भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओडीन पहारेकरी! Happy
माव्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! जोडगोळी मस्त दिसतेय!

Sense of humour I have but I wince every time someone quotes from that article. Written without zero personal experience.

मालक/मालकीण,आपापल्या पेट्सचे kautuk karun karun दुसऱ्याला वाट कसा आणतात यावर तो लेख आहे हो अमा.जसे एखाद्या मुलाचे कौतुक करून करून आईवडील दुसऱ्याला o येईपर्यंत वीट आणतात अगदी तसेच.

आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायलाच हवा?अगदी चोरी, शिंदळकी पण?कठीण आहे.

पुलं चे लेख कधीच कालबाह्य होतील असं मला तरी वाटत नाही.. असा मी असा मी मधले प्रसंग स्थळ काळ वेळ संदर्भ बदलून जसेच्या तसे अजूनही घडतात, नवीन घर आणि त्यातील गमती दाखवणार्याचा उत्साह अजूनही माझा शत्रुपक्ष मध्ये लिहिल्या प्रमाणेच आहे, नेहरू की गांधी की काहीतरी रोड असं म्हणणारी लोकं अजूनही माझ्या आजूबाजूला आहेत,
आपल्याला काय साहेब सांगेल ते करणार असं म्हणणारा धोंडोपंत सध्या माझाच झालाय...अजून बरंच आठवतंय पण धाग्याचा विषय तो नाही... असो..

तर मंडळी तुमचा फडकुळे झाला तरी चालेल पण तुमच्या सिंडरेला किंवा दुष्यांत चे किस्से येउद्यात.. असे छान किस्से आणि भुभु माऊ चे निरागस चेहेरे बघायला आम्हाला आवडते...

होय मला आवडतात इथे त्याचे किस्से टाकायला
किंबहूना काही नवीन घडलं की पहिल्यांदा इथेच टाकतो मी

माव्याला वाढदिवसाच्या भरपुर शुभेच्छा, या बीबी ने माझी " आय एम नॉट ए पेट पर्सन ते ... पेट चे किस्से अजुन येवु द्यात" अशी प्रगती झाली आहे त्यामुळे भविश्यात पेट आणलच तर श्रेय इथल्या सगळ्या क्युट फरी बेबिजला असेल.

Sense of humour I have but I wince every time someone quotes from that article. Written without zero personal experience. >> अमा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर अनेकदा appreciate केला आहे तो मुद्दा नाही. आणि विनोदी लेखनासाठी स्वतः अनुभव घेण्याची गरज असते असे नाही. पु. लं. नी सगळ्या वागण्या बोलण्यातली विसंगती फार छान टिपली आहे. त्यांच्या लेखामुळे कोणी प्राणी पक्ष्यांशी अमानुषपणे वागलंय किंवा पाळीव प्राण्यांच्या मालकांना त्रास दिला आहे असे मला तरी माहित नाही. उलट पु. लं. चा लेख enjoy करणारे आणि शिवाय प्राणीप्रेमी असलेले आशुचँप यांच्यासारखे अनेक जण मला माहीत आहेत. त्यामुळे तुमची नाराजी एकूणच अनाठायी वाटली. असो. इथे ही चर्चा अवांतर आहे त्यामुळे हेमाशेपो.
ह्या धाग्यावरचे किस्से वाचायला आणि फोटो पहायला नेहमीच मजा येते!

पाळीव प्राण्यांच्या मालकांना त्रास दिला आहे असे मला तरी माहित नाही. >> तो ह्या श्वान प्रेमींचे काय करायचे ह्या बाफ वर जाउन बघा.

माझे काही म्हणणे नाही. पण अश्या लेखकांनी लिहिल्यामुळे अनभिज्ञ लोक त्यांची मते बनवितात आणि जीवनातील एका चांगल्या आनंदाला मुकतात. मला काहीच फरक पडत नाही लेख मी पण एंजॉयच केला आहे. पण पेट व ओनर ह्यांच्यात जो एक डीप बाँड तयार होतो तो त्यांनी अनुभवलेला नाही. मग भाष्य करताना ते फक्त एका विनोदी टीपी लेव्हल वरच राहते. असो इथे ही चर्चा पुरे.

जसा लव्ह बाँड असेल तशी विरुद्ध भावना पण असेलच जगाचा नियमच आहे. नो इशू. पुढे चला. कुत्रे फिरवून आणा. मजा करा.

भाष्य करताना ते फक्त एका विनोदी टीपी लेव्हल वरच राहते. >> तेवढेच असणे अपेक्षित आहे. या उप्पर विनोदी लेखनाला जर कोणी गंभीरपणे घेऊन त्याप्रमाणे आपले वागणे बदलत असेल तर ही चूक लेखकाची की वाचकाची?
असो, not everyone in the world will be a pet owner or lover. पु. लं. नी लेख लिहिण्याआधी आणि नंतरही पाळीव प्राण्यांविषयी सर्व प्रकारच्या भावना असणारे लोक हे जगात होते आणि असणारच आहेत. उगीच या एका लेखापायी he has done much disservice to the pet world असे विधान करणे मला अयोग्य वाटते. आणि तुम्ही तो लेख बारकाईने वाचलात तर लक्षात येईल की खिल्ली ही मालक लोकांची खासकरून त्यांच्या विसंगत वागणूकीची उडवली आहे. खुद्द प्राण्यांविषयी एकही वावगा शब्द मला तरी आठवत नाही.

चला जाऊ द्या तो विषय

ओड्याचा नवा किस्सा

तो आता चांगलाच बदलत चाललाय, युवावस्था म्हणावी का...????

आमच्या नेहमीच्या जागी फिरायला गेलो होतो, ओड्या लीश नसल्याने मस्त बागडत चालला होता. त्या भागात बरीच भटकी भूभू असतात. त्यातली दोन अचानक आली भुंकत अंगावर. आता इतक्या दिवसांच्या अनुभवाने ओड्याला माहीतीय की ते त्यांच्या एरीयापुरते अग्रेसिव होतात आणि पुढे गेलो की शांत बसतात. त्यामुळे तो त्याच्या दुडकय चालीने पुढे पळाला. पण त्या कुत्र्यांचा नूर वेगळाच होता आणि त्वेषाने त्याच्या मागे लागली. मलाही जाणवलं की हे गडबड आहे काहीतरी म्हणून मीही ओरडत त्यांच्या मागे पळालो. थोडे अंतर पळताच ओड्याला एका कचराकुंडीपाशी कॉर्नर केलं आणि दोन्ही बाजूने त्याच्या अंगावर आले. इतका वेळ ओड्या पायात शेपटी घालून पळत होता पण आता कोंडीत अडकलोय म्हणल्यावर त्याने झटकन पवित्रा बदलला. उलटा वळला, सुळे दाखवत, गुरगुरत आणि अंगावरचे केस फुलवत आक्रमण केलं. त्या दोघांना तो असा काही करेल याची अजिबातच कल्पना नव्हती बहुदा. एकाने झटकन लोळण घेऊन पोट दाखवत शरणागती पत्करली तर दुसरा जोर दाखवत होता तर ओड्याने दोन्ही पंजे उंच करून झेप घेतली. म्हणल्यावर त्यानेही पळ काढला आणि लांब जाऊन भुंकायला लागला. तोवर मी पोचलो आणि हाडहुड करत त्यांना पळवून लावलं.

त्याचे हे असे रुप मी पहिल्यांदाच पाहिले. मी आल्यावर परत शांत झाला आणि नेहमीसारखा मान खाली घालून वास घेत हिंडायला लागला. म्हणलं कमाल आहे, तो आता स्वावलंबी झालाय म्हणजे.

भारी किस्सा. इतक्यात ते वॉच डॉग चे पण लिहिले होते तुम्ही सो म्हणजे खरंच बिग बॉय झाला ओडिन Happy चला म्हणजे ती बिवेअर ऑफ डॉग ची पाटी अगदीच मीम सारखी नाही वाटणार Happy

हो ना, पूर्वी घाबरला की माझ्या पायात यायचा
आता स्वतःची लढाई (लढाई फार होईल, स्वतःचे प्रॉब्लेम म्हणा) स्वतः मॅनेज करायला लागलाय

अर्थात म्हणून पपीनेस काय कमी नाहीये अजिबात, अजूनच लहान बाळासारखा मांडीवर लोळतो, हट्ट करतो

ओडीन एकदम मोठ्ठा झालं की! भारीच!
>>पपीनेस काय कमी नाहीये अजिबात, अजूनच लहान बाळासारखा मांडीवर लोळतो, हट्ट करतो>> precious moments!

ओड्याला टीव्ही बघायची सवय कशी लावावी यासाठी टिप्स द्या राव
त्याची एनर्जी दिवसेंदिवस वाढत चालली आहे
कितीही खेळलं त्याच्याशी तरी थोडा वेळ बसतो परत खेळू म्हणतो
तासभर जरी टीव्ही पहिला दिवसात तरी चालणारे पण तो एक सेकंद पण बघत नाही
पहाटे उठल्यापासून भुणभुण सुरू असते त्याची

आधी इतका नाही करायचा, झोपायचा छान, आता म्हणजे ओरडून दमात घेतलं तरच झोपतो
नैतर एकदम दुपारी ताक वगैरे पिऊन

केलं तेही
आवाज ओळखीचा वाटतो म्हणून बघतो पण बघत बसत नाही
मांजराचे आवाज असणारे, भुभु भुंकतानाचे व्हिडीओ, मस्ती करतानाचा, सगळे सगळे प्रकार करून झाले
कट्टर पंथी आहे त्याबाबत तो
मी गावाला असेन आणि व्हीडिओ कॉल केला तर तेव्हाही बघत नाही, आवाज ओळखतो पण मग भलतीकडेच बघत भुंकत राहतो

ह्युमन पालक ओड्याच्या टीव्हीच्या सवयी ह्युमन मुलांना लागव्यात अशी प्रार्थना करतील हे वाचून Biggrin

ह्युमन पालक ओड्याच्या टीव्हीच्या सवयी ह्युमन मुलांना लागव्यात अशी प्रार्थना करतील हे वाचून ...+१.

खरच गुणी आहे ओडिन पण मग समजा तुम्ही सगळेच टिव्ही बघत असाल तर' हे सगळे काय करतायत? अस करुन तरी बघतो का? की त्याचे वेगळेच उद्योग चालु असतात?

तोच त्रास आहे ना
टीव्ही बघू देत नाही अजिबात
ऑफिसमधून आल्यावर मी कपडेही न बदलता आधी त्याच्याशी खेळतो, कितीही दमलो असलो तरी
मग जेवताना थोडा वेळ टीव्ही बघावं तर त्याला पॉटी येते
मग त्याला पॉटी करवून आणलं की परत खेळू म्हणतो
बॉल आणून टाकतो पुढ्यात
दुर्लक्ष केलं तर अंगावर येऊन लोळतो, लाडात येतो
स्वस्थ काय बसू देत नाही

मी घरात आलो असेन तर नई जात मग तो बाहेर
एरवी उंडारत असतो कुठे कुठे
संध्याकाळी गेट पाशी बसून बाहेर येणारी जाणारी लोकं, गाड्या, भुभु बघत बसतो
आजी आजोबा यांना काही त्रास देत नाही पण मी असलो की पूर्ण वेळ मी त्यालाच दिला पाहिजे असा हट्ट करतो
अगदीच वैतागलो तर मग ओरडून आता फटका देईन हा असं म्हणल की गरीब तोंड करून बसतो
तेही चांगलं नाही वाटत सारखं ओरडायला
लॉक डाऊन मध्ये पूर्ण वेळ घरी असायचो त्यामुळे त्याला आता ती सवय झालीय
पण आता ऑफिस सुरू झालं आहे, तेही पूर्णवेळ नाही पार्ट टाइम ऑफिस पार्ट टाईम घरून करतो
पण आता मी आलो की झोपेपर्यंत मलाच घेऊन बसतो
Attachment affection आहे हे सगळं ठीक आहे
गोड वाटतं पण थोडाही वेळ सुटा सोडत नाही यामुळे थोडा इशू
होप्पूली काही काळाने सवय होईल अशी आशा आहे

मला फार कुत्र्याची मानसिकता वैगरे समजत नाही पण जस लहान मुलाना लहान मुल लागतात खेळायला तस होत असेल
डॉगी प्ले डेट करा

डॉगी प्ले डेट करा>>>

तेही झालं, बुलेट होता खेळायला तोवर मजेत होता
पण तो आता वेगळीकडे राहायला

याच्या सोबत खेळायला कोणीच नाही आता
आणि त्यातून महाशय वयात आलेत
मेल फिमेल काही न बघता सुरू होतात मग पकडून बाजूला न्यावा लागतं त्याला
सगळंच एकदम अवघड होऊन बसला आहे

Pages