मतंग्या एरिशेरी / लहान लाल चवळी (कडधान्य) आणि लाल भोपळ्याची उसळ

Submitted by पार्वती on 18 November, 2021 - 04:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी लाल चवळी
२०० ग्रॅ लाल भोपळा लहान तुकडे केलेला
अर्धा नारळ खवलेला (दोन भाग करा)
१/२ चमचा जिरं
१ लसणाची कळी
मीठ
फोडणीसाठी :
नारळाचं तेल
मोहरी
सुक्या लाल मिरच्या
कढीपत्त्याची पानं

क्रमवार पाककृती: 

चवळी ८-१० तास भिजवून ठेवा.
कुकरमध्ये पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्या.
कुकर थंड झाला की त्यातच लाल भोपळा घालून कुकरची आणखी एक शिटी काढून घ्या.
तोपर्यंत खवलेल्या नारळाचा अर्धा भाग, जिरं आणि लसणाची पाकळी वाटून घ्या.
कुकर थंड झाला की त्यात हे वाटण घालून १० मिनिटं उकळून घ्या.
नारळाचं तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी करून ती उसळीवर घाला.
त्याच कढईत उरलेला नारळ छान तांबूस होईस्तोवर भाजा आणि खमंग भाजलेल्या नारळाचा चव उसळीवर घालून ढवळून घ्या.
एरिशेरी तय्यार, गरम गरम वाफाळत्या भाताबरोबर गट्टम करा.. (हे सांगायची गरज नोहे).

वाढणी/प्रमाण: 
३-४लोकांसाठी
माहितीचा स्रोत: 
केरळी मैत्रिणीची आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages