संध्येचे लेऊन रंग

Submitted by द्वैत on 1 January, 2022 - 03:01

संध्येचे लेऊन रंग

संध्येचे लेऊन रंग
झाकले अंग
तरी ना परतून आले पक्षी
लाटांची उमगत गाज
बुडाली सांज
उमटली वाळूवरती नक्षी

तार्‍यांची गुंफुन माळ
जोडते नाळ
उदासीन आकाशाशी पाणी
काठावर चांदणभूल
तुझी चाहूल
शोधती नक्षत्रांची गाणी

गात्रांना स्मरते प्रीत
सखीचे गीत
लागते ओढ नव्या जन्माची
होतात पुन्हा आभास
नवा विश्वास
घालतो वीण मुक्या शब्दांची

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गात्रांना स्मरते प्रीत
सखीचे गीत
लागते ओढ नव्या जन्माची
होतात पुन्हा आभास
नवा विश्वास
घालतो वीण मुक्या शब्दांची

खूप सुंदर

वा!