ईज्जत द्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 January, 2022 - 12:41

मंगळवारी बायकोला लक्षणे दिसली.
बुधवारी तिची टेस्ट केली.
गुरुवारी तिचा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

बुधवारी मला लक्षणे दिसली.
गुरुवारी माझी टेस्ट केली.
शुक्रवारी माझा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

महेशच्या डॅम ईट स्टाईलमध्ये आपल्याच हातावर मूठ मारली आणि आनंदाने म्हणालो, येस्स!
त्याच उत्साहात बिग बॉसला फोन लावला. आता चार दिवस आराम करतोय, तू आणि तुझी कंपनी गेली तेल लावत हे सांगायला. अर्थात हे मनातल्या मनात. खरे तर कधी नव्हे ते त्याकडून थोडेसे आंजारून गोंजारून घ्यायचे होते. तर लावला फोन...

ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
हॅलो सर.. आमच्याकडे कोरोना आलाय.. न्यूज कन्फर्म आहे.. हातात रिपोर्ट आहे.
बर्र.. मग आता पंधरा दिवस घरूनच काम कर.
अहो सर, ते तर गेले दोन वर्षे करतच आहे. आता जरा आराम करतो.
हम्मम ठिक आहे.. बरे वाटेल तसे ये ऑनलाईन. होम क्वारंटाईनमध्ये तसाही दोन दिवसांनी कंटाळाच येतो. तेवढेच काम होईल. काम खूप आहे आपल्याकडे..... (अजूनही पाचदहा मिनिटे बोलले काहीबाही. वर्कलोड, डेडलाईन, डेडीकेशन, सॅक्रीफाईज, वगैरे नेहमीचे हुकुमी शब्द तेवढे ऐकू आले.)

पुढे मग एक मेसेज सोसायटीच्या व्हॉटसपग्रूपवर सोडला. तिथे आधीच गेल्या महिन्याभरात चार कुटुंबात कोरोना शिरलेला. त्यात आमचे पाचवे जोडले.

हेल्लो ऑल.. वुई हॅव बीन टेस्टेड कोविड पॉजिटीव्ह.. आई हॅव क्वारंटाईन माय फॅमिली... वुई आर अ‍ॅण्ड वुई विल टेक ऑल नेसेसरी प्रीकॉशन्स.... वगैरे वगैरे ईन्फॉर्मेशन कम शपथग्रहणाचा कार्यक्रम झाला. माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच आपली सोसायटीही माझीच जबाबदारी हे सांगून झाले. तसे धडाधड मेसेज येऊ लागले.

- थॅन्क्स फॉर इन्फॉर्मिंग
- सात दिन बच्चों को नीचे खेलने मत भेजना.
- सात दिन के बाद आपका फ्लोअर सॅनिटाईज करवा के लेना.
- सोलर से गरम पाणी नही आता है. टाईम चेंज करो. (अरे याचे काय मध्येच)
- सॅनिटाईजेशन करवाने वालेका का नंबर सेक्रेटरीसे ले लेना
- भेज दिया भाय, बोलने के पहले ही भेज दिया. अपना काम ऐसेही रहता है - ईति सेक्रेटरी

वैतागून मोबाईल बाजूला ठेवला. पण ईतक्यात रिंग वाजली. नगरपालिकेचा फोन आला.
म्हटलं वाह. मायबाप सरकारलाच आपली काळजी.

नाव गाव फळ फूल विचारून झाले. काही विशेष होत नाही ना विचारले.
मी म्हणालो विशेष नाही. पण जरा थंडी, ताप, घश्याला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, नाही म्हणायला सकाळपासना थोडं......
बर्र बर्र.. (पाल्हाळ पुरे) घरीच होम क्वारंटाईन व्हाल ना. अ‍ॅडमिट नाही होणार ना..
नाही, तितके काही झाले नाही. पण तुम्ही औषधांच्या गोळ्या देता ना.. (कोणीतरी सांगितलेले मला हे)
ते फक्त अ‍ॅडमिट झालेल्यांना. अ‍ॅडमिट व्हायचे असेल तर तसे सांगा - फोन कट

पुढचे काही तास पुन्हा एकलकोंडेपणात गेले. ईंडिया मॅच सुद्धा हरली. निराशेत निराशा.

संध्याकाळी पुन्हा मोबाईल खणखणला.. बचना ए हसीनोss लो मै आ गयाss (माझी रिंगटोन)
सोसायटीतील चौदाव्या मजल्यावरील मिस्टर देवरुखकर यांचा फोन. म्हटलं चला शेवटी देवांक काळजी..

ह्यँ ह्यँ ह्यँ ... कसं झालं? कसे आहात आता?
बरा आहे तसा. (मगासच्या अनुभवावरून पाल्हाळ लावू नये हे आता कळले होते)
काही नाही ओ कोरोना वगैरे. पहिल्यासारखे घाबरायचे त्यात काही राहिले नाही. दोन दिवसात व्हाल बरे. तुम्हाला कळलं कधी झालेल्याचे?
अं.., मला बुधवारी आणि हिला मंगळवारी..
सोमवारी काही नव्हते?
मला तरी नाही.. आणि हिलाही तसे नाहीच.. मंगळवारीच आम्ही डॉक्टरकडे गेलो. का काय झाले?
काही नाही हो. बरा होतोय चार दिवसात. काळजी घ्या. - फोन कट

देवरुखकरांचा फोन का? सोमवारी मी त्यांच्या बायकोशी पॅसेजमध्ये बोलत उभी होती बराच वेळ. म्हणून कन्फर्म केले असेल काळजीने - ईति माझी बायको

म्हणजे देवांक सुद्धा आपल्याच कुटुंबाची काळजी होती तर..

छ्या, शेवटी मित्र ते मित्रच म्हणत मी पुन्हा मोबाईल उचलला. पुन्हा व्हॉटसप ओपन केले. कॉलेजच्या खास मित्रांचा ग्रूप ओपन केला. आणि मेसेज टाकला...

या संडेचे गेटटूगेदर कॅन्सल रे.. आमच्या घरात कोरोना शिरलाय.. मी आणि बायको दोघे पॉजिटीव्ह

- तुझ्या नानाची टांग. तू दरवे़ळीसारखी टांग दे आम्हाला
- तू चु नको बनवूस ऋ
- रिपोर्ट टाक पहिला साल्या तू
- तू कसा येत नाही बघतो आम्ही

मरा साल्यांनो.. घाला आपली ईथेच.. क्वारंटाईन पिरीअड संपल्यावर बोलू.. - मी ग्रूपमधून लेफ्ट

--------------------------------------

नाही म्हणायला दुपारी नगरपालिकेचे कर्मचारी आले. घरभर सॅनिटायझर शिंपडून गेले. बोलले काहीच नाही. तरीही कृतीतून काळजी दर्शवून गेले. मला तर तेवढ्यानेही गहिवरून आले. असे वाटले त्यांना मुन्नाभाईसारखे जादूची झप्पी द्यावी. कोरोनाने ते ही शक्य नव्हते, जसे आले तसे ते गेले.

पण या सगळ्या अनुभवांनंतर मनाशी पक्के ठरवले,
आता कितीही वाटले तरी मायबोलीवर कुठल्याही धाग्यावर याची बिलकुल वाच्यता करायची नाही.

पण मी काय म्हणतो,
कोरोना झालेल्यांना सहानुभुती नको लोकहो..
पण निदान त्या कोरोनाला तरी ईज्जत द्या _/\_
- ईति ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांचे

बाय द वे तुम्ही दोघांनी दोन्ही डोस घेतले होते का?
>>>>
अतुल दोन डोस वगैरे काही उरले नाही ईथे. सध्या जी थोडीफार थंडी मुंबईत अवतरलीय त्या सोबत या कोरोनाचीही लाट आली आहे ईथे. आमच्या सोसायटी, आणि आमच्या ऑफिस मध्ये गेल्या पंधरावीस दिवसात बरेच केसेस निघाल्या. आमचे ऑफिस काही काळासाठी पुन्हा १०० टक्के वर्क फ्रॉम होम केले. ज्या डॉक्टरकडे गेलेलो त्यानेही हेच सांगितले की गेले दोनचार दिवसात त्याच्याकडेही रांग लागली आहे. आजूबाजुच्या लोकांनी आमच्या पॉजिटीव्ह असण्याबद्दल नॉर्मली रिॲक्ट करायचे हेच कारण आहे Happy

बाकी हो, आमचे घरातल्यांचे आणि आमच्या ऑफिसमधीलही सर्वांचेच दोन डोस झाले आहेत.

सुरुवातीचे दोन दिवस थंडी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, घश्यातील खवखव यापैकी आता थंडी शिल्लक राहिली आहे.
पण सोबत नाक सुकणे, छातीत कफ झाल्यासारखे दडदडीत वाटणे, मळमळणे, उलटीसारखे वाटणे आणि पोट/पचनसंस्था खराब होणे, कळ लागून टू नंबरला होणे, थोडाफार गॅसचा त्रास ईत्यादी कालपासून नवीन सुरू झालेय..

हे सर्व जसेच्या तसे मला आणि बायकोला दोघांनाही जवळपास एकाच क्रमाने होत असल्याने ईथे नमूद करतोय.

सरांची प्रतिकारशक्ती पाहता कोरोनाला सर झाले हे काही विशेष वाटत नाही. पण त्यांच्या आतले ७० / ८० जण इतकेच मजबूत असतील का एव्हढीच चिंता आहे.
https://youtu.be/4XWdieHKNEw?t=202

एक (भीत भीत) सूचना : धाग्याचे शीर्षक बदलावे. एव्हढ्या महान हस्तीने अशी याचना करावी हे झेपले नाही. कुणीतरी रस्त्याने हातगाडि घेऊन ओरडत चालले आहे असे वाटतेय.

काळजी घ्या कुटुंबातील सगळ्यांनी... योगा, गरम पाणी पिणे वगैरे.. चालुच ठेवा.. बरे व्हाल लवकर.. कोरोना नंतर खुप विकनेस येतो.. संभाळा.

>> अतुल - लस घेतली तरी ओमिक्रोन किंवा डेल्टा होउ शकतो... माझ्या मित्रपरिवारात बुस्टर घेतलेल्यानाही झालेला आहे...
>> Submitted by च्रप्स on 15 January, 2022 - 09:19

>> हो, आमचे घरातल्यांचे आणि आमच्या ऑफिसमधीलही सर्वांचेच दोन डोस झाले आहेत.
>> Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2022 - 10:39

ओह! ओके. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद @च्रप्स आणि @ऋन्मेऽऽष .

नक्की का रे?
हो असल्यास काळजी घे.लवकर बरा हो.

काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. मुलांना आणि आजींना जपा.

आमच्या इथे दोन डोस + बुस्टर , मास्कचा वापर असे करुनही नवर्‍याच्या हाफिसातल्या जपानी मित्राला कोविड झालाय. डॉक्टरांचे म्हणणे नवा प्रकार अती संक्रमणशील आहे, जोडीला व्हायरल लोड जास्त असेल अशा ठिकाणी काम करत असाल तर संसर्गाची शक्यता अनेक पटीने वाढते. जरा जरी शिरकावाची संधी मिळाली तरी आजार होतो मात्र वॅक्सिनमुळे लक्षणे सौम्य रहातात. आमच्या इथे लोकं बुस्टर झाल्यावर मास्क बाबत बरेच निष्काळजी झाले जोडीला वॅक्सिन नाकारणारे आणि मास्क न वापरणारे आहेतच . त्यामुळे आकडे खूप वाढलेत.

भारतात अवघड म्हंटले ते याकरता की एकूणच पब्लिकशी संपर्क कमी करणे अमेरिकेत जास्त सोपे आहे. आणि बहुतांश लोकांची घरे मोठी असल्याने विलगीकरण तुलनेने सोपे असते. रूम, बाथरूम, कपडे, टॉवेल्स सगळे स्वतंत्रपणे वापरता येते. आपल्याकडे २+ बेडरूम्स व बाथरूम्स असलेल्यांना जमू शकेल. पण घरांच्या रचना, कामाला येणारे लोक - वगैरे अशा विलगीकरणाला सुटेबल नसते. अशा अर्थाने.

संसर्ग ऑनलाईन पण चालू आहे. अजून टेस्ट्स केल्या नाहीत. पण थंडी, प्रचंड ताप आणि सर्दी अशी लक्षणे आहेत. पॅरासिटामॉल घेतली कि थोडा वेळ उड्या माराव्याशा वाटतात. पण प्रभाव ओसरला कि अंग गळून जाते. सरांना झाल्यानंतरच मला झाला यावरून भक्त क्रमांक एक मीच.
आशुचँप यांनी आधी आजारी पडून सरांच्या धाग्यावर स्वतःकडे अटेन्शन घेतलंच, पण त्यांना काळजी घ्या असे प्रतिसाद पण आले. हा फाऊल आहे.

आपल्याला साधा कोरोना झालाय
त्यामुळे काय चार जिव्हाळ्याची लोकं काळजी घेत रहा म्हणतात त्याने बरं वाटतं
माझा तर आयसोलेशन चा चौथा दिवस
अजून दोन तीन दिवस झाले की मी सुटलो

पण सर सेलिब्रिटी आहेत, त्यांचा वेगळा धागा येतो
शेवटी धोंडो भिकाजी च्या पोराची मुंज आणि चाळीच्या मालकाच्या पोराची मुंज यात फरक असणारच की Happy

पण तुम्हीही काळजी घाय हो, जास्त परसिटोमोल खाऊ नका
त्याचेही साईड इफेक्ट्स होतात
भरपूर पाणी, सूप, सरबत घेत रहा आणि विश्रांती घ्या

कोरोना बरा झाल्यावर जास्त गळून जायला होतं म्हणे त्यामुळे मी आता सूर्यनमस्कार घालायला सुरू केलं आहे
हळूहळू जमतील तितके

आभार सर्वांचे _/\_

@ शांमा,
तुम्हीही काळजी घ्या. घरच्यांचीही काळजी घ्या. संसर्ग झपाट्याने होतोय.

@ फा,
हो, आयसोलेशन अवघड आहे याचा प्रत्यय येऊ लागलाय. घरचे आता सर्वच या आजाराच्या विळख्यात आलो आहोत. आलटून पालटून एकेकाचे टेंपरेचर चेक करणे चालू आहे. काल जे आमची सेवा करत होते आज आम्ही त्यांची सेवा करत आहोत. कमी जास्त प्रमाणात घरातल्या प्रत्येकाला हा प्रसाद मिळणारच. त्यामुळे आता योग्य उपचारांची काळजी घेऊन याला सन्मानाने निरोप देणेच चांगले Happy

Pages