आनंदमय चॅनल

Submitted by सामो on 24 November, 2021 - 10:37

आज शिवप्रीत सिंग यांचा चॅनल (https://www.youtube.com/channel/UCKwaFldGnEyuPVzuL3oO3BA) लावुन सुंदर शबद बाणी ऐकत बसले होते. कानांना 'हेड फोन' लावले होते. शिवप्रीत यांचा आवाज म्हणजे मूर्तिमंत माधुर्य आहे आणि त्यांच्या चाली म्हणजे असीम शांती. अक्षरक्षः आनंदडोहात डुंबत होते. आसपासचं भान तर अशा वेळी रहातच नाही. संगीतासारखा उच्च आनंद नाही. नवरा पहात होता व म्हणाला - इतकी मान डोलावते आहेस. तंद्री लागली आहे. या जगातच नाहीयेस. ठीक आहेस ना? कुठे हरवलीयेस?

त्यावेळी मला, स्वयंपाक करायचा आहे, ऑफिसचं काम, कपड्यांच्या घड्या - कश्शाकश्शाचा विचार मनात येत नव्हता. वेळ आणि जग transcend झाले होते.

नंतर मनात विचार आला. आपण सारेच जण, मनातही तर आपण एक ना एक चॅनल लावुन बसतो - बरेचदा काहीतरी अनप्लेझंट, डूखी, कुढे, दु:खी किंवा त्रासदायकच असतो. मन ईश्वराने दिले कशाला आहे? खरच आपल्याला हवा तो आनंददायक चॅनल मनात लावता येइल का? रोज निदान १ तास?
अरे खरच कदाचित यालाच मेडिटेशन/ उपासना म्हणतात Happy मनाला वळण लावायचे, मनात एक शांत, आनंदमय चॅनल लावणे. शिवप्रीत चॅनल Happy

चला तर मग एक वेळ ठरवु यात ज्या वेळी अतिप्रसन्न चॅनल लावायचा. फक्त आपली वेळ. असीम शांतिदायक चॅनलची वेळ. खरं तर आपले विचारच योग्य दिशेस, चॅनेलाईझ करण्याची वेळ नाही का! फाईन ट्युनिंगची, मन-शरीर स्वास्थ्य जपण्याची वेळ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. नित्य आनंदाचा साधा सोपा उपाय. अनेक संत महात्म्यांनी सांगून दाखवून ठेवलेला. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीनेच तो समजतो. 'चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर'
निव्वळ आनंदासाठी साधक भुकेलेला असतो. मन एकदा ह्या सहजानंदात विहार करू लागले की बाकी सर्व व्याधी उपाधी (हे मनाचेच संदेश. मेंदू म्हणेल तर ती व्याधी उपाधी नाही तर चिदानंद) जाणवेनाश्या होतात. मनाला तो आनंद शोधायला लावणे, चॅनलाईज करणे हा योग. तुम्ही स्वतः: ला जितके फाईन ट्यून कराल तितका सूक्ष्म आनंद तुम्हांला मिळत राहील. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदच मिळेल. वाईट बाजूकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टीवर मन स्थिर करणे, मनाला सकारात्मक बनवणे हा योग. सतत विश्व ऊर्जेशी युक्त म्हणजे जोडलेले राहाणे म्हणजे योगी असणे. ही cosmic energy कशी, कुठून मिळवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोण कठोर उपासना, ध्यानादि मार्ग अनुसरतात तर कोणी एकटेच प्रवासाला निघतात. कोणाला अधिकारी मार्गदर्शक सापडून शॉर्ट कट सापडतो. कोणी सतत कार्यमग्न रहाण्यातच आनंद मानतात.
ही realisation ची वेळ जेव्हा येईल तेव्हा तो आनंद गवसेल. सोप्या शब्दांत; realisation म्हणजे वस्तुस्थितीचे भान, सत्य. चित् म्हणजे चैतन्य, आणि आनंद म्हणजे मनाची एक सकारात्मक ऊर्जायुक्त अवस्था. सत् चित् आनंद ही मूळ त्रिसूत्री आहे.
लेख चांगला आहे. असेच चालू राहू दे.

हीरा प्रतिसाद अतिशय सच्चा आहे. अगदी बरोबर आणि नेमक्या शब्दात. प्रत्येकाचा मार्ग निराळा पण गंतव्य एकच.

खरं तर आपले विचारच योग्य दिशेस, चॅनेलाईझ करण्याची वेळ ... फाईन ट्युनिंगची, मन-शरीर स्वास्थ्य जपण्याची वेळ.>>
खर आहे.