वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, भरत, आपल्या टिपण्णींबद्दल बद्दल (इनपुट) धन्यवाद, माझे ज्ञान फार पुस्तकी आहे या बाबतीत. कधीच कोणा वृद्ध/ अतिवृद्ध व्यक्तीची सेवा हातून घडलेली नाही. तेव्हा आपण म्हणता तसेच असेल.
---------
अमा, अवांतर - टॅरो कार्ड आणले. दे सीम टु बी 'अ-न-कॅ-नी' टु मी. ते आपल्याशी सूक्ष्म पातळीवरती बोलतात असे मला वाटते. विशेषतः चित्रे. सरीअल आहेत. माझा पहीला डेक 'डिव्हिअंट मून बाय पॅट्रिक व्हॅलेन्झा' आहे. आज नवर्‍याचे फुल रीडिंग केले. गंमत म्हणजे ७८ पानांमध्ये असलेल्या फक्त ४ राजांपैकी,त्याला ३ राजे आले. प्रत्येक वेळी मला इन्टरप्रिट करता आले.

आपल्याला करियर, थोडीफार मोकळीक आणि प्रियजनांची सोय यात एक पर्याय का निवडावा लागावा?
मधला मार्ग का उपलब्ध नाही? आज वर लिहिलेले सर्व प्रॅाब्लेम घरा घरात आहेत आणि येणाऱ्या काळात वाढत जाणार आहेत. ज्यांच्या पालकांना पाल्यांना कायम मदत लागते त्यांच्या साठी काही तरी सक्षम पर्याय हवा.
अथश्री, वृद्धाश्रम सारखेच पर्याय का? जिथे माझ्या प्रिय लोकांपासून मला लांब रहायला लागते. मला त्यांच्यावर ओझं न बनता शेवट पर्यंत त्यांच्यासोबत का नाही राहता येत?

शहरांमधे अशा इमारती बांधता येणार नाहीत का ज्यात एक मजला वृद्ध, स्पेशल केअरची गरज असलेल्या व्यक्तींसाठी असेल?

इमारती मधे समजा १० फ्लॅटस असतील तर वरच्या मजल्यावर पाच किंवा दहा खोल्या अशा असाव्या ज्यात
हॅास्पिटल सारख्या सर्व सोयी असतील/हवे तेव्हा त्या करणे शक्य असेल. त्या खोल्यांचा आणि बाकी सामायिक खर्च (परिचारीका, स्वच्छता वगैरे) हा जे त्या खोल्या वापरणारे करतील. ज्येष्ठ नागरीक त्यांना हवे तेव्हा हवा तेवढा वेळ त्यांच्या मुलांना देऊ शकतील.

मुलांना नातवंडाना पण त्यांचे आयुष्य, करियर, आणि जबाबदारी हे नीट पार पाडता येईल. मला ॲाफिसला, मुव्हीला, ट्रिपला, साधं मित्रांना भेटायला जाताना आई बाबा, आजी आजोबा, गतिमंद पाल्य यांचा विचार करूनच प्लॅन करायची, मन मारून अशा ठिकाणी न जाण्याची गरज पडू नये.

अशा इमारती/ सदनिका शक्यतो भाडे तत्वावर असाव्या, जरी विकत घेतल्या तरी समजा माझ्या फॅमिलीतील कोणाला स्पेशल केअरची गरज नसेल तर फक्त तेवढीच खोली, सदनिका+खोली मला दुसऱ्या कोणासही भाडेतत्वावर देता यावी.

मला कल्पना आहे की हे concept म्हणून चांगले वाटले तरी execution मधे प्रॅाब्लेम्स येऊ शकतात पण या समस्यांवर विचार मंथन करून काही तरी सक्षम पर्याय काढायला हवा. शक्य असेल आणि मुलांची ईच्छा असेल ओझं न बनता सर्वांनाच त्यांच्यासोबतच रहायचे आहे.

परिस्थिती अशी आहे की कॅन्सर रोग्या बरोबर नातेवाइक लागतो त्यांना राहायला सरकारने फ्लॅट देउ केले होते पण ते उद्धव सरकारने रिजेक्ट केले.
पैसे खायला मि ळाले तर ते नक्की अश्या सुविधा देतील.

अमा, अवांतर - टॅरो कार्ड आणले. दे सीम टु बी 'अ-न-कॅ-नी' टु मी. ते आपल्याशी सूक्ष्म पातळीवरती बोलतात असे मला वाटते. विशेषतः चित्रे. सरीअल आहेत. माझा पहीला डेक 'डिव्हिअंट मून बाय पॅट्रिक व्हॅलेन्झा' आहे. आज नवर्‍याचे फुल रीडिंग केले. गंमत म्हणजे ७८ पानांमध्ये असलेल्या फक्त ४ राजांपैकी,त्याला ३ राजे आले. प्रत्येक वेळी मला इन्टरप्रिट करता आले.>> मला टॅरो येतो हे कसे कळले आपल्याला?

सर्वात सोपा मार्ग.नोकऱ्या करता करता व्यवसाय चालू करणे .पोट पाण्यासाठी मुलांना घर सोडून जाण्याची गरज लागलीच नाही पाहिजे..
स्थिर व्यवसाय आणि तिथेच घर आणि पूर्ण कुटुंब .

>>>>>मला टॅरो येतो हे कसे कळले आपल्याला?
तुम्ही एका कमेंटमध्ये लिहीले होते. की डे रायडर व्हाइट सेट डेक आहे व आपल्याला येते. थांबा शोधते कमेंट.
- https://www.maayboli.com/node/80744
हा धागा.

Pages