भारतातून अमेरिकेत सध्या ट्रॅव्हल

Submitted by च्रप्स on 30 June, 2021 - 21:43

सध्या भारतातून अमेरिकेत व्हीसीटर व्हिसा stamped असल्यास ट्रॅव्हल allow आहे का?
कोणी इतक्यात प्रवास केला आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.. केबिन मध्ये भरपूर औषधे होतील म्हणून vicharle…
भीती वाटते कि सेक्युरिटी मध्ये काढायला लावतील..

वेगळ्या वेगळ्या बॅगेत ठेवा गोळ्या किंवा ऑनलाईन कूपन वापरून विकत घ्या.

<< चेकिन बॅग हरवल्या तर रिस्क वाटतेय म्हणून हा प्रश्न...>>
बस का राव? अख्खी बॅग हरवली तर त्याची काळजी नाही, पण २००-५०० रुपयांच्या गोळ्यांची काळजी? Lol

पाच महिन्याचे डायबिटीस च्या गोळ्या आणायच्या असतील तर चेकिन मध्ये टाकाव्या कि केबिन मध्ये...
चेकिन बॅग हरवल्या तर रिस्क वाटतेय म्हणून हा प्रश्न...

तो प्रश्न जनरिक आहे.. अशा गोळ्या ज्या फक्त भारतात मिळतात त्याचा विचार करावा..
तुमचं उत्तर बरोबर आहे मात्र..

>> तो प्रश्न जनरिक आहे.. अशा गोळ्या ज्या फक्त भारतात मिळतात त्याचा विचार करावा..>>> केवळ उपलब्धता हा निकष नाही.... किंमत हा महत्त्वाचा निकष आहे..... चेक इन किंवा केबिन कुठे ही न्या//// प्रिस्क्रिप्शन असले की झाले.... मी तीनदा नेली आहेत .... सहा महिन्याची....केबिन बॅगेत

फायनान्शियल प्लॅनर सारखे उत्तर म्हणजे तिन्ही ठिकाणी विखरून ठेवा म्हणजे रिस्क कमी Happy

बाय द वे चेक इन बॅग्ज हरवल्या, व मिळाल्याच नाहीत असे सहसा होत नाही. आजकाल ट्रॅकिंग सुधारले आहे.

मागच्या वर्षी माझी बॅग विमानातून ज्यात उतरवतात त्या गाडीमधे कोठेतरी अडकून बसली होती. बेल्टच्या जवळ एअरलाइनचे बॅगेज क्लेम वाले ऑफिस असते तेथील बाईने चेक केले तर ती विमानतळावर आहे असे दाखवत होते. पण बेल्टवर तर नव्हती. वाटेत कोठे पडली का ते ही चेक केले त्यांनी. तेथेही दिसली नाही. शेवटी क्लेम लिहून घरी आलो तर त्यांचा फोन आला Happy मग ती घरपोच आली व बॅग थोडी फाटल्यामुळे साउथवेस्टने नवीन सुद्धा दिली.

Pages