Submitted by मोरोपंत on 20 November, 2021 - 13:08
कान्हा नभाची निळाई
राधा क्षितिजाची रेघ
कान्हा अथांग अथांग
राधा अव्यक्ताचा वेध
कान्हा मोहक सुंदर
मोरपिशी मोरपिशी
राधा प्रेम हे निस्सीम
सत्वगुणी नी राजसी
कान्हा रंग शाश्वताचा
झळाळते गे सुवर्ण
राधा रंग हो चंदनी
समर्पण ते संपूर्ण
कान्हा रंग कर्तव्याचा
शुभ्र पांढरा पांढरा
राधा निस्वार्थ भावना
स्वच्छ स्फटिकाचा हिरा
कान्हा भगवे निशाण
उभा धर्म संस्थापून
राधा विरक्ती सहज
आली स्वतःस अर्पून
कान्हा श्यामल श्यामल
राधा सुंदर नी गोरी
राधा न्हाते चांदण्यात
कान्हा तिची गे सावली
कान्हा शोषी सारे रंग
झाला सावळा श्रीरंग
राधा उधळीते रंग
झाली स्वतः पांडुरंग
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
अहाहा.... सुंदरच! शेवटचं
अहाहा.... सुंदरच! शेवटचं कडवं तर उच्च!
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद