आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

Such an amazing lady! Such an amazing lady!!! One of the most powerful and string women I got to see and hear in person!

हे उमा भारतीजींबद्दलही लिहिता येइल ! Happy दिवा घ्या !

पण ही लार्जर दॅन लाईफ पर्सनॅलिटी बाजूला ठेवूनच त्यांच्या विचारांचे व कामाचे मूल्यमापन करणे श्रेयस्कर !
असो हा दुसर्‍या धाग्याचा विषय ! त्यांची डिग्री बोगस आहे व त्या एका भाषणाचे ४० हजार डॉलर्स घेतात ! त्यांनी मरलेल्या इतर थापावर तर एक लेखच होईल !

पण ही लार्जर दॅन लाईफ पर्सनॅलिटी बाजूला ठेवूनच त्यांच्या विचारांचे व कामाचे मूल्यमापन करणे श्रेयस्कर !... लोकांना कोणीतरी लार्जर दॅन लाइफ हवा असतो आयुष्यात. ती भावनिक गरज असते. मासेसच मानसशास्त्र समजून घेण्यात अपयश ही आजच्या विरोधी पक्षाची कमकुवत बाजु आहे.

कुणीही लार्जर than life होऊ नये यासाठी लोकशाही आहे.

पण अवतार संकल्पना ज्यांना आवडते त्या लोकांनी देशाचा व स्वतःचा घात करून घेतला आहे

विकु, ओके. डिग्री च्या बोगसपणाविषयी तुम्हाला खात्रीलायक माहिती आहे असं गृहीत धरते. मला माहिती नाही त्यामुळे no comments. तसंही त्यांची PhD quantum physics मध्ये आहे असं त्या सांगतात पण त्यांचं काम ज्या विषयात आहे त्याचा physics शी फारसा संबंध नाही. Her knowledge of sustainability is pretty on point.
मानधन खूप घेतात यात काय वाईट आहे? त्या हिशोबाने सगळे सेलेब्रिटी बोगस होतील. She has received Right Livelihood award (considered as alternate Nobel) way back in 1993. त्यांची तेवढी authority आहे and people are ready to pay. ओबामा पण पैसे घेतातच की! That's her source of income. भारतीयांना वंदना शिवा यांची फारशी माहिती नाही. मला देखील माझ्या ताईच्या कोलंबिअन मैत्रीणी कडून त्यांच्याविषयी पहिल्यांदा कळलं. She has tremendous following in South America and Africa. So she is a celebrity.

त्यांनी मारलेल्या थापा >> हा जरा पटणारा मुद्दा आहे. I have seen almost all of her videos available on YouTube. Sometimes she makes exaggerated claims. But what I have repeatedly found is that the point she is making is flawless but the details might be fuzzy. मला आधी हे खटकायचं. पण आता वाटतं की किमान take home message तरी योग्य आहे ना. सर्वसामान्य लोकांना तसंही तेवढाच लक्षात राहतो. तसाही कोणावर अंधविश्वास ठेऊ नये. माणूस म्हटला की flawed असणारच मग तो कितीही ग्रेट असो.

वंदना शिवा यांनी जे काम करून ठेवलं आहे विशेषतः भारतासाठी, भारतीय शेतकऱ्यांसाठी ते फार मोठं आहे. भारतात seed sovereignty त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे टिकून राहिली आहे. माँन्सँटो (जी आता बायरने विकत घेतली आहे) सारख्या बलाढ्य कंपन्यांना टक्कर देणे सोपे नाही. You can definitely criticize her but don't dismiss her as bogus.

ते रमेशमाम कुठे गेले?
ते म्हणाले होते - महाराष्ट्र सरकार चा व्हॅट कमी केला तर आपल्या इथेही 60 रु लिटर ने पेट्रोल मिळेल .

आज पेट्रोलची किंमत १२० रुपये प्रति लीटर आहे. यात महाराष्ट्राचा व्हॅट ६० रुपये आणि उत्पादन खर्च + संघसरकारचा कर + लेव्ही+ वितरकाचं कमिशन मिळून ६० रुपये असं गणित आहे का?

<< महागाई ह्या शब्दात "गाई" असल्या कारणाने आणि गाई मध्ये ३६ कोटी देव असल्याकारणाने त्यावर बोलायचे नई >> ३३ वरून ३६ कोटी. ED मागे लागेल असे घोटाळे केले तर Happy >>

----- मला पण हे खटकले.... चक्क ३ कोटींची भर. त्यांनी मोदी, भिस्त आणि शहा यांना पण यात गणले असेल . Happy

देश दिवाळखोर कसा होतो त्याचे व्यवहारातील उदाहरण माझ्याकडे आहे.
मी जिथे राहतो मुंबई मध्ये तो भाग सामान्य लोकांचा आहे.
.केस कापायचे माझे एक सलून फिक्स आहे.
नॉन एसी साधं,पण कारागीर चांगले आहेत.
एक दिवस तिथे केस कापायला गेलो तर सर्व बदललं होते.
सर्व चकाचक,एसी,चांगल्या उच्च दर्जा च्या chair, चांगला युनिफॉर्म घालून कारागीर.
मी गेलो तेव्हा नेमकं त्या दुकानाचा मुळ मालक तिथे होता.
त्यांनी सांगायला सुरुवात केली.
हा सर्व माझ्या मुलाने केला आहे मी किती तरी विरोध केला तरी ऐकलं नाही.
कर्ज काढून सर्व केले.
आता इथे जे गिऱ्हाईक येतात ते जास्त भाव देतील का?
खर्च वसूल करायचा असेल तर डबल दर करावे लागतील.
एक गिऱ्हाईक येणार नाही.
आणि तसेच झाले काही महिन्यात च ते दुकान बंद करायची वेळ आली.
देश पण असे च दिवाळ खोरीत जातात.
ऐश आराम करण्यासाठी कर्ज काढून खर्च करणे.
पैश्याचे योग्य नियोजन न करणे.
चुकीची धोरण राबवणे.

बुलेट ट्रेन असाच प्रोजेक्ट आहे.
त्या प्रोजेक्ट चा खर्च आणि होणारा फायदा ह्यांचा मेळ बसणार नाही.
फायद्यात चालणारे प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी खासगी उद्योगपती आणि बुलेट ट्रेन मध्ये मात्र सरकारी गुंतवणूक.
बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा .
हा फॉर्म्युला बुलेट ट्रेन साठी का नाही वापरला.

बुलेट ट्रेनच्या व्हिडिओत मोदी बोलले होतेच,

बुलेट ट्रेन चालू करो , उसमे कोई बैठेगा नहीं , लेकिन दुनिया को पता चलेगा की हम क्या है

दिखावा दिखावा दिखावा

https://youtu.be/-M7VBruZDXk

जपानने बुलेट ट्रेन जोडली म्हणे , म्हणून आपण मुंबई अहमदाबाद जोडायचे म्हणे
अरे जपान केवढा, आपला देश केवढा !!

ज्यांची स्मारक बांधत आहेत त्यांचे विचार ह्यांना बिलकुल झेपत नाहीत.
फक्त दिखावा.
छत्रपती नी लोकांचे राज्य निर्माण केले होत.
जाती ,धर्म ह्याच्या पलीकडे जावून
Dr आंबेडकर नी नेहमीच समतेची स्वप्न बघितली आणि त्या साठी च आयुष्य खर्च केले.
आणि असे अनेक महापुरुष .
ह्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची कोणाची लायकी आहे का..फक्त पुतळे उभारून दिखावा चालू आहे

हो कारण एकदा पुतळे उभारले की त्यांचे काम होते
आपल्या व्होट बँकेला दाखवायला काहीतरी होतं
आणि भारतीय लोकं अजूनही भावनिक मुद्द्यांवर मतदान करतात हे पुन्हा एकवार सिद्ध होतं

हो

त्या एमडी मेडिसिन डॉकटर आहेत

ही कोण स्वाती आहे तिच्या वॉल वर गेले की लगेच कळत ही डाव्या communists च्या कळपातील आहे.
मोदी आणि उजवे एक वेळ परवडतील पण हे डावे , communists महा नालायक लोक आहेत.
एक नंबर चे ढोंगी.
ह्यांना तर जवळ पण उभ नाही केले पाहिजे.

भगतसिंगपण डावे होते. हॅट घालत होते, पण भगवे लोक भगतसिंगांचा पगडीवाला फोटो मुद्दाम वापरतात

त्या वेळी डावे देशविरोधी कृत्यात करत नव्हते ,
आता खुल्लम खुलला सहभागी होतात म्हणून काँग्रेस यांची बाजू कधीच मांडत नाही .
इतकी सिम्पल गोष्ट कळत नाही ?

स्वातंत्रलढ्यावेळी जे पक्ष देशद्रोही कारवाया करण्यात पेन्शन खाण्यात गुंतले होते, त्यांना जनतेने 70 वर्षे सत्तेत स्थान दिले नव्हते,

हेही इतकेच सिम्पल आहे

मोदी सरकारने देशद्रोही लोकांची यादी कोर्टात सिद्ध केली का ? की उगाचच फेसबुकवर अन व्हाट्सपवर भक्त लोक भुंकत फिरत असतात , तीच यादी ?

डावे केरळ वगळाता कुठेही अस्तिवात नाहीत. केंद्र ,उत्तर भारत, कर्नातक सगळीकडे मोदी आणि भाजपाच आहेत. जे अस्तिवातच नाहीत त्यांना टारगेट करण्यात काय हशील?
हेमंत यांचे सलूनचे उअदाहरण अगदी चपखल आहे. प्राधान्यक्रम चुकले की अर्थव्यवस्थेची गाडी रुलावरुन घसरते.
पण लीडर जेव्हा देव होतो ,तेव्हा तो चुकुच कसा शकतो, तुम्हालाच बघवत नाही, बर्नॉल लावा असे म्हणुन फेसबूक वर दमदाटी करवुन विरोधकांना गप्प बसवले जाते.
आमच्या एका ग्रूपवर एक सीए मैत्रिण आहे, ती सहजच म्हणालीजी एस टी आल्या पासुन काम खुप वाढलय पण त्या प्रमाणात पैसे काही मिळत नाहीत. भक्त मंडलींनी तीला असे काही ट्रोल केले की बास. बिचारी पळुन गेली. कॉमर्सचा कही माहीत नसलेले लोक अप्रामाणिक लोकांना जी एस तीचा त्रास होतो असे फॉरवर्ड्स पाठवतात.

Mumbai: Already reeling from the rise in prices, consumers will now also have to factor into their household budgets higher medicine prices. Essential medicines — including painkillers, anti-infectives, cardiac and antibiotics — will become dearer from April with the government set to allow drug companies an increase in line with the change in the annual wholesale price index (WPI). The annual change in WPI, as notified by the government, works out to 10.8% during the year 2021, drug prices regulator National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) said on Friday.
Prices of over 850 formulations across major therapies are expected to go up by at least 10%, a first-ever instance when the increase is more than that allowed for non-scheduled drugs (which are outside price control). Non-scheduled drugs are allowed an annual increase of 10%.
Historically, the increase in prices due to the annual change in WPI.
विरोधकांना कमकुवत केले की असे महत्वाचे मुद्दे कधी लुप्त होतात ते कळत पण नाही.

रेवा२+कितीतरी!
पण हिंदुत्वासाठी हे सोसायला पाहिजे.
हिटलरला ज्यू मिळाले तसे ह्यांना मुसलमान.
कार्ल मार्क्स कम्युनिस्टांपेक्षा ह्यांनाच जास्त समजला. धर्म अफू इत्यादी.

हे कागाळेच्याच धाग्यावर लिहायला हवं. भारतात दक्षिणपंथी देश पेटवण्यात कसलीही कसर ठेवत नाहीएत. अशांत शेजार?
मुस्लिम बायकांना विकायची अ‍ॅप काढल्यावर (या अ‍ॅप मागे एक स्त्रीही आहे, हे विशेष)
आता धर्मसंसदेच्या नावाखाली मुस्लिम स्त्रियांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करा अशी भाषणं , तेही मशिदीजवळ- पोलिस हजर असताना - दिली जात आहेत. भाषण ठोकणारा स्वतःला महंत म्हणवतो.
https://twitter.com/zoo_bear/status/1512036559960248323
https://twitter.com/zoo_bear/status/1512036691355131909
https://twitter.com/zoo_bear/status/1512172911334883375
काश्मिर फाइल्सचा खेळ संपल्यावर थेटरात अर्धी चड्डी घातलेला एक तरुण आपण मुस्लिम मुलींशी लग्न लावून त्यांच्यापासून पोरं काढली पाहिजेत असं म्हणतो.
गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदे - बजरंग दलाने ५००० त्रिशूल वाटले. तिथे भाषण करताना तोगडियाचा सहकारी म्हणतो - इन साले कटुवों को, कटे हुओं को पूछो ; सलमा इंतजार कर रही है मेरे बजरंगियों का.. पुढचं इथे लिहिण्याजोगं नाही. स्वतःच पहा
https://twitter.com/zoo_bear/status/1512011338620440577
पुढे मुजफ्फरनगरची आठवण करून देत हिंसाचार करा असं सरळ सरळ सांगतो.
https://twitter.com/zoo_bear/status/1512012469434138626

हे लोक राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताहेत.

आदित्यनाथच्या हिंदू युवा सेनेच्या मंचावरून त्याच्या उपस्थितीत मुस्लिम स्त्रियांना कबरीतून काढून त्यांच्यावर बलात्कार करा असं भाषण दिलं होतं.

मायबोलीवरचे दक्षिणपंथी ही सगळी भाषणं ऐकून पुढे काय काय करतील, किंवा जे होईल त्यातून विकृत आनंद कसा घेतील ते सांगायला नकोच.

रच्याकने - श्रीलंकेने बुरख्यावर बंदी घातली. गुरांच्या हत्येवर बंदी घातली. मदरसे बंद केले. तिथे बौद्धधर्मीय बहुसंख्येने आहेत आणि त्यांच्या बहुसंख्यांकवादाचा फटका तिथल्या तमिळ लोकांना बसला आहे, पुढेही बसेल.

सलम - संदर्भातले भाषण कधीचे आहे ?
लोक अगदी टाळ्या पिटत आहे. Sad अगदी भिषण आणि चिंताजनक प्रकार आहे.

Pages