Submitted by अनन्त्_यात्री on 17 November, 2021 - 04:14
प्रश्न पडावा असा की
ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला डिवचून नव्या
उत्तरास
शोधत यावा
वाट दिसावी अशी की
अद्भुत प्रदेशी जाताना
विरून पुरत्या पुसून जाव्या
सार्या
हळव्या खुणा
सूत्र सुचावे असे की
ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे
अधिक
गुंफण्यास
अवचित गवसावे काही जे
ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या
स्थलकाला
वाकुल्या
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान कविता..!!
छान कविता..!!
धन्यवाद
धन्यवाद
>>>>अवचित गवसावे काही जे
>>>>अवचित गवसावे काही जे
ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या
स्थलकाला
वाकुल्या
सुंदर कडवे.
सुंदर...
सुंदर...
सामो, दत्तात्रय धन्यवाद
सामो, दत्तात्रय धन्यवाद
सुरेख !
सुरेख !
आ हा हा...
आ हा हा...
आजचे कविता चतुष्टय फारच छान.
आजचे कविता चतुष्टय फारच छान.
अस्मिता, शशांक, हीरा
अस्मिता, शशांक, हीरा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.