अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
ओडीनच्या तोंडावर कसले
ओडीनच्या तोंडावर कसले केविलवाणे भाव आहेत.... फिरायला नाहीत जाणे ही खूप मोठी शिक्षा आहे त्याला.
बिच्चारा..
वेडे कोकरू!
वेडे कोकरू!
अरेरे! गेट वेल सून ओडीन.
अरेरे! गेट वेल सून ओडीन. आमच्याकडे पण नेमकी हीच परिस्थीती आहे. परवा मागे फेच खेळत असताना एल्सा बॉल आणायला गेली आणि एकदम थांबून एक पाय वर केला. जाऊन बघितलं तर पावलावर रक्त!! मग ते साफ वगैरे केलं पण ती हात लावू देत नव्हती. एकदा वाटलं नख उकलळं कि काय, किंवा मग काहीतरी टोचून आत तूस वगैरे राहिलं असेल तर बघावं म्हणून व्हेट कडे घेऊन गेलो तर त्यांनाही तीनी हात लावू दिला नाही म्हणून मग शेवटी तिला मझल लावून त्यांनी बघितलं आणि जे काही होतं ते कदाचित फक्त जोरात टोचलं (स्टॅब वुंड) असं म्हणाले. नशीबानी नख व्यवस्थीत आहे म्हणाले. आता बँडेज वगैरे नाहिये पण खेळ, रोजचा वॉक एकदम बंद आणि रोज दोन वेळा तिचा पॉ औषधानी साफ आणि मग कोरडा करायचा असं चाललय. ती घरभर फिरत राहु नये आणि खेळू नये म्हणून क्रेट मधे ठेवावं लागतय आणि मग हे असलं बघायला मिळतं..
बापरे! ओडिनने बराच पराक्रम
बापरे! ओडिनने बराच पराक्रम केला की! ओडिन आणि एल्साला लवकर बरे वाटो.
अर्र, ओडिन गेट वेल सुन..
अर्र, ओडिन गेट वेल सुन.. बिचारा सॅड दिसतोय फोटोत , लवकर बरा होऊन बागडु देत परत !
आई गं किती सॅड फेस दिसतोय
आई गं किती सॅड फेस दिसतोय एल्साचा! लवकर बरं होऊ दे.
अरे बापरे बिच्चारा ओडीन,
अरे बापरे बिच्चारा ओडीन, तुमच्यावर फार जीव आहे पोराचा म्हणुन जीव तोडुन पळाला...
ओडीन, एल्सा दोघही सॅड दिसतहेत फोटोत. दोघांना लवकर बरं वाटुदेत
गेट वेल सुन, एल्सा !
गेट वेल सुन, एल्सा !
ओह गेट वेल सून एल्सा
ओह गेट वेल सून एल्सा
चांगलाच उद्योग केलाय की
क्रेट मध्ये राहते का न भुंकता?
बिचारा सॅड दिसतोय फोटोत
फिरायला नाहीत जाणे ही खूप मोठी शिक्षा आहे त्याला>>>>
हो ना, त्यातून त्याचा मित्र बुलेट फिरतो ते बघून झालं की अजूनच दुःख होतं बाळाला आमच्या
तुमच्यावर फार जीव आहे पोराचा म्हणुन जीव तोडुन पळाला...>>>>
हो ना, त्याचाच त्रास झाला की जखम झालेली असतानाही तो पळत राहिला, अक्षरशः उर फुटेस्तो धावला
त्यांच्या अशा वेड्या मायेमुळे पोटात तुटतं. आपण खरोखरच यांचं प्रेम डीझर्व्ह करतो का असे काहीबाही विचार येतात मनात
अरे देवा! काय उद्योगी बाळ
अरे देवा! काय उद्योगी बाळ आहेत पण त्याच प्रेम कितीही आहे तुमच्यावर , एल्सा आणि ओडूला लवकर बर वाटु देत.
आलं आमचं बाळ आज मस्त फिरुन,
आलं आमचं बाळ आज मस्त फिरुन, इतका आनंद झालेला त्याला
पायाची सालटी निघाली होती ती त्यानेच उचकटून काढली रात्री, केर काढताना सापडली. जखम पण बरीच भरून आलीय
एरवी आमच्या फिरण्याच्या ट्रॅकवर दोन भटक्या भूभूची गाठ पडली की भुंकाभुंक सुरु होते, आज ओडीन बाळ इतकं खुषीत होतं की अजिबात भुंकलं नाही उलट किती दिवसांनी दिसल्यासारखं शेपटी हलवत गेलो त्यांना भेटायला. ते पण सॉलीड कन्फ्युज झाले.
भावा दमाने घे जरा, काय गेम तर नाय ना करणार तू असं विचारलंही असेल त्यांनी
>>>>>>>.काय गेम तर नाय ना
>>>>>>>.काय गेम तर नाय ना करणार तू असं विचारलंही असेल त्यांनी
हाहाहा
आई ग ... आत बरा आहे ना ओडिन
आई ग ... आत बरा आहे ना ओडिन
गेट वेल सून ओडिन
गेट वेल सून ओडिन आणि एल्सा
हो हो वाटलं होतं त्यापेक्षा
हो हो वाटलं होतं त्यापेक्षा खूपच लवकर भरून अली जखम
भूभ्याना आपली जखम चाटु देणे यावर नेटवर अनेक मतांतरे आहेत पण मला तरी असे दिसलं आहे की ते केल्याने त्यांच्या जखमा चिघळत नाहीत लवकर बऱ्या होतात
निसर्गात हेच तर करतात ते
तुम्हा सर्वांच्या
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. एल्सा चा पाय आता बरा आहे. हळुहळु करत वॉक चालु केला आणि आता नेहमीसरखी चालते आहे. अजून दंगा मस्ती आणि डॉग पार्डॉला मात्र जरा वेळ आहे.
आशुचँप - भू भू नी जखम चाटून स्वच्छ करणे केहाही उत्तमच. आम्ही ह्या वेळी एल्सा ला बँडेड वगैरे लावलं नव्हतं आणि व्हेट म्हणाले होते कि अँटीबायोटीक्स द्या पण आम्ही जरा थांबून बघुया आणी जखम बरी होत नाहिये असं वाटलं तर देऊ असं ठरवलं आणि अजिबात गरज लागली नाही. काही कुत्र्यांना मात्र अती चाटायचा किंवा चावायचा नाद लागतो (आपल्याला जखमेवरची खपली निघताना खाजायला होतं तसच असावं) ते परत जखम उकलतात म्हणून डॉक्टर्स सरसकट सगळ्यांनाच बँडेड लावा आणि कोन लावा असं सांगत असावे.
हो ओड्या तेच करतो
हो ओड्या तेच करतो
मन लावून तासन्तास पंजे चाटत राहतो
मग त्याला ओरडाव लागतं, माझं लक्ष आहे तुझ्याकडे असं म्हणल की थोडा वेळ थांबतो इकडे तिकडे बघत टीवल्या बावल्या करतो
आपलं लक्ष नसलं की परत सुरू होतो
आता तर मी फक्त हं इतकंच जोरात म्हणतो
लगेच मी काय कुठे काय असा आविर्भाव घेऊन बसतो
हा खरतर गमतीजमतिचा बाफ आहे पण
हा खरतर गमतीजमतिचा बाफ आहे पण इथे मोस्टली अॅक्टिव्ह भुभु पालक असल्याने एक शन्का विचारतेय, आम्ही नविन भाडेकरु बघत आहोत इतके दिवस आम्हि नो पेट पॉलीसी ठेवली होती, (माझा नवरा फारसा पेट पर्सन नाही) तर ट्रेन डॉग घरात जनरली काय काय उपद्याप करु शकतात.
अॅक्सीडेन्ट होतात का? घरात काही भागात लाईट कारपेट आहे.आमच्या एका मित्राने सान्गितल की त्याच्या नखानी वैगरे हार्डवुड फ्लोअरवर स्क्रेचेस पडु शकतात.भाडेकरू ओळखितुन सुचवलेले असल्याने एवढा विचार करतोय.
>>>>>>>आता तर मी फक्त हं
>>>>>>>आता तर मी फक्त हं इतकंच जोरात म्हणतो
लगेच मी काय कुठे काय असा आविर्भाव घेऊन बसतो
हाहाहा कसला गोड आहे ओड्या.
आमच्या घरी हार्डवुड फ्लोअर
आमच्या घरी हार्डवुड फ्लोअर आहे सगळीकडे. पण माउईमुळे त्यावर स्क्रॅच वगैरे पडल्याचा अनुभव नाही.
कारपेट कदाचित खराब होऊ शकते पण. पॉटि अॅक्सिडेन्ट झाल्यास किंवा अगदी ट्रेन्ड डॉग असेल तरी उलटी वगैरे करू शकतात कधी मधी.
ओडीन खरंच गोड बाळ आहे. एल्सा
ओडीन खरंच गोड बाळ आहे. एल्सा पण बरी झाली वाचून छान वाटलं.
प्राजक्ता, पेट कसा आहे त्यावर
प्राजक्ता, पेट कसा आहे त्यावर अवलंबून आहे. काही कुत्रे हार्ड च्युवर असले, हाय अँग्झाईटी वाले असले तर खिडक्यांचे बेस बोर्ड सुद्धा चावतात (एल्सा लहान होती तेव्हा तीनी आमच्या एका खिडकीच्या बेस बोर्ड चा कोपरा चावून काढला होता). मी असलो तर रेंटर्स इन्शुरन्समधे त्या बद्दल काही तरतूद आहे का बघेन. भाडेकरू गेल्यावर घर स्वच्छ करायची सोय (किंवा प्रोफेशनल क्लींनींग चे चार्जेस) काँट्रॅक्ट मधे घालता येतात का ते बघेन. कार्पेट चे म्हणाल तर मुलं जेवढ घाण करतात तेवढच कुत्रेही करतात. मग त्यात सांड लवंड, नेहमी चालण्यमुळे होणारा वापर इ. सर्व आले.
काही घरांमधे पेट चा आणि पेट फूड चा वास भरून राहिल्याचे बघितले आहे. मालकाला तो जाणवतही नाही पण अनेकांना तो वास अजिबात आवडत नाही व ते असे घर घ्यायचे टाळतात. आणि तो वास पटकन जात नाही. प्राण्यांचे केस सर्व काना कोपर्यात जाउन रहातात. आमच्या आधीच्या घरमालकांकडे कुत्रा होता आणि तिथे जायच्या आधी पूर्ण घर अगदी डीप क्लीन करून घेतले तरीही बेसबोर्ड्स च्या बारीक गॅप मधून आणि कार्पेट मधून वगैरे सारखे केस सापडत असत. तेव्हा आमच्याकडे एल्सा नव्हती आणि मला ते केस आणि पेट फूड चा वास आवडायचा नाही हे चांगले लक्षात आहे. तेव्हा घर दर काही महिन्यांनी नवीन लोकांना रेंट करणार असाल तर प्रोसीड विथ कॉशन एवढेच म्हणेन.
डिटेल पोस्टबद्दल थॅन्क्स चौकट
डिटेल पोस्टबद्दल थॅन्क्स चौकट राजा
प्रॉस्पेक्टिव्ह टेन्टट च्या मते त्याच्या कुत्रा खुपच वेल बिहेव्हड आहे पण ते जनरली सगळ्याच पेट पॅरेन्टच" आपला तो बाब्या "मत असतय इथे जनरली गमतिजमतीच वाचल्या जातात बाकी कुत्र्याचे काय इशुज येतात ते प्रत्यक्ष अनुभव घेण्यारालाच माहिती असतात जस डॉग फुडचा वास ,पेटचा वास लवकर न जाणे वैगरे हे काही माहिती नव्हत.
स्टेट लॉ प्रमाणे तुम्ही रेन्ट पेक्षा जास्त डीपॉझिट घेवु शकत नाही तरी रेन्टर इन्शुरन्स ची अजुन माहिती बघते.
असो, अन्गापेक्षा बोन्गा जास्त होत असेल तर त्या वाटेला न गेलेले बर!
प्राजक्ता, इकडे रेंटच्या
प्राजक्ता, इकडे रेंटच्या व्यतिरिक्त पेट फी (डिपॉझिट नाही) घेतात. साधारण $५००/वर्षाला. म्हणजे कुत्र्यांनी घर घाण केल्यास थोडाफार खर्च कव्हर होईल. तुमच्याइथे विचार.
घर डॉग ओनर ला देउ नका. हाउस
घर डॉग ओनर ला देउ नका. हाउस ओनर ची फार कटकट होते भाडेकरुला जर ओनरला पसंत नसेल तर. नो पेट पॉलिसी च चालू ठेवा.
थॅन्क्स सायो!
थॅन्क्स सायो!
बरेच दिवसात इथे काही आले नाही
बरेच दिवसात इथे काही आले नाही म्हणून :
माउईचा लेटेस्ट वेडेपणा. ही टॉय बास्केट कित्येक दिवसापासून आहे या खोलीत. त्यातच त्याची खेळणी असतात. पण २-३ दिवस काय डोक्यात आलंय कुणास ठाऊक, सगळी खेळणी खाली ओततो आणी बास्केटच इकडे तिकडे ओढत घेऊन खेळायला आवडलेलं आहे आधी गंमत वाटली पण आता त्यातला न्यूसन्स दिसू लागला आहे ! म्हणजे सतत इकडे तिकडे फरफटत नेताना येणारा आवाज,शिवाय सोफ्यावर वगैरे ती घेऊन वर चढण्याच्या प्रयत्नात ती बास्केट दहा वेळा धडामकन पाडणे इ. मग तुम्ही काम करत असा नाहीतर ऑफीस च्या फोन /झूम वर असा.
(No subject)
खूप खूप गोड तक्रार आहे..
खूप खूप गोड तक्रार आहे..
भारी, हा फोटो बघूनच हसायला
भारी, हा फोटो बघूनच हसायला येतंय
खेळणी चांगली टिकली आहेत की
आमच्या खेळण्याचा खोक्याचा फोटो टाकतो
पार रया गेलीय
Pages