स्त्री-लैंगिकतेचे गूढ

Submitted by कुमार१ on 4 April, 2022 - 00:44

(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शरीरशास्त्रीय ( anatomical) विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत).
.........................................................................................................

स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे :

उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान.

बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो.

सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे एक उत्तर असे आहे : पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत.

पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात :

1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते.
2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते.
3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते.

हा कळसबिंदू सरासरी ३० सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे. ज्यांना या बिंदूचा अनुभव उत्तम येतो त्या स्त्रियांना तो अल्पकाळात संपल्याची रूखरूखही लागते.

वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल :

1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे.
2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो. तर काहींच्या बाबतीत शरीराचे अन्य अवयव देखील निकट स्पर्शातून चेतवावे लागतात.
3. पण काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे.

या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली.
stree laingik.jpg

ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही !

यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष.

यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते. या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे.

१९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये डॉ. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही.
या द्वयीच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे असे प्रारूप तयार झाले :

लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था.

स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. अशा क्रीडांसाठी द्यावा लागणारा बराच वेळ हा देखील महत्त्वाचा घटक आहे. हे सर्वच जोडप्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही.

इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे.

संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते.

सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे.

सामाजिक दृष्टीकोन
परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो.

मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे.

त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे.
.........................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेव्युसर, तुमचा प्रश्न मी वाचला होता. Happy उगाच एडिटलात. इथल्या चर्चेत योग्य प्रश्न होता.

शां मा,
मूळ संदर्भातील वाक्य देतो.
त्यावरून मला लागलेला अर्थ तरी मी लिहिल्याप्रमाणे आहे

By contrast, a more gradual developmental curve is evident in women where the incidence of women experiencing orgasm increases gradually across 25 years and never exceeds 90%

अर्थात चर्चा होऊ शकते.
धन्यवाद

शां मा,
..आणि
तुलनेसाठी हे पुरुषांबद्दल चे वाक्य :

Ejaculation, and thus presumably orgasm, increases from less than 5% of boys ejaculating, to 100% within a 5 year span.

खूप छान, माहितीपूर्ण लेख.

माझ्यामते: पुरुषांना साधारण कोणत्याही भावनेशिवाय निव्वळ उद्दीपन आणि घर्षण यातून उत्कर्षबिंदू गाठता येऊ शकतो. शिवाय कोणत्याही साधारण सुदृढ पुरुषात उद्दीपन हे अतिशय सहज घडते. यात शारीर आकर्षणाचा अंतर्भाव अधिक असतो.

याउलट, स्त्रिया सहजासहजी उद्दीपित होत नसाव्यात. एखाद्या पुरुषाप्रती आकर्षित होताना, त्याच्या शारीरिक ठेवणीव्यतिरिक्त वागणे, बोलणे, स्वतः मध्ये असलेले स्वारस्य आणि इतर भावनिक गोष्टी मूलभूत निकषात येतात, एक कामक्रीडा नव्याने करण्यासाठी स्त्रीला शरीरापेक्षा मनाची तयारी जास्त करावी लागते. त्यामुळे, स्त्री उत्कर्षबिंदू साध्य व्हायचा असेल तर बहुतांश स्त्रियांमध्ये मनाने जोडले जाणे आवश्यक असावे.
क्रियेबद्दल बोलायचे झाल्यास, प्रणयपूर्व क्रीडा केल्याचे दुहेरी फायदे आहेत, रस निर्माण होणे (मनात आणि योनीतही! शिवाय, या क्रीडांमुळे पुरुषाची तग धरण्याची क्षमता देखील वाढत असल्याचे आढळून आले आहे) ज्यामुळे संभोग सुखावह होतो. एका अहवालानुसार, भारतीय पुरुषांची तग धरण्याची क्षमता (स्टॅमिना) साधारण 3 ते 5 मिनिटांचा आहे. प्रणयपूर्व क्रीडा न केल्यास एवढ्या कमी कालावधीत स्त्रीचे समाधान होणे कठीण. स्त्रीला एकापेक्षा अधिक वेळा उत्कर्षबिंदू सलग गाठता येऊ शकतो, आणि बिंदूवर राहण्याचा कालावधी देखील पुरुषांपेक्षा अधिक असू शकतो.
शरीरशास्त्रीय बोलायचे झाल्यास, शिष्नीका, योनिमुख, योनीमार्ग आणि योनिपटल असे सारेच संवेदनशील असते. पुरुष यापैकी जेवढ्या जास्त ठिकाणी पोचेल तितका स्त्रीने बिंदू गाठणे सोपे होईल. इथे एक फसगत अशी की अनेक स्त्रियांना उत्कर्षबिंदू म्हणजे नेमके काय हेच कळत नाही, शिवाय ही अनुभूती असल्याने ठराविक ठोकळेबाज व्याख्याही लागू करता येऊ नये. शिवाय सलग अनेकवेळा बिंदू गाठण्याची क्षमता असल्याने नेमका कधी तो पूर्ण झाला हेही कळत नाही. अनेकवेळा तर संभोगदरम्यान योनीस्खलन होते त्यालाच लघवी समजल्या जाते!
यावर माझ्या मते उपाय सोपे आहेत, पुरुषाने कार्यभाग उरकण्यापुरती घिसाडघाई न करता प्रणयपुर्व क्रीडांमध्ये रस घेणे, आणि विचारणे.

वेश्यांच्या बाबतीत: हा पुरुष मला वापरायला इथे आला आहे आणि त्याबदल्यात पैसे मिळणार आहे हा व्यवहार असल्याने वेश्या स्वतःला एक वस्तू समजून आपल्या शरीराचा सौदा करत असल्याने उत्कर्षबिंदू गाठण्यासाठी लागणारी भावनिक गुंतवणूक मुळात नसते, परिणामी तो गाठला जात नसावा.

कुमार सर, धन्यवाद मूळ संदर्भांबद्दल.
स्त्रियांमधे २५ वर्षांच्या कालखंडात हळूहळू परमोच्चबिंदू च्या ९०% पर्यंत प्रवास होतो . तर पुरूषामधे पाच वर्षाच्या कालखंडात परमोच्चबिंदूच्या ५% ते १००% असा प्रवास होतो. वरच्या संदर्भाप्रमाणे बहुतांश (कि सर्वच) स्त्रिया या परमोच्च (उत्कटबिंदूच्या) ९०% पर्यंतच पोहोचतात. काही टक्के स्त्रिया पोहोचत नाहीत किंवा पोहोचतात असे हा आलेख सांगत नाही असे माझ्या अल्प आकलनाप्रमाणे वाटते. पण ही माझ्या आकलनाची चूक असेल. इथे थांबतो.

तुम्ही कष्ट घेऊन सहजसोपे करून सांगत असल्याने आणि या क्षेत्रातला अधिकार असल्याने ऑथेंटिक माहिती मिळाली त्याबद्दल मनापासून आभार.

माहिती व अर्थपूर्ण चर्चेबद्दल वरील सर्वांचे आभार !
........................
अनेकवेळा तर संभोगदरम्यान योनीस्खलन होते त्यालाच लघवी समजल्या जाते! >>>>

हा चांगला व रोचक मुद्दा आहे. त्यात काही सुधारणा करतो.
संभोगा दरम्यान ज्या स्त्रियांमध्ये एका द्रवाचे स्खलन होते तो द्रव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. तो चवीस गोड असतो आणि अर्थातच लघवीपेक्षा भिन्न असतो.
परंतु इथेही स्त्रियांमधील अनुभवभिन्नता समोर येते. तीन प्रकारचे अनुभव वैद्यकात नोंदले गेले आहेत :

१. ज्या स्त्रियांच्या ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद चांगल्यापैकी असते त्या स्त्रियांमध्ये संभोगादरम्यान हा द्राव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. मुळात तो त्या छिद्राच्या भोवती असलेल्या विशिष्ट छोट्या ग्रंथींमधून आलेला असतो.

२. ज्या स्त्रियांच्या ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद कमी असते त्यांना वरील प्रमाणे अनुभव येत नाही.

३. अन्य काही स्त्रियांमध्ये या क्रियेदरम्यान प्रत्यक्ष लघवीचे थेंबही मूत्रछिद्रातून बाहेर येतात.

https://onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1002/9781118896877.wbiehs125....

गेले काही दिवस लेख आणि प्रतिसाद वाचत आहे.सुरेख माहितीपूर्ण लेख. पाचपाटील, अजिंक्यराव पाटील आणि सीमंतिनी यांचे प्रतिसाद विशेष उल्लेखनीय आहेत.

जाता जाता एक अवांतरः
मराठी,हिंदीमधील एका अभिनेत्रीचे आत्मचरित्र वाचले होते.त्यात तिने प्रियकर संबंधाबाबत म्हटले होते की" विवाहानंतर २ मुले झाली तरी मला लग्नाचा अर्थ कळला नव्हता तो याच्याबरोबर असताना कळला" .दहावी अकरावीतला भावाने त्याची हसत टर उडवली होती.मोठा भाऊ हसला म्हणून मी हसले होते.लाजेने कानकोंडी झालेली आई इतकेच म्हणाली की खरं आहे त्या अभिनेत्रीचे.
खूप नंतर त्याचा अर्थ कळला.

छान, धन्स.
खूप नंतर त्याचा अर्थ कळला. >>> मार्मिक !!
........

दिनविशेष
आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपणा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो.

लेखातील माहिती कमी अधिक ठाऊक होतीच, पण संकलित माहिती वाचायला नेहमीच सोयीचं असतं. नेहमीप्रमाणे चर्चा आणि प्रतिसाद उत्तम.

स्त्रियांना मल्टिपल ऑर्गॅझम्स येउ शकतात. अगदी अति नाही पण २-३ >> Right. especially post menses. Also the libido is higher than usual.

100 वा प्रतिसाद Happy

मला एक सिनेमा लक्षात आहे पण नाव आठवत नाही ज्यात दीप्ती नवल आहे व एक मराठी नट आहे , नाव अगदी जीभेवरती आहे पण आत्ता आठवत नाही. त्यांची ओळख नसते पण तो तिला नेहमी अ‍ॅनीनिमस (निनावी) फोन करत असतो. मला वाटतं ही एक्स्पेक्टस फोन सेक्स किंवा वास्तवात अ‍ॅक्च्युअल. पण तो फक्त असा हलक्या आवाजात कुजबुजत अस तो व हिंटस देत असतो. त्यात तिची घालमेल/ हो-नाही पण नाहीच पण कदाचित टर्न ऑन होणं, इतकं सुंदर टिपलय दीप्ती ने.

देवकी फार छान प्रतिसाद आहे वरचा.>>>>+1
छान चर्चा.
देवकीतैच्या प्रतिसादावरून मलाही लहानपणीची घटना आठवली. पुष्कळ निबंधांमधे 'स्त्रीही क्षणाची पत्नी व अनंतकाळाची माता असते' , हे गुळगुळीत झालेले वाक्य वाचनात यायचे. याचा अर्थ मला नीट समजत नव्हता. घरी विचारलं तर थातुरमातुर सांगून वेळ मारून नेण्यात आली. नंतर बऱ्याच वर्षांनी याचा अर्थ उमजला , आता अशा मखरात बसवणाऱ्या वाक्यांनी चीड येते. आपल्या एकुणच समाजाची रचना व सांस्कृतिक जडणघडण अशी करून ठेवली आहे की स्त्रीला सेक्शुअली फुलेस्ट किंवा समृद्ध जगताच येऊ नये , जे आहे त्यालाच सुख मानावे !! आता हळूहळू परिस्थिती बदलतेय ही एक चांगली बाब आहे.
मला व्यक्तीशः 'ए दिल है मुश्कील' या सिनेमातील ऐश्वर्या रायचा सेक्शुअली डॉमिनंट ओल्डर वुमनचा रोल आवडला होता. चिनी कम व अंधाधून मधील तब्बुचा रोलही(जरी पूर्णपणे सेक्शुअल आर्क नसली तरी) वेगळा होता व आवडला होता. अस्तित्व सिनेमा मधेही याच विषयावर कथेचा फोकस होता.

छान चालू आहे चर्चा.
प्रशासकांना विनंती विषयाला सोडून असलेले प्रतिसाद उडवावेत.

अर्थपूर्ण चर्चेबद्दल वरील सर्वांचे आभार !
...
100 वा प्रतिसाद >>> छान. Happy
..
अस्तित्व सिनेमा मधेही याच विषयावर >>> +१११
सचिन खेडेकर, तब्बू.
सुंदर चित्रपट. माझाही आवडता.
.......
एकुणच समाजाची रचना व सांस्कृतिक जडणघडण अशी करून ठेवली आहे की स्त्रीला सेक्शुअली फुलेस्ट किंवा समृद्ध जगताच येऊ नये , जे आहे त्यालाच सुख मानावे >>>> मार्मिक. +१११

माझ्या आजीच्या पिढीतल्या एक दोन स्त्रिया मला माहित आहेत. त्या उघडपणे सांगायच्या,
" ६ पोरं झाली. शेवटचं पोर झाल्यानंतर आम्ही नवरा-बायको वेगळे झोपू लागलो...

>> अशा मखरात बसवणाऱ्या वाक्यांनी चीड येते. आपल्या एकुणच समाजाची रचना व सांस्कृतिक जडणघडण अशी करून ठेवली आहे की स्त्रीला सेक्शुअली फुलेस्ट किंवा समृद्ध जगताच येऊ नये

+१११ यू पर्फेक्ट्ली हिट हेड ऑफ दि नेल! याबाबत मुलींचे प्रचंड प्रमाणात मानसिक खच्चीकरण झाले आहे. आनंदसोहळा पेक्षा कारुण्यसोहळाच अधिक वाटावा असे विवाह मी लहानपणी पाहिले आहेत. ती चित्रे अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीत. एक धागासुद्धा आहे माझा त्यावर. लग्नात वधू मुलीचे आक्रंदन पाहून असे वाटावे कि हिला बळी द्यायला घेऊन चालले आहेत! फार फरक नसायचाच. कारण सासरी जाणे म्हणजे विविध अत्याचाराला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवणे. कि आता आयुष्यातला आनंद संपला. इथून पुढे जे काही आयुष्यात आहे ते जबरदस्ती! केवळ कर्तव्य म्हणून करणे, सेवा करणे इत्यादी. इच्छा असो वा नसो पण इतरांच्या आनंदासाठी जगणे. अजूनही खेड्यापाड्यात सुरु असेल हे. कळसबिंदू वगैरे खूप दूर दूर दूर च्या गोष्टी. याबाबत कुठे भौगोलिक स्थितीनुसार आकडेवारी आहे का माहित नाही. पण ही सगळे संशोधने पाश्चिमात्य देशात झालेली आहेत हे सुद्धा नोंद घेण्यासारखे आहे. आपल्यकडे आता आता स्थिती बदलत असली तरी इतक्या हजार वर्षांचा परिणाम मुलींच्या मानसिकतेवर झाला नसेल तरच नवल. म्हणून राहून राहून तोच मुद्दा मनात येतोय, कुमार सरांनी जरी हा धागा याबाबतच्या शारीरिक बाबींत झालेली संशोधने मध्यवर्ती ठेऊन लिहिला असला तरी याचा व्यापक संबंध मानसशास्त्राशी आहे.

* जरी हा धागा याबाबतच्या शारीरिक बाबींत झालेली संशोधने मध्यवर्ती ठेऊन लिहिला असला तरी याचा व्यापक संबंध मानसशास्त्राशी आहे.
>>
अगदी मान्य आहे. आता माझा दृष्टिकोन सांगतो.
या व्यापक विषयाकडे बघता मला त्याचे तीन विभाग स्पष्ट दिसतात :
१. बिंदूसुखाशी शरीर रचनेतील विविधतेचा संबंध
२. मानसिक स्थितीचा संबंध
३. विवाहितांचे कामजीवन : या लेखात मी ठरवून लैंगिक जोडीदार हा शब्दप्रयोग वापरला आहे. एकदा का नवरा बायको या नात्याने या विषयाकडे पाहिले, की त्याला अनेक कंगोरे आहेत.

वरील पहिल्या विभागातील संशोधन मला रोचक वाटले आणि सहसा ते इतर माध्यमांत या संदर्भातील लेखनात येत नाही. म्हणून एक प्रास्ताविक टीप देऊन हा मर्यादित विभाग लिहिला आहे. तिन्ही विभाग एकत्र करून भला मोठा लेख लिहिणे माझ्या आवाक्याबाहेर होते. अन्य विभागांवर सवडीने वाचन करून काही उपयुक्त माहिती मिळाल्यास इथे लिहीन.

चित्रपटांचा विषय निघाला आहे त्यात अमोल पालेकरांचा 'अनाहत' अ‍ॅड करेन मी. अपर्णा सेनचा 'परोमा'ही.

madonna-whore-complex

https://thelatch.com.au/what-is-the-madonna-whore-complex/

Way back in the early 1900s, Freud identified a psychological dichotomy in his male patients known as the ‘Madonna-Whore complex’. Men (back then, but relevant to all genders now) with this complex saw women as either saints or prostitutes, loving the first and desiring the second — though never intertwining both.

>> म्हणून एक प्रास्ताविक टीप देऊन हा मर्यादित विभाग लिहिला आहे.

हो सर सहमत आहे आणि याबाबत धाग्याच्या विषयाची नेमकी व्याख्या/स्कोप सुद्धा वारंवार आपण स्पष्ट केला आहेच. तरीही "स्त्रियांची लैगिकता व कळसबिंदू" असा विषय असल्याने माझे व अन्यही काही प्रतिसाद नकळतपणे मानसशास्त्रकडे घसरत आहेत हे खरेच Happy

देवकी, स्वाती_आंबोळे +१.

शरीररचनेतील विविधतेचा संबंध - यातही "आपल्या एकुणच समाजाची रचना व सांस्कृतिक जडणघडण अशी करून ठेवली आहे की स्त्रीला सेक्शुअली फुलेस्ट किंवा समृद्ध जगताच येऊ नये". यात हल्ली मिडीयाद्वारे अनरिअलिस्टीक स्टँडर्डसचा प्रचार. हायमेनोप्लास्टी, लेबिओप्लास्टी अशा शस्त्रक्रियांना स्त्रिया सामोर्‍या जातात याचे एक कारण त्यांच्यावर लादलेली खोटी मानदंडे. जेमी मॅक्कार्टने या आर्टीस्टने "दि ग्रेट वॉल ऑफ व्हजायनाज" ह्या शिल्पात ४०० जेनेटेलिया एकत्र मांडले. हा प्रॉजेक्ट एकूण ५ वर्ष चालू होता. अर्थातच त्याला क्रिपी इ निगेटीव्ह प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. शिल्प यूट्यूब व जेमीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हापिस-सेफ नसल्याने लिंका देत नाही.

एका शिल्पाने अशा शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी होईल असे नाही पण निदान विषयावर संवाद सुरू होतो. भारतात "अस्लं" काही चालत नाही असा कुणाचा समज असेल तर अशा शस्त्रक्रियांच्या बाबतीत भारत जगातील पहिल्या १० देशात आहे. अगदी सौदी वगैरे सारख्या देशातही "डिझायनर व्हजायना" ची मागणी वाढते आहे. चांगलं-वाईट इ अजून ठरवू शकलो नाही तरी यावरही पुढे-मागे संवाद आवश्यक आहे.

madonna-whore-complex
>> रोचक.
चला, चर्चेतील मानसशास्त्राची बाजू तुम्ही सांभाळणार आहात का बोला ! माझे काम हलके होईल. Happy

१. उभय बाजूंच्या लिंगांचा आकार, खोली, सैलपणा इ. चा यांच्याशी संबंध आहे का? >>>
नाही. यांचा बिंदूस पोचण्याशी संबंध नाही.

२. ताठरता >>>
याचा अप्रत्यक्ष संबंध असा येईल.
ताठरता जेवढी चांगली आणि टिकाऊ असेल तितकी क्रिया प्रभावी होईल. त्यादरम्यान शिस्निकेचे पुरुष लिंगाशी घर्षण होण्याची शक्यता वाढते. शिस्निकेचा आकार छोटा मोठा असणे यासंबंधी काही गैरसमज पसरवले गेलेत. मुळात त्याच्या आकाराला महत्व नाही.
त्या अवयवात तब्बल ८,००० चेतातंतूंची मुळे आहेत. त्यावरच त्याची संवेदनक्षमता अवलंबूनआहे.

>> मानसशास्त्राची बाजू तुम्ही सांभाळणार आहात का

वेगळा धागा, अफाट व्याप्तीचा विषय. आणि चर्चा करण्यासारखे सुद्धा प्रचंड. पण या धाग्याच्या अनुषंगाने "पण थोडे आसपासचे" म्हणून मानसशास्त्र अधून मधून डोकावत आहे सध्या तरी तेवढेच पुरे Happy

आकार ल महत्व नाही.

संभोग मधून सुख मिळण्यास आकार महत्वाचा नसेल.
पण सेक्शुअल भावना निर्माण होण्यास त्या तीव्र होण्यास आकार महत्वाचा असतो.
स्त्री सुंदर आहे की कुरूप ह्याच्या शी संभोग मधून सुख मिळण्यास त्याचा काही च संबंध नाही.
पण आकर्षण निर्माण होवून संभोग पर्यंत जाण्यासाठी स्त्री च सुंदर असणे हे महत्वाचे असते.
पुरुष सड पातळ आहेत की धडधाकट सिक्स पॅक वाले ह्याचा आणि संभोगातून सुख मिळण्यास काहीच महत्व चे नाही .
पण ते आकर्षण निर्माण होण्यास सर्वात महत्वाचे आहे.

धन्यवाद कुमार सर. नेहमीप्रमाणे माहिती पूर्ण लेख!
Desmond Morris यांची Human sexes ही मालिका आठवली

>>>संभोग मधून सुख मिळण्यास आकार महत्वाचा नसेल.>>>> मी स्त्रीच्या इंद्रियाच्या आकाराबद्दल विचारत आहे

आकार महत्वाचा नाही हे ईंटरेस्टींग आहे. कित्येक लोकं तर याच न्यूनगंडाने पछाडलेले असतात.

Pages