला कमी च मिळतात.
रोगाला बळी पडतात.
वय वीस ते पंचवीस वर्ष पण नसते.

त्यावेळी दात अंबायचे हो ते मोठ्या झाडाचे आंबे खाऊन !
आणि पूर्ण सिझन मध्ये काधितरी पायरी चा रस केला की खूप श्रीमंत असल्याचे फील यायचे !
आता त्या पेक्षा संकरित हापूस बरा .

नानबा व जिज्ञासा, तुमची कळकळ प्रामाणिक आहे याबदल शंका नाही, तुमच्या प्रश्नांना उत्तरे नंतर देइन, अर्थातच माझे मत नवीन माहिती आली तर बदलू ही शकेल. एकेकाळी मीही दिलीप कुलकर्णी फॅन होतो ( आजही आदर आहेच ). भारतात बीटी कापसाच्या बिया महाग असत्या तर इतक्या प्रचंड प्रमणात शेतकर्‍यांनी विकत घेतल्या असत्या का? शेतकरी मूर्ख आहेत व आम्ही शहाणे या दंभातून तर हे आलेले नाही ना? शरद जोशींची शेतकरी संघटना ही खरी आहे, त्यांचे विचारही वाचा. मुळात आज आपण भारतात जी वांगी खातो त्यावर अक्षरशः भरमसाठ किटकनाशके असतात हे माहित आहे का?

बरेच लोक आयटीत आहेत , एक उदाहरण देतो. समजा तुम्ही इन्फोसिस मधली चांगली नोकरी सोडली व दोन वर्षे घरीच मेहेनत करून बँकिंग सॉफ्ट्वेअर बनवले व एका ब्रँच ला दहा लाख या रेट ने विकायला सुरुवात केली. तुमच्या एका कस्टमर ने ते कॉपी करून दहा ब्रँच ला वापरले तर ? दुसर्‍याने कॉपी करून एकेक लाखात विकायला सुरू केले तर ? तुम्हाला ते मान्य असेल ?

पेटंसी ही अनंत काळ मिळत नाही

त्याची रिसर्च कॉस्ट , प्रॉफिट मार्जिन पकडूनच सरकार अरबीट्रेरेशन करते , पेटनसीचा काळ व किंमत ठरवली जाते, नंतर हळूहळू मार्केतात इतर कँपन्यांना परवानगी मिळते व किंमतही कमी होते.

पाकिस्तानी मीडियात इम्रानला जनरल बाजवा ने थोबाडीत मवरल्याची चर्चा आहे !
पी एम ला असे मारू शकतात ?

विकु, कसं आहे की सेंद्रिय शेतीची स्पर्धा ही खूप प्रकाराने सबसिडी मिळालेल्या रासायनिक शेतीशी आहे. त्यामुळे त्यात तात्कालिक आर्थिक फायदा हा रासायनिक शेती करून मिळतो यात शंका नाही. India is set to spend $40 billion on fertilizer subsidies in the coming year. हा भारतीय करदात्यांचा पैसा आहे. जर ही सबसिडी देणे बंद केले तर रासायनिक शेती परवडेल का? शिवाय या रसायनांमुळे होणारे प्रदूषण, आपल्या आरोग्यावर परिणाम यांची किंमत पकडली तर रासायनिक शेती किती परवडणारी आहे हे लक्षात येईल.
नानबा म्हणतेय तसं GMO बियाणासाठी शेतकऱ्याला कायमस्वरूपी कंपनीवर अवलंबून रहायला लागतं. Seed sovereignty is equal to food security.
अर्थात जे श्रीलंकेने केलं ते चूक आहे. हा खूप मोठा बदल इतक्या कमी वेळात आणणं हे कधीच यशस्वी होणार नव्हते.
भारतात असे बदल लादले जाऊ नयेत. सेंद्रिय शेतीला योग्य त्या सबसिडी दिल्या जाव्यात आणि रासायनिक खतांवरील सबसिडी हळूहळू कमी करत न्याव्या. Try to create an equal playing field for all types of agricultural practices and then eventually we can switch to a more sustainable model.

जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी(ह्या मिळाल्या नाहीत तर माणूस जगू च शकत नाही)
हया मध्ये अन्न,पाणी,आणि हवा हे अती अती गरजेच्या गोष्टी आहेत.
आणि जगायला साह्य करणाऱ्या आवश्यकता असलेल्या गोष्टी(ह्या नसल्या तरी माणूस जगू शकतो फक्त जीवन मानात फरक पडेल)
हे तरी समजून घ्या .
ह्या दोन्ही ची तुलनाच होवू शकत नाही.
कधी कधी असे टोकाचे लिहावे लागते.

Shiva also says that Monsanto’s patents prevent poor people from saving seeds. That is not the case in India. The Farmers’ Rights Act of 2001 guarantees every person the right to “save, use, sow, resow, exchange, share, or sell’’ his seeds.

बीटी वांग्यावर इथे घमासान चर्चा होउन दहा वर्शे झाली ! बांगलादेश ने बीटी वांगी आणली व ती यशस्वीही झाली.
खोटे बोल पण रेटून बोल हे शिवा यांचे जीवनविषयक सूत्र आहे !

Anti-GMO activists succeeded in getting authorities to destroy the unapproved Bt eggplant crops, and leading Indian activist Vandana Shiva called the farmers “criminals” and demanded that they be given jail sentences for their civil disobedience campaign.

Undeterred, Shetkari Sanghatana stepped up its efforts,and this week held a showcase event at Hiwari village in Yavatmal, Maharashtra, in order to demonstrate the effectiveness of the unapproved cotton seeds.

“We want to show it to everyone that the use of herbicide tolerant cotton is quite beneficial for farmers as it not only gave us higher yield but also cut our cost substantially,” farmer Vijay Niwal of Hiwari village told the Indian press.

The farmer group has also reportedly begun distributing a second generation of GM cotton seeds to its members, again in defiance of the authorities.

The use of GMOs in India is also opposed by far-right organizations such as the RSS-affiliated Swadeshi Jagran Manch, which is linked to the Hindu nationalist government led by current prime minister Narendra Modi.

विकु, हा तुमच्यासाठी केवळ राजकीय विषय आहे असं दिसतंय. त्यामुळे मी कितीही arguments केली तरी ती तुम्हाला पटायची नाहीत. पण हा माझ्यासाठी विज्ञान आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित विषय आहे. दहा वर्षे म्हणजे ecological time scale वर काहीच नाही. १९३९ साली डिडिटी चा pesticide म्हणून उपयोग लक्षात आला आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. डिडिटीचे दुष्परिणाम दिसायला ७० चे दशक उजाडले.
आपण जर मागच्या चुकांमधून काहीच शिकणार नसू तर मग चालू दे.
निसर्ग आणि उत्क्रांती आपले काम करीत राहतात. आपल्याला त्यांच्या बरोबर synergistically काम करून शाश्वत विकास साधायचा आहे का त्यांच्या विरूद्ध जाऊन आपला विनाश करून घ्यायचा आहे हे आपणच ठरवायचे आहे.

Pages