हिरवी मिरची लसूण खर्डा

Submitted by अंजली on 4 January, 2016 - 22:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरव्या मिरच्या
आवडेल त्या प्रमाणात लसूण. साधारणपणे मिरच्यांच्या निम्म्या प्रमाणात. मला जास्त प्रमाणात लसूण घातलेला आवडतो त्यामुळे मिरच्यांच्या जवळपास बरोबरीनं घेते.
जीरे
हिंग (ऐच्छिक)
मीठ
तेल

क्रमवार पाककृती: 

या खर्ड्यासाठी लोखंडी खोलगट तवा असल्यास उत्तम. माझ्याकडे नसल्यानं मी नॉनस्टीक पॅनमधे केला.

तेल तापवून त्यात जीरं आणि हिंग घालावं.

मिरच्या आणि लसूण घालावे.

लसूण मऊ झाल्यावर मीठ घालून वाटी / दगडी बत्ता किंवा इतर उपल्ब्ध साधनानं तव्यावरच खरडत (?) / ठेचत बारीक करावे.

झाकून एक वाफ काढावी.

वाढणी/प्रमाण: 
खर्ड्याचं प्रमाण काय सांगणार?
अधिक टिपा: 

आवडत असल्यास हिंग जीर्‍याची फोडणी करून वरून घ्यावी. किंवा दही घालूनही छान लागतो.
पराठ्याबरोबर दही घेतल्यास त्या दह्यात खर्डा मिक्स करून घेतल्यास मस्त चव येते.
कुठल्याही भाजीच्या फोडणीत (कोबी, दुधी भोपळा, झुकीनी वगैरे) हिरवी मिरची ऐवजी चमचाभर ठेचा घातल्यास खमंग चव येते.
एकूण व्हर्सटाईल प्रकरण आहे.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ठेचा/ खर्डा मधे जीरं, हिंग, शेंगदाणे, साखर, लिंबु काय ?
कश्या कश्याची गरज नाही. फक्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या+लसुन्+मीठ. तव्यात तेलावर घालुन थोड्या परतुन तव्यातच ठेचायचं. तोंपासु.

>>>>
वहीं तो.....

मस्त. मागे अमेयने त्याच्या कोणत्यातरी रेसिपीवर खर्ड्याची रेसिपी ही दिली होती तेव्हापासून हुक्की आली की करतेच. तेलावर जिरं, हिंगही घालते.

वाफवल्याने ओला गिजगिजीत होतो . तो क्रिस्पीही हवा थोडा....
छ्या: भागवंतीला सांगितलेच पाहिजे आता.
हिंगाची पुंगाट चव येत नाही का?

धन्यवाद मंडळी Happy
काल अंबाडीची भाजी, भाकरी, दाण्याची चटणी आणि हा ठेचा असा बेत होता.

याचे अनेक प्रकार करता येतात. जीरे हिंग घालून, नुसते जीरे घालून, किंवा नुसत्या मिरच्या-लसूण वगैरे. आपापल्या आवडीप्रमाणे करा. हाकानाका (पण खर्ड्यात्/ठेच्यात साखर घालणे मलाही जमणार नाही Happy ).

खरडा करताना आधी मिरच्या आणि लसूण ठेचून घ्यायचे. मग, तेल तापवून त्यात जिरे घालायचे आणि त्यात मिरची आणि लसूण जो की ठेचला आहे ते मिश्रण घालायचे. मिरचीमधील पाणी आटेपर्यंत खरडा अरत परत करायचा. ह्यात दाण्याचा कुट सुद्धा घालतात. >>> याला आमच्यात कुट्टा म्हणतात.

स्वाती, हो, नुसता परतूनही छान लागतो. वाफवला की पोटाला बरा पडतो म्हणून वाफवते ;). आमच्याकडे तीळ घालून लाल मिरच्यांचा ठेचा करतात. तोही सही लागतो. मिरच्या, तीळ, लसूण आणि मीठ. ज्वारीपेक्षा बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरीबरोबर तेल घालून खायचा.

पादुकानंद,
हिंगामुळे खमंग चव येते. तुम्हाला आवडत नाही तर नका घालू. त्यात काय...

श्री, मिरच्या कमी तेलात परतायच्या आहेत त्यामुळे मिरच्या तळताना जेवढ्या फुटतात तेव्हढ्या फुटत नाहीत.

सेम असाच करतो. फक्त वाफवत नाही. मिरच्या परतून झाल्या कि दगडी खलबत्त्यात कुटते. (कॉस्टकोत अगदी मस्त खलबत्ता मिळतो.) आणि थेंबभर लिंबाचा रस. थोडा जास्त टिकतो आणि हिरवागार रंग बराच वेळ रहातो.
मस्त फोटो अंजु.

असा झणझणीत ठेचा, भाकर्‍या, कांदा, मीठ व गारेगार घट्ट दही सोबत एखाद्या डेरेदार झाडाची गारेगार सावली. जवळच छानसा निवळशंख पाण्याचा ओढा किंवा नदी असावी. मग असे स्वर्गीय अन्न खाऊन जरा विसावुन संध्याकाळी घरी परतावे. ( माझे स्वप्न, बाकी काही नाही )

छान.
रश्मी , माझ्याकडे ये. सगळा तुला हवी तशी शेजारून वाहणारी नदी, डेरेदार वृक्ष ,आजूबाजूला हिरवी शेती सगळं आहे. तू लिहिलेलं मेनू मला बनवायला येतो. फक्त भाकऱ्या तिथे झाडाखाली तुला गरम मिळणार नाहीत.

असा झणझणीत ठेचा, . . . . । .जरा विसावुन संध्याकाळी घरी परतावे.

हे आम्ही केलं आहे आणि अशा जागाही आहेत. फक्त खर्डा नव्हता दुसरे पदार्थ इडली, पराठे दही वगैरे होते.

वर्णिता Happy तुझ्या आग्रही आमंत्रणाबद्दल धन्यवाद! उशिरा पाहीला तुझा प्रतीसाद. मला शिळी भाकरी सुद्धा चालते. पण सध्या शक्य नाही. Sad करोना व घरातले सिनीयर सिटीझन्स . त्यामुळे बाहेर जाता येत नाही. पुढे बघु. Happy

माझ्याकडे नसल्यानं मी नॉनस्टीक पॅनमधे केला.
<<
हार्ड अ‍ॅनॉडाइज्ड अ‍ॅल्युमिनियम पॅन दिसते आहे. हे टिपिकल टेफ्लॉन नॉन-स्टिक नाही.

Pages