ईज्जत द्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 January, 2022 - 12:41

मंगळवारी बायकोला लक्षणे दिसली.
बुधवारी तिची टेस्ट केली.
गुरुवारी तिचा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

बुधवारी मला लक्षणे दिसली.
गुरुवारी माझी टेस्ट केली.
शुक्रवारी माझा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

महेशच्या डॅम ईट स्टाईलमध्ये आपल्याच हातावर मूठ मारली आणि आनंदाने म्हणालो, येस्स!
त्याच उत्साहात बिग बॉसला फोन लावला. आता चार दिवस आराम करतोय, तू आणि तुझी कंपनी गेली तेल लावत हे सांगायला. अर्थात हे मनातल्या मनात. खरे तर कधी नव्हे ते त्याकडून थोडेसे आंजारून गोंजारून घ्यायचे होते. तर लावला फोन...

ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
हॅलो सर.. आमच्याकडे कोरोना आलाय.. न्यूज कन्फर्म आहे.. हातात रिपोर्ट आहे.
बर्र.. मग आता पंधरा दिवस घरूनच काम कर.
अहो सर, ते तर गेले दोन वर्षे करतच आहे. आता जरा आराम करतो.
हम्मम ठिक आहे.. बरे वाटेल तसे ये ऑनलाईन. होम क्वारंटाईनमध्ये तसाही दोन दिवसांनी कंटाळाच येतो. तेवढेच काम होईल. काम खूप आहे आपल्याकडे..... (अजूनही पाचदहा मिनिटे बोलले काहीबाही. वर्कलोड, डेडलाईन, डेडीकेशन, सॅक्रीफाईज, वगैरे नेहमीचे हुकुमी शब्द तेवढे ऐकू आले.)

पुढे मग एक मेसेज सोसायटीच्या व्हॉटसपग्रूपवर सोडला. तिथे आधीच गेल्या महिन्याभरात चार कुटुंबात कोरोना शिरलेला. त्यात आमचे पाचवे जोडले.

हेल्लो ऑल.. वुई हॅव बीन टेस्टेड कोविड पॉजिटीव्ह.. आई हॅव क्वारंटाईन माय फॅमिली... वुई आर अ‍ॅण्ड वुई विल टेक ऑल नेसेसरी प्रीकॉशन्स.... वगैरे वगैरे ईन्फॉर्मेशन कम शपथग्रहणाचा कार्यक्रम झाला. माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच आपली सोसायटीही माझीच जबाबदारी हे सांगून झाले. तसे धडाधड मेसेज येऊ लागले.

- थॅन्क्स फॉर इन्फॉर्मिंग
- सात दिन बच्चों को नीचे खेलने मत भेजना.
- सात दिन के बाद आपका फ्लोअर सॅनिटाईज करवा के लेना.
- सोलर से गरम पाणी नही आता है. टाईम चेंज करो. (अरे याचे काय मध्येच)
- सॅनिटाईजेशन करवाने वालेका का नंबर सेक्रेटरीसे ले लेना
- भेज दिया भाय, बोलने के पहले ही भेज दिया. अपना काम ऐसेही रहता है - ईति सेक्रेटरी

वैतागून मोबाईल बाजूला ठेवला. पण ईतक्यात रिंग वाजली. नगरपालिकेचा फोन आला.
म्हटलं वाह. मायबाप सरकारलाच आपली काळजी.

नाव गाव फळ फूल विचारून झाले. काही विशेष होत नाही ना विचारले.
मी म्हणालो विशेष नाही. पण जरा थंडी, ताप, घश्याला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, नाही म्हणायला सकाळपासना थोडं......
बर्र बर्र.. (पाल्हाळ पुरे) घरीच होम क्वारंटाईन व्हाल ना. अ‍ॅडमिट नाही होणार ना..
नाही, तितके काही झाले नाही. पण तुम्ही औषधांच्या गोळ्या देता ना.. (कोणीतरी सांगितलेले मला हे)
ते फक्त अ‍ॅडमिट झालेल्यांना. अ‍ॅडमिट व्हायचे असेल तर तसे सांगा - फोन कट

पुढचे काही तास पुन्हा एकलकोंडेपणात गेले. ईंडिया मॅच सुद्धा हरली. निराशेत निराशा.

संध्याकाळी पुन्हा मोबाईल खणखणला.. बचना ए हसीनोss लो मै आ गयाss (माझी रिंगटोन)
सोसायटीतील चौदाव्या मजल्यावरील मिस्टर देवरुखकर यांचा फोन. म्हटलं चला शेवटी देवांक काळजी..

ह्यँ ह्यँ ह्यँ ... कसं झालं? कसे आहात आता?
बरा आहे तसा. (मगासच्या अनुभवावरून पाल्हाळ लावू नये हे आता कळले होते)
काही नाही ओ कोरोना वगैरे. पहिल्यासारखे घाबरायचे त्यात काही राहिले नाही. दोन दिवसात व्हाल बरे. तुम्हाला कळलं कधी झालेल्याचे?
अं.., मला बुधवारी आणि हिला मंगळवारी..
सोमवारी काही नव्हते?
मला तरी नाही.. आणि हिलाही तसे नाहीच.. मंगळवारीच आम्ही डॉक्टरकडे गेलो. का काय झाले?
काही नाही हो. बरा होतोय चार दिवसात. काळजी घ्या. - फोन कट

देवरुखकरांचा फोन का? सोमवारी मी त्यांच्या बायकोशी पॅसेजमध्ये बोलत उभी होती बराच वेळ. म्हणून कन्फर्म केले असेल काळजीने - ईति माझी बायको

म्हणजे देवांक सुद्धा आपल्याच कुटुंबाची काळजी होती तर..

छ्या, शेवटी मित्र ते मित्रच म्हणत मी पुन्हा मोबाईल उचलला. पुन्हा व्हॉटसप ओपन केले. कॉलेजच्या खास मित्रांचा ग्रूप ओपन केला. आणि मेसेज टाकला...

या संडेचे गेटटूगेदर कॅन्सल रे.. आमच्या घरात कोरोना शिरलाय.. मी आणि बायको दोघे पॉजिटीव्ह

- तुझ्या नानाची टांग. तू दरवे़ळीसारखी टांग दे आम्हाला
- तू चु नको बनवूस ऋ
- रिपोर्ट टाक पहिला साल्या तू
- तू कसा येत नाही बघतो आम्ही

मरा साल्यांनो.. घाला आपली ईथेच.. क्वारंटाईन पिरीअड संपल्यावर बोलू.. - मी ग्रूपमधून लेफ्ट

--------------------------------------

नाही म्हणायला दुपारी नगरपालिकेचे कर्मचारी आले. घरभर सॅनिटायझर शिंपडून गेले. बोलले काहीच नाही. तरीही कृतीतून काळजी दर्शवून गेले. मला तर तेवढ्यानेही गहिवरून आले. असे वाटले त्यांना मुन्नाभाईसारखे जादूची झप्पी द्यावी. कोरोनाने ते ही शक्य नव्हते, जसे आले तसे ते गेले.

पण या सगळ्या अनुभवांनंतर मनाशी पक्के ठरवले,
आता कितीही वाटले तरी मायबोलीवर कुठल्याही धाग्यावर याची बिलकुल वाच्यता करायची नाही.

पण मी काय म्हणतो,
कोरोना झालेल्यांना सहानुभुती नको लोकहो..
पण निदान त्या कोरोनाला तरी ईज्जत द्या _/\_
- ईति ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरांचा राग काय जात नाही बघा
किती तो अबोला
लहान मुलांच्या वरताण आहे
संत लहान मुलांसारखे असतात ते सरांनी अगदीच मनावर घेतले दिसताय Happy

उगी उगी सर, तुम्ही काळजी करू नका
आपण या सगळ्यांचे घर उन्हात बांधू

कोरोना झालेल्या सगळ्यांनी काळजी घ्या आणि गरम पाणी प्या. रच्याकने असं कुठलं मोबाईल ऍप आहे का ज्याने आपण नॉर्मल आवाजात बोललो तर समोरच्याला कोरोना झाल्यासारखा आवाज ऐकू येईल.

ओह!
>> आशुचँप, शांमा, काळजी घ्या
+१११
सर्वांनी लवकर बरे व्हा. इतरांनी काळजी घ्या. लहान बाळासहित
संपूर्ण कुटुंब पॉजीटिव्ह आल्याच्या केसेस मागच्या काही दिवसांत ऐकायला मिळाल्या...

आभारी आहे सर्वांचा. माझी लक्षणे फ्ल्यु ची आहेत. ओमायक्रॉनची पण अशीच आहेत.
डॉक्टरांनी पॅरासिटॅमॉल आणि प्रोटीन्स घ्यायला सांगितले आहे.

आज कोरोनाची ईज्जत जरा वाढली.
मुलांना त्यांच्या मावश्यांनी चॉकेलेट्स, गिफ्ट्स आणि छान छान ग्रीटींग्ज बनवून पाठवले Happy

SC9RVBLBMt453AVCL67N4AEK.jpg
.
IMG_20220116_150252.jpg

.

RSd6fUCKQ6ST6a7yA916MtK4.jpg
.
R33b10y0ddSUfPL5bTe5BBCd.jpg

Are किती छान ग्रिटींग्ज?
मुलांना,आजीला जप रे.डॉक्टरना विचारून प्रोटीन बिस्किटे (threptin)खात चला.आहारातही त्याचे प्रमाण वाढवा.

ॠ , शांत मा. , आशु -तिघे व्हर्चुअल जवळिक असुन ही अगदी एकमेकांस साथ देत आहात Wink
तिघे ही लवकर बरे होण्या साठी शुभेच्छा!

गोड आहेत ग्रीटिंग कार्ड्स.
घरात सगळेच आजारी आणि शिवाय आयसोलेशन पाळायचं त्यामुळे कुणी नातेवाईक मदतीला येऊन राहू शकत नाहीत हे फार त्रासदायक. त्याच शहरात रहात असणारे नातेवाईक निदान जेवणाचे डबे वगैरे पोचवू शकतात. बाहेरगावी राहणाऱ्यांना तेवढंही करता येत नाही त्यामुळे एक प्रकारची अगतिकता येते की आपल्या जवळच्या व्यक्ती आजारी आहेत आणि आपण काहीच मदत करू शकत नाही. Sad

ऋ, करोनाला हलक्यात घेऊ नकोस बाबा. योग्य ती काळजी घ्या सगळेजण.
ग्रीटींग कार्ड केवढी गोड आहेत. सुरेख अक्षर आणि चित्र पण.
आशुचॅंप आणि शामा तुम्ही पण लवकर बरे व्हा.

लहान मुलांना कोणती लक्षणे दिसतात कोविडची
सांगेल का कोणी
Submitted by पिहू१४ on 16 January, 2022 - 22:56
>>>>>

पिहू, कुमार सरांच्या एखाद्या कोविड धाग्यावर यावर योग्य उत्तर मिळून चर्चा होईल. आमच्याकडे मुलांना ताप आहे. मुलीचा फार नव्हता आणि ये जा करणारा होता. पण मुलाचा टेंशन देणारा आहे. उतरतच नाहीये. दोन दिवस रात्री त्याला धुवा पुसा मारून मुटकून औषध द्या हेच चालूय. याऊपर सर्दी खोकलाही आहे त्याला थोडाफार. डोळ्यातून अध्येमध्ये पाणीही येतेय.

डॉक्टरशी फोनवर बोलणे झाले. ते म्हणाले कोविडमुळेही असेल वा वायरल फ्ल्यू सुद्धा असेल. दोन्ही केसेस आहेत या परीसरात. तरी तीन दिवस काढायचे आहेत. ताप जास्त वाढणार नाही याची काळजी घेत राहा.
आता दोन दिवस झालेत आणि आता जरा तो बरा वाटत आहे.

@ सर्व शुभेच्छा आणि ग्रीटींगचे कौतुक.. आभार आणि धन्यवाद Happy

सात दिवसांचा गृह विलगीकरण चा कालावधी पार पाडून आज अखेरीस माणसात आलो

सगळी खोली जंतुनाशक ने साफ करून घेतली, कपडे मशीनला टाकले, भरपूर गरम पाण्याने मस्त अंघोळ केली

खूप बरे वाटलं

सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल खूप खूप धन्यवाद

>>>>>>खूप बरे वाटलं.
सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल खूप खूप धन्यवाद
__/\__

Pages