भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स पुन्हा एकदा सगळ्यांना !
ऑस्कर फार इंटेलिजन्ट आहे , घराचा कुठला एन्ट्र्न्स कशासाठी , कुठली गोष्ट कशी मागायची , काय नाही मिळालं कि रुसुन बसायचं, नाइट टाइम क्लिनिंग कम पँपरिंग रिच्युअल (लॅव्हेंडर पपी क्लिनर स्प्रे , इअर अँड आय वाइप्स, केस विंचरून घेणे इ.) ‘ऑस्कर जो जो रे‘अंगाई ऐकली कि पाच मिनिटाच्या आत झोपायचं सगळं समजलय गोडुला !
क्रेट ट्रेनिंग क्रेडिट नवर्‍याला आणि मावशीने पाठवलेल्या स्नगल पपीला !
डे १ पासून ऑस्करला स्वतःला क्रेट = रिलॅक्सिंग हे पक्कं बसलय डोक्यात !
नवर्‍याने छान सेट करून दिलाय क्रेट , ट्रिट्स, च्युवी टॉइज, आवडतं ब्लँकेट , स्नगल पपी हे क्रेट मधल सगळं ऑस्करला भयंकर आवडल्॑य, पेंगुळला कि ति स्वत: जातो क्रेट मधे किंवा खेळून दमल्यावर !

डीजे, अभिनंदन!

ऑस्कर फार इंटेलिजन्ट आहे , घराचा कुठला एन्ट्र्न्स कशासाठी , कुठली गोष्ट कशी मागायची , काय नाही मिळालं कि रुसुन बसायचं, नाइट टाइम क्लिनिंग कम पँपरिंग रिच्युअल (लॅव्हेंडर पपी क्लिनर स्प्रे , इअर अँड आय वाइप्स, केस विंचरून घेणे इ.) ‘ऑस्कर जो जो रे‘अंगाई ऐकली कि पाच मिनिटाच्या आत झोपायचं सगळं समजलय गोडुला !
क्रेट ट्रेनिंग क्रेडिट नवर्‍याला आणि मावशीने पाठवलेल्या स्नगल पपीला !
डे १ पासून ऑस्करला स्वतःला क्रेट = रिलॅक्सिंग हे पक्कं बसलय डोक्यात !
नवर्‍याने छान सेट करून दिलाय क्रेट , ट्रिट्स, च्युवी टॉइज, आवडतं ब्लँकेट , स्नगल पपी हे क्रेट मधल सगळं ऑस्करला भयंकर आवडल्॑य, पेंगुळला कि ति स्वत: जातो क्रेट मधे किंवा खेळून दमल्यावर !>>> ऑस्करची दृष्ट काढत जा बरं रोज Wink मै कडून तेही ट्रेनिंग घे हवं तर Proud
किती गुणी बाळ ते!

पाठवलेल्या स्नगल पपीला !.....हे जरा विस्कटून सांग दीपांजली.
बाकी ऑस्कर फार इंटेलिजन्ट आहे , .... He वाचून आपल्या पुलंची आठवण झाली.
पण खरंय आपला पेट आपल्याला माहीत असतो.

कसलं भारी वाटलं या धाग्यावर इतके प्रतिसाद बघून...
नवीन बाळाचे खूप खूप स्वागत..
अजून किस्से येऊ देत आता.

>> नाइट टाइम क्लिनिंग कम पँपरिंग रिच्युअल (लॅव्हेंडर पपी क्लिनर स्प्रे , इअर अँड आय वाइप्स, केस विंचरून घेणे>> इतकं सगळं पँपरींग मी स्वतःकरताही करत नसल्याने आता शक्य नसलं तरी पुढच्या जन्मी मला डिजेचा कुत्रा व्हायला आवडेल Wink

पुढच्या जन्मी मला डिजेचा कुत्रा व्हायला आवडेल >> सायो Lol
पाठवलेल्या स्नगल पपीला !.....हे जरा विस्कटून सांग दीपांजली. >>> देवकी, इथे बघ स्नगल पपी. मी वेलकम गिफ्ट म्हणून पाठवला होता ऑश्कुसाठी Happy

स्नगल पपी >>>> लोकं Anxiety टाळण्यासाठी पपी आणतात आणि त्या पपीला Anxiety होऊ नये म्हणून स्नगल पपी Happy

मै, माऊईला घेऊन जा ऑस्करला भेटायला जाशील तेव्हा. भावंडांच गटग होईल. Proud

सायो Lol

मलाही आधी नव्हता माहित हा प्रकार पण नंतर काही ग्रुप्स मधे आणि रीव्ह्यूज मधे वाचलं. डीजे च्या म्हणण्याप्रमाणे त्यांना फारच उपयोगी पडले आहे ते. सॉफ्ट टॉय आणि त्याच्या आत एक हार्ट्बीट ची छोटी अटॅचमेन्ट. लहान पपीज ना त्यामुळे आवडतं ते.

ओड्या सध्या बराच टेरितोरियल झालाय, आमच्या गेटमधून आता पूर्वीसारखे कोणीही आलेलं त्याला चालत नाही
स्पेशली ऍमेझॉन फ्लिपकार्ट किंवा झोमॅटो वाले तर मुळीच नाहीत
देवाच्या नावाने पैसे मागत येणारे देखील नाहीत
पाहुणे पण ठराविकच, त्यात जर आजोबा आज्जी किंवा लहान बाळ असेल तर मग एकदम शांत
नुसता जाऊन बघून येईल किंवा वास घेईल
पण फक्त पुरुष मंडळी असतील तर मग भुंकत जाणार

गेट वाजले की हा जातोच पण आता त्याच्या रिएकक्षन वरून आम्हाला कळतं कोण आलं आहे ते
कामाला मावशी आल्या असतील तर फक्त हाय म्हणल्यासारखं जाऊन येतो
गाडी वाजली आणि शेजारचे असतील तर जागीच पडून राहतो फक्त कान टवकारून, एकदा खात्री पटली की तेच आहेत मग निवांत पसरतो
आमच्या घरातले कोणी आलं आणि आमची गाडी वाजली तर मात्र लगेच उड्या मारत दारापाशी, शेपूट हलवत

आणि ज्या लोकांवर भुंकतो तेच आम्हाला कधी रस्त्यात भेटले म्हणजे स्पेशली आमचा इस्त्रीवाला, तो दर आठवडयाला कपडे द्यायला येतो पण न चुकता ओड्या त्याच्यावर भुंकतो
आणि वाटेत कधी भेटला तर ढुंकूनही बघत नाही

पण हे एक अर्थी चांगलंच आहे, पूर्वी जे वाटायचं की गार्ड डॉग म्हणून शून्य मार्क, तर आता खूपच प्रगती आहे
आता लवकरच गेटवर कुत्र्यापासून सावध रहा ची पाटी लावणार आहे

ऑस्कर डे २ पासून पॉटी ट्रेन्ड झाला , बरोबर बॅकयार्ड डोअरची बेल वाजवून जातो पण आज पाऊस असल्यामुळे बाहेर जायला घाबरलाय, पहिला पाऊस त्याचा, जाम टरकलाय , तंत्र बिघडलय आज !
एकदा नेले त्याला छत्री घेऊन तर कापायला लागला , जोरात धावत घरात आला त्यामुळे आज घरातच शिशुविहार Biggrin
Btw तुमचे डॉग्ज टि.व्ही/फोन वरचे व्हिडिओज बघतात का ?
ऑस्करला क्युट पपीज, अ‍ॅनिमेटेड व्हॉइस असलेले फनी व्हिडिओज पहायला फार आवडतात , मी घरात नसेन तर नवरा माझे व्हिडिओज लाऊन देतो त्याला , शान्त झोपतो माझा आवाज ऐकला कि, ही काँप्लिमेन्ट कि इन्सल्ट माहित नाही Wink
परवा टि.व्ही. वर सिरीयल मधली हिरॉइन रडताना दिसली तर आमचं बाळ दचकून लग्गेच टि.व्ही. जवळ जाऊन उदास आवाज करु लागलं , मग चॅनल बदलून काहीतरी फनी लावलं !

अरे वा, ओडिन अचानक वॉच डॉग , दारावर पाटी वगैरे वाचून फार मजा वाटली Happy
माउई टिव्ही वगैरे नाही बघत. टिव्ही मधे डोअर बेल चा आवाज आला तर बाहेर दाराजवळ जातो भुंकत Happy

ऑस्कर पावसाला घाबरतो? Happy आई ग!!! बिचारा. होइल सवय.
ओडीनची प्रगती छान.
>>>>>>>टिव्ही मधे डोअर बेल चा आवाज आला तर बाहेर दाराजवळ जातो भुंकत
हाहाहा

काही कुत्र्यांना भिजायला आजिबात आव्डत नाही. बेल चे आमच्याकडे पण आहे. पहिल्यांदा आरशात बघतात तेव्हाही बावचळून भुंकतात.

माउईचा २ रा बड्डे झाला परवा. यावेळी खाऊ, खेळणी वगैरे नेहमीप्रमाणे झालेच पण शिवाय त्याच्या बेस्ट फ्रेन्ड एस ( तोच तो मधे आजारी पडला होता तो, "एसी बाबा" Happy ) सोबत प्लेडेट केली. दोघांना गाडीतून डॉग पार्क मधे नेले, तिथे बर्‍याच इतर डॉग्ज बरोबर मस्ती आणि येताना डन्किन मधे पप कप Happy दोघे जाम खूष झाले. थकून आले घरी.
mauibday.jpg
हे फोटो एसीबाबा च्या मम्मीने काढलेत, मला फारच आवडलेत.

मला खरतर घरात प्राणी पाळायला अजिबात आवडत नाही.. कधी आवडणार पण नाही...
पण मला हा धागा फार आवडतो... इथल्या गमतीजमती वाचायला,फोटो बघायला पण खुप आवडतात...
सर्व भुभु माउ करांनो... आधिच दिवे घ्या, पण पुलं च्या "पाळीव प्राणी" मधले काही काही डायलॉग पण आठवुन भसकन हसु येते...

लेक मागे लागली आहे तिला पेट हवाय म्हणुन पण ......"फ्लॅट मधे नाही शक्य, प्राण्यांना मोकळी जागा लागते,त्याना त्रास होतो बंद घरात" असं समजावुन थोपवुन ठेवलंय... म्हणजे खोट खोट समजावुन असं नव्हे.. खरच फ्लॅट मधे प्राणी पाळलेले बघुन वाईट वाटतं मला... त्यांना मोकळी जागा मिळायला हवी असं वाटतं.. असो......
सगळ्या भुभु माउंचे किस्से आणि फोटो मस्तच...

ऑस्करला क्युट पपीज, अ‍ॅनिमेटेड व्हॉइस असलेले फनी व्हिडिओज पहायला फार आवडतात>>>
साहिये हे, कसलं गोड
आमच्या बाळाला किती प्रयत्न केले तरी नाही म्हणजे नाहीच बघत
ना टीव्ही ना मोबाईल

अरे वा माव्याचा दुसरा बड्डे
खूप खूप शुभेच्छा ओडिनकडून

फोटोत भारी जोडी आहे एकदम
दुसऱ्या फोटोत चिडळाय का?

पुलं च्या "पाळीव प्राणी" मधले काही काही डायलॉग पण आठवुन भसकन हसु येते...>> त्या लाडक्या व्यक्तिमत्वाला पेट पाळायचा अनुभव नाही त्यामुळे बाहे रच्या पर्स्पेक्टिव्ह ने लिहिलेले आहे. शिवाय मला तो लेख विनोदी आहे पण कालबाह्य झालेला आहे. असे वाटते. ही हॅज डन मच डिससर्विस टु पेट वर्ल्ड.

अर्थात तो विनोदी आणि फार्सीकल अंगानेच लिहिला आहे
मलाही आवडतो तो लेख जाम
आणि कधी कधी आपलाही फडकुले होतोय असं वाटतं
पण ठिके

आमच्याकडे असेही आजी आजोबा दुसऱ्या नातवाचे कौतुक करावे तसे ओड्याला करतात,आल्या गेल्या सगळ्यांना तो कसा शांत आहे, कसा माया करतो, सकाळी कसा खायला मागतो हे पार कंटाळा येईपर्यंत सांगत राहतात
अहो तो काही करत नाही, हे वाक्य माझ्यापेक्षा जास्त त्यांनीच म्हणलं असेल
मी इथल्या काही लोकांचे अनुभव वाचून तसे म्हणायचे टाळतो
तो चावत नाही इतकेच सांगतो Happy
आणि त्याचे कौतुक केलेत तर मांडीवर बसून तो तुमचा गाल चाटेल हेही सांगतो Happy

ही हॅज डन मच डिससर्विस टु पेट वर्ल्ड. >> Then you have certainly misunderstood him! अमा, I am very surprised that you have made such a statement!
Fortunately, Pu. La. wrote for a readership who had a far better sense of humor than what we see today.

आमच्या इथे कोविड पेट्स भरपूर आहेत. त्यामुळे पूर्वी जशी आल्यागेल्याला लहान मुलांचं कौतुक आणि त्यांचे किस्से/करामती सांगायचा ट्रेंड होता तो बदलून आपापल्या पेट्सचे किस्से सांगत रहाणं हा नवा ट्रेंड आहे.

मला तो लेख आवडतो, आणि इथले अनुभव वाचून पेटस पण आवडतात.

ते 'कुत्रा चावत नाही हे तुम्हाला माहित आहे, पण त्याला माहित आहे का' वगैरे पीजे खऱ्या भावना या स्वरूपात नातेवाईकांकडून ऐकल्याने पूर्ण कालबाह्य पण वाटत नाहीत.

पण प्राणी जीव लावतात हे खरे.सध्या सोसायटीत फिरायला नेल्या जाणाऱ्या व्हिस्की नामक कुत्र्यावर मुलीचा विशेष जीव आहे.आणि नेहमीची सेनापती, बॅटमॅन ही मांजरं मलापण दिसली नाही तर चुकल्या सारखं होतं.

Pages