Synchronicity/ समकालिकतेचे गूढ.

Submitted by केशव तुलसी on 25 June, 2020 - 05:55

Synchronicity किंवा अगदी शुद्ध मराठीत समकालिकता हा एक असा अविष्कार आहे ज्यामध्ये व्यक्तीला मनामध्ये चालू असलेल्या गोष्टीशी साधर्म्य असलेला त्याच्याशी निगडीत अनुभव येतो.याला इंग्रजीमध्ये synchronicity असे म्हणतात .मला असे खुप अनुभव सतत येत असतात.युट्युबवर यावर ढिगाने व्हिडीयोपण आहेत.
एक अगदी हटके अनुभव सांगायचा तर मी फ्लाईट रडार या साइटवर माझ्या गावावरुन कोणते विमान जात आहे हे बघत होतो.ते विमान कन्नुर (केरल) मुंबई असे होते.मी हे बघत असतानाचा माझ्या भावाने कन्नुर असा शब्द उच्चारला .भाऊ माझ्यापासून लांब खुर्चीत बसुन मोबाईलवर काहीतरी बघत होता .मी त्याला विचारले की आत्ता तु काय बोललास मोठ्याने.त्यावर तो म्हणाला की केरळमधील कन्नुर फिश मार्केटचा व्हिडीओ बघत आहे.यावर मी एकदम निशब्द झालो.
मी एखादी साइट उघडणे ,तिथे कन्नुर हे कधी नावही ऐकले नव्हते ते नाव विमानाच्या माहीतीत दिसणे ,भावाने त्यावेळी कन्नूर असे मोठ्याने म्हणणे हे सगळे मला अदभुत आणि विलक्षण वाटले.विस्मयचकित होण्याचा अनुभव मला आला.असे अनेक अनुभव मला येत असतात.ज्याची उकल होत नाही.युट्युबवर पाहीले असता तिथे काहींचे म्हणने आहे की आपले अनुभव/विचार काही अर्थपुर्ण, जास्त बेसिक अश्या मेंटल डायमेंशनमध्ये घडत असतात, जिथे सर्वांचे अनुभव विचार उगम पावत असतात.मला फारसे काही कळले नाही पण असे अनुभव आले की स्पेशल वाटतं.
अध्यात्मात याचा काही उल्लेख आहे का? मायबोलीकरांची मते जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंक्रोनिसिटी Interesting असतेच. पण आरोग्यासाठी सूचना - नशेचा पदार्थ आहे. विस्मयाचा धक्का इ इ बसतो कारण योगायोग आणि probability चे गणित माहिती नसते. माहिती असले तरी probability ला लै म्हणजे लैच underestimate केले असते. त्यातुन बसलेल्या धक्क्यापेक्षाही जास्त विस्मयकारक अर्थ काढायची शर्थ केली जाते. ते तर लै लै interesting असते. हे सगळं पाहायचं असेल तर प्राईम वरची हेलिअर (Hellier) ही डॉक्युमेंटरी नक्की बघा. Synchronicity ची नशा म्हणजे काय ते कळेल.

मला आलेले या वर्षातला दोन अनुभव

ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी जातो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला.
२) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

नाबुदादा, प्रोबॅबिलिटी ट्रिलियनचा ट्रिलियन घात इतकी कमी आहे.हा अनुभव काही तार्किक प्राणायाम करुनही तर्कात बसवता येत नाही.

गुगलदादा बघतात की तुम्ही कन्नुर गावाला जायचे फ्लाईट बघता आहात आणि तुम्हाला युट्युबवर (त्याच आय पी अ‍ॅड्रेस्स ग्रुप वर) कन्नुरला काय करता येइल याचे व्हिडियो "सजेस्टेड" सेक्शन मध्ये टाकतात यालाच सिन्क्रोसिटी म्हणतात.

रोचक आहे. डॉक्युमेन्टरीज बघते.
मला स्वप्नांचा अनुभव दांडगा आहे म्हणजे पूर्वसूचित स्वप्ने कळतात. बाय द वे कालच स्वप्नवाराही देवीची म्हणुन काही साधना असते ती वाचत होते. सप्तमातृकांपैकी ही देवी म्हणजे वराह रुपातीलच विष्णूची शक्ती म्हणजे लक्ष्मीचेच रुप.
या देवीचा मुकुट कोनाकृती असून, हातात मत्स्य व खप्पर असते. मत्स्य हा तंत्रातील ५ 'म'कारांपैकी एक.
देवीचे स्तन भरदार असून पोटही सुटलेले दाखवतात. अन्य मातृका (चामुंडा सोडता) सडपातळ व सुडौल आहेत. परंतु वाराही तिच्या उदरात विश्व धारण करत असल्याने (कदाचित) असे रुप दाखवतात.

https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3dQbvYKC8pygQOSiKn3b8bUZ4Bw3Tf5-tJvpKn0ByfzJxgZtvGDrpZPn237sy986pzO_cNBLJNLOn9-WZ5gdPUXC09ArLbXG61ieOMkNpmP0wjaf7wXoM8BhFbpAyDHOIGHNBiVHHkkssc17K9svBdKDQ=w500-h750-no?authuser=0https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3cHmbsBYgdI1UtU9eCV4JomDNTrQtxXzijOdaIAyjh2FH9JONRFo-6Qt0PhwUH_y7ulRDer-6hTlgFry2QyzN7M5U35uE62fOS73vfgc8A3_ErvpYHDorXo3icbjDyl7FX-khVUSeFEcv45izkomdWmsA=w193-h261-no?authuser=0

अर्थात मी असल्या उपासना करत नाही. आपले रामनाम बरे Happy

याला हे म्हणतात माहिती नव्हते. मला खूप वेळा आलेला अनुभव आहे. पण मी योगायोग म्हणून सोडून देते. मागच्या आठवड्यात मला आणि माझ्या मैत्रिणीला एकाच दिवशी /रात्री सारखेच(तंतोतंत आशयाचे) स्वप्न पडले. त्या स्वप्नात आम्ही दोघीच होतो फक्त. ती फार त्रासात होती आणि आम्हाला फोनवर बोलता आले नव्हते खूप दिवस आणि हे स्वप्न पडले. मग आठवड्यानंतर बोलणे झाल्यावर आम्हाला स्वप्नाबाबत कळले.

याला हे म्हणतात माहिती नव्हते. मला खूप वेळा आलेला अनुभव आहे. पण मी योगायोग म्हणून सोडून देते. >>+१
आणि नंतर विसरून जाते.
नुकताच आलेला अनुभव लिहू की नको? जौ द्या. लिहिते. सध्या सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येविषयी बरीच चर्चा चालली आहे सगळीकडे. मी कधीही त्याची fan नव्हते / नाही. सिरीयल इ. कधीही पाहिलेली नाही आणि फार पूर्वी त्याचा फक्त एक सिनेमा (काय पो चे ) पाहिलेला आहे. तोही काय होता हे आता आठवत नाही. तेव्हा रोजच्या धबडग्यात सुशांतची आठवण मला असण्याचं काहीही कारण नव्हतं.
या पार्श्वभूमीवर, त्या रात्री निजायची वेळ झालेली असताना, अगदी अचानक, कुठलाही तार्किक संबंध नसताना माझ्या मनातं आलं - इतर सेलेब्रिटींसारखा सुशांत लॉक डाऊन दरम्यान दिसला नाही कुठं!!उपटसुंभासारख्या आलेल्या या विचाराचं मलाच फार आश्चर्य वाटलं आणि तिकडे दुर्लक्ष करून मी झोपी गेले. (तसेही माझ्या डोक्यात अनंत संबद्ध आणि असंबद्ध विचार सतत चालूच असतात!)
सकाळी उठल्यावर जेव्हा त्याच्या आत्महत्येची बातमी समजली तेव्हा विश्वासच बसेना! समकालिकतेचा विचार केला तर त्याची आत्महत्येची वेळ आणि माझी आठवणीची वेळ साधारण सारखीच होती हे जाणवून मी दिवसभर अस्वस्थ होते.

चंद्रा,तुमचा अनुभव एकदम जबरा आहे.तुम्हाला समकालिकतेबरोबर पुर्वसुचना precognition ची पण देण आहे. भविष्यात घडणार्या गोष्टी वर्तमानवर प्रभाव टाकतात .यावर शोध चालू आहे.parapsychology मध्ये याला retrocausality म्हणतात.

New thinking allowed आणि IONS (institute of noetic science) हे दोन युट्युब चॅनल बघा.खुप छान माहीती आणि मुलाखती आहेत .

एखादी व्यक्ती दिवंगत झाल्याची बातमी किंवा माहिती माझ्या समजूतीत असते पण प्रत्यक्षात ती व्यक्ती त्यावेळी जिवंत असते. तिची काही निमित्ताने आठवण आली कि ती व्यक्ती निधन पावल्याची बातमी कानावर लगेच येते असे घडले आहे. योगायोग आहे. हेमू धर्माधिकारी, वसंत पळशीकर, यांच्याबाबत असे झाले. एकदा अशा निधन स्वप्नात कि अनुप जलोटांचे नाव आले पण लगेच बातमी आली ती एफटीआय चे डायरेक्टर झाल्याची. मनाचे खेळ असावेत बाकी काही नाही.

केशव तुलसी ,
तुम्ही सुचवलेले युट्युब चॅनल बघते.
पूर्वसूचना ( precognition) बद्दल इथेच मायबोलीवर काहींनी लिहिलेले अनुभव वाचल्याचे आठवते. चू भू द्या घ्या.
प्रकाश घाटपांडे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे योगायोग किंवा मनाचे खेळ असू शकतील. पण मग पूर्णपणे अनोळखी व्यक्तीविषयी ( एक वा अनेक), काही ध्यानीमनी नसताना आलेल्या अनुभवाचा परस्पर संबंध कसा लावायचा हा प्रश्न उरतोच. असो.

वाचतेय. खूप इंटरेस्टिंग धागा आहे हा... मलाही असे अनुभव येत असतात मधून मधून. मी पण योगायोग समजून सोडून देते किंवा कधी अशा आठवणी मनात घर करून बसतात .

प्रकाश घाटपांडे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे योगायोग किंवा मनाचे खेळ असू शकतील. पण मग पूर्णपणे अनोळखी व्यक्तीविषयी ( एक वा अनेक), काही ध्यानीमनी नसताना आलेल्या अनुभवाचा परस्पर संबंध कसा लावायचा हा प्रश्न उरतोच.>>>>>>> ज्योतिषाबाबत संभाव्यताशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटी. याचा मोठा उपयोग भाकिते वर्तवणाऱ्यांना होतो. याचे नित्य परिचयातले उदाहरण म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल याचे भाकीत. ते भाकीत पन्नास टक्के बरोबर येणारच असते, पण सामान्य लोक मात्र भाकीत बरोबर ठरल्याचे श्रेय ज्योतिषाला देतात. असे संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.

माझे असे बरेच अनुभव आहेत त्या मधील एक.
मी दुपारी घरात झोपलो होतो आणि मला एक चित्रफीत डोळ्यासमोर दिसायला लागली की माझी बहिण आलेली आहे .नुकतीच गाडी उभी करून ते सर्व गाडी बाहेर पडले आहेत आणि भाच्या ला तिने कडेवर घेतले आहे.
आता compound che dar उघडले पाहिजे ह्याची मला जाणीव झाली आणि मी झोपेतून जागा झालो उठून बाहेर येवून बघतोय तर मी जसे दृश्य बघितले होते same तसेच दृश्य बाहेर होते
ते सर्व आले होते.

आजचा अनुभव. बागकाम करत असताना मला खिळ्यासारख्या टोकदार गोष्टीची गरज होती.खिळा डोळ्यासमोर आला.पण खिळा आणायला घरात जायला लागेल म्हणून एक लाकडाचा पातळ चपटा तुकडा उचलला तर तो अत्यंत गंजलेला खिळाच होता. रस्टमुळे लाकडाचा तुकडा वाटला.आश्चर्यच म्हणायचे .

आजचा अनुभव. कै. आईंचा (साबा) वाढदिवस आहे २ जुलै. माझ्या मनात येत होते - शरद उपाध्ये यांच्या लक्ष्मी नॄसिंह ट्रस्ट ला पैसे पाठवावेत का? सर्वपित्रीला स्वतः सर जाउन, सर्व विधी करता असे ऐकले आहे. हे सारे विचार सुरु झाले त्याच्या दुसर्‍या दिवशी आईंनी नातीला म्हणजे माझ्या मुलीला दिलेले घड्याळ सापडले. मला माहीतही नव्हते त्यांनी जाण्याआधी तिला ते घड्याळ दिले होते ते. ते अचानक सापडले. अ‍ॅज इफ, आईंनी कॉन्टॅक्ट केला व माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला.

आणि आज म्हणजे विचार सुरु झाल्याच्या ३ र्‍या दिवशी, आज उपाध्येंच्या साईटवरती ही पोस्ट आली -
https://www.facebook.com/SharadUpadhyeOfficial/posts/181214156753054
- मित्रमेत्रिणींनो,अनेक लोकांची समस्या आहे की त्यांना परदेशी असल्याने किंवा गुरुजी मिळत नसल्याने वार्षिक श्राध्द तसेच सर्वपित्री अमावस्या श्राध्द करतायेतनाही.कुलाचारआणिश्राध्दविधी
झाले नाहीत तर खूप समस्या निर्माण होतात.म्हणून नरसोबावाडीला माझ्या श्री लक्ष्मी-नरसिंह ट्रस्टने आपली अडचण दूर केली आहे.ज्यांना यासाठी मदत लागेल त्यांनी 9702370077 ह्या नंबरवर फोन करून माहिती घ्यावी.तसेच वाढदिवशी आणि इतर शुभ प्रसंगी सेवा करण्याचीही माहिती घ्यावी.नमस्कार.

मला एकदा ट्रेडिंग करताना asian paint चा अर्धा तास पुढचा चार्ट दिसला होता. थोड्या वेळासाठी भविष्यात जाऊन आलो अशी फिलिंग आली होती तेव्हा. परत काय हे झालं नाही कधी.

Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 June, 2020 - 03:17>>>

संभाव्यताशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटीच्या संदर्भाने तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे. सगळंच पटलं असं नाही आणि असे अनुभव येणं ही काही देणगी आहे असंही मी मानत नाही. उलट माझ्यासाठी ते अनुभव विसरून जाणं श्रेयस्कर आणि अधिक सोयीस्कर आहे Happy

माझा एक अनुभव . हा synchronicity मध्ये येतो की नाही ते माहिती नाही . तर एके दिवशी ऑफिसमध्ये मी माझ्या कामात पूर्ण गढून गेलो होतो. तेवढ्यात माझ्या डेस्कवरचा इंटरकॉम वाजला. पलीकडून एका कलिगनं विचारलं 'ते हे आहे त्याला काय म्हणतात हो?' मी पटकन बर्म्युडा ट्रँगल असं सांगितलं आणि रिसिव्हर ठेवून दिला आणि कामात बुडून गेलो. परत पाचेक मिनिटात त्यांचा कॉल आला की मला कसं कळलं त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये बर्म्युडा ट्रँगल बद्दल गप्पा सुरु आहेत आणि त्याचं नांव आठवत नाहीये. मी उत्तर दिलं, मला माहिती सुध्दा नव्हतं की तुम्हाला तेच नांव हवं आहे.

आज ३ दिवसात तीसर्‍यांदा हे झाले - मी कोणाला तरी काहीतरी विचारणार अगदी त्याच क्षणी त्या व्यक्तीने माझ्या शी संपर्क साधला व मला त्याच प्रश्नाचे उत्तर दिले.
३१ डिसेंबर २०२१ ला रात्री ११:११ वाजता घड्याळावरती नजर गेलेली व १ जानेवारी २०२२ ला सकाळि ११:११ वरती परत नजर गेली.
गेल्या ५ दिवसार , ११ हा नंबर घड्याळात किमान ४ वेळा दिसला.

धिस इज क्रेझी.
फक्त एक बदल सध्या झालेला आहे तो म्हणजे नव्या वर्षी रोज किमान एक नवनाथ पोथीतील अध्याय वाचते आहे. याच्याशी त्याचा काही संबंध आहे का माहीत नाही पण फार प्रचंड सातत्याने, योगायोग आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
हे सर्व आपला नगण्य व किरकोळ, सिमीत, इगो सुखावणारे, स्वतः काहीतरी स्पेशल आहोत असे वाटवणारे असते. बट दॅट इटसेल्फ डिफीटस द पर्पझ. वैश्विक मेधा /प्रज्ञा म्हणुन जे काही आहे अर्थात युनिव्हर्सल इन्टेलिजन्स, तीस श्रेय देउन होइल ते पहात रहावे हे उत्तम.
----------------------------------------
असो हा लेख असे काही अनुभव मांडण्याचा असल्याने मांडले.

चाललय काय? पुनश्च गेल्या तीन दिवसात तीनदा ११ आकडा घड्याळात दिसला. व एक दा १:११ घड्याळात दिसले. आय अ‍ॅम स्पुक्ड.
म्हणजे गिव्हन अ मोमेन्ट घड्याळात ११ मिनीटे दिसण्याची काय प्रॉबॅबलिटी आहे?
बरं १:११ दिसण्याची काय?
आणि ३१ ला रात्री ११:११ व दुसर्‍या दिवशी सकाळी ११:११???? दॅट्स स्पुकी.

बरं मानलं की एंजल्स असे आपल्याला काही सांगू इच्छितात तरी ....
https://c.tenor.com/sSQtnxQ838IAAAAC/arrey-kehna-kya-chahte-ho-what-is-machine-scene-engineering.gif

Pages