मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार - २७ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'यमक'

Submitted by संयोजक-मभादि on 26 February, 2022 - 19:52

आज २७ फेब्रुवारी २०२२. सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाच्या आपल्या ५ दिवसांच्या भाषोत्सवातला आजचा तिसरा दिवस. आपला अलंकारांचा खेळ असाच चालू ठेऊया.

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.

तर मायबोलीकरांनो आजचा अलंकार आहे 'यमक'
-------------------------------------------------
थोडक्यात माहिती
कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो.

उदाहरणार्थ :

१. जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ

२. पहिला पाऊस पडला
सुगंध सर्वत्र दरवळला
-------------------------------------------------
चला तर मग, आजचा खेळ सुरू करू

यमक घेऊन कविता लिहिणे हा अनेक माबोकर्‍यांच्या डाव्या हातचा मळ. अनेकविध विषयांवर येथे काव्यनिर्मिती होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण आज मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण काव्यात एखादा मराठी महिना (चैत्र, वैषाख, ज्येष्ठ, ... वगैरे), सणवार, ऋतू (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, ... इत्यादींपैकी) गुंफुयात.

नियम-
१. एका वेळी कोणताही एक मराठी महिना घेऊन त्यातील सण-वार, ऋतू, अजून एखादे वैशिष्ट्य चारोळी स्वरूपात मांडायचे आहे आणि त्याबरोबरीने यमक ही साधायचे आहे.

२. पुढील सदस्य झब्बू देताना तो महिना लगेच घेऊ शकत नाही.
उदा - श्रावण महिन्यातील वर्णन करणारी चारोळी असेल तर पुढचा झब्बू श्रावण महिना नसावा.

३. मराठी महिन्याचा उल्लेख केला तरी/ नाही तरी चालेल.
उदा - गणपती बाप्पा/मोदक चा उल्लेख असेल तर महिन्याचे नाव लक्षात येईलच. ऋतूंच्या नावावरून महिना लक्षात येईलच असे नाही. तिथे महिना सांगावा लागेल.

चला चला करा सुरुवात |
अलंकाराचा हा खेळ येऊ द्या रंगात ||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हस्त लागला सरींवर सरी
ऐलमापैलमा खेळतात पोरी
ओळखा खिरापत धरा फेरा
हादग्या-भोंडल्याचा गोडवा न्यारा

अश्विन आला कर्तिक आला
आली गुलाबी थंडी
फराळ, फटाके, दिवा ळी अंक
अंगात उबदार बंडी

कृत्तिकाबाईंचा उखाणा

यांच्या संशयी स्वभावाने केली माझ्या संसाराची होळी
फाल्गुनरावांचं नाव घेते लाटत पुरणाची पोळी

सी गं सी,
यमकात बसवलेसच की ग सारे सण-वार ऋतू
करुन सवरुन नामानिराळी राहतेस बरी तू Wink

बम डिगी बम बम कार्तिक दिवाळी आली रे आली
फटाके फोडु चला, अभंगस्नानाची करु तयारी
--------------------
अर्र झब्बू द्यायच्या नादात पुनः तोच महीना घेतला गेला.
एक डाव माफ करा.

हाहाहा Happy
मला म्हातारीला. 'पोरी' म्हणलीस, तुझं देव भलं करो
कोजागर्ती सणासुदीला केशर घातलेलं बदामदूध मिळो

कृति चुकलं माझं ... ती शर्वरी आहे. हा कृतिचा उखाणा -
वरूण म्हणाला कृतिला "मनमा इमोसन जागे"
पौषाचं यमक विचारलं तर काढू वेगळे धागे

वाळ्याने निवली
ग्रीष्माची काहिली
बहाव्याच्या झुंबरांनी
नजरबंदी केली

वा छानच! सहसा ग्रीष्म ऋतूवर कविता कमी बघायला मिळतात. तसेच शिशिर आणि हेमंत पण काव्यात थोडे दुर्लक्षिलेलेच दिसतात. तरीही आतापर्यंत आलेले सगळेच प्रतिसाद छान आहेत. आणखीन येऊ द्या.

शिशिरातली पानगळ,
रंगीबेरंगी सड्याच्या रांगोळीने,
धरती सजवते.
नवीन पालवीसाठी,
जुने त्यागते.

वरुणाची कृपा पाऊस पडला धो धो,
शेतकर्याने पेरणीकरता कंबर कसली हो

<पेरणीच करतात ना पावसाळ्यात? वेगवेगळ्या पिकांचे वेळापत्रक माहीत नाही>

धन्यवाद. सर्वच छान लिहितायेत.

वरती संयोजकानी शिशिर, हेमंत दुर्लक्षिले दिसतायेत लिहिलं म्हणून त्यावर पहिला प्रयत्न केला.

Pages