युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

मी २ वर्शापुर्वी अन्जलीचा सोर्‍या आणला मागच्या वर्शी आमच्याकडे सुतक असल्याने दिवाळी नव्हती या वर्शी पहिल्यादा त्याने चकल्या करायला घेतल्यात आणी त्याची खालची चकती सारखी निघुन येतेय काय करता येइल? चकलीच पिठ फारस घट्ट नाहिये तरी अस होतय..

अनु केले मी चॉकलेटस. फक्त नालासाठी घोडा नको म्हणुन कोकोनट ऑइल ऐवजी तुप वापरले एक एक चमचा वाढवत हवा तो पातळपणा येइपर्यंत. साखर तु दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडी कमी होती त्यामुळे मिश्रण चाखुन पाहिल्यावर थोडा कोकोचा बिटरनेस होता म्हणून एक मोठा चमचा स्टिविआ टाकली . साध्या भांड्यात पसरवुन फ्रिज मधे ठेवले तरी मस्त वड्या पडल्या. संपले सगळे.
माझ्याकडुन झालेल्य चुका. कोको पावडर मी नीट घुसळली नाही त्यामुळे काही ठिकाणी पावडर तशीच राहिली. स्टिविआ पण नीट मिक्स नाही केली गडबडीत त्यामुळे काही वड्या खुप गोड ,काही मध्यम, काही डार्क चॉकलेट अशी व्हरायटी एकाच भांड्यात मिळाली Happy
हे मीफक्त अर्धी वाटी कोको साठी केले घाबरत, पण आता जास्त करु शकेल. पहिल्यांदा करत असाल तर कमीच प्रमाण घ्या.

तर माझा प्रश्न..
मटकी बरोबर गवार,भोपळा,फरसबी अशी कॉम्बिनेशन करते मी..तसे चवळी आणि मूग बरोबर काय चांगले लागेल..बटाटा नको..कुणी try केले का?नुसत्या उसळी खाऊन कंटाळा आला आहे..

ओके रेवा, फोटो पाहिजेच

मला असं दिसून आलं की त्यातल्या रेसिपी मधल्या प्रमाणा पेक्षा मला कोकोनट ऑईल बरंच वाढवावं लागलं. इतकं करून ते ओतेबल न बनता थापेबल झालं होतं.
बहुतेक मॅजिक बुलेट न वापरता मिक्सर चे छोटे भांडे वापरल्याने काही फरक पडत असेल.

भिजवलेली बारिक ब्राऊन चवळी, मूग, मटकी एकत्र करून, फोडणीत कांदा, टोमॅटो, आले-लसूण, हळद, तिखट मसाला, धने-जीरे पावडर घालून पावभाजीच्या भाजीसारखे मऊ होईपर्यंत शिजवावे. त्यावर कांदा-कोथिंबीर टाकून लिंबू पिळून घ्यावे व बटर लाऊन भाजलेल्या पावाबरोबर खावी. मस्त लागते.

मूग आणि मुळ्याचा कीस, चवळी आणि गाजर, चवळी आणि चवळीचीच पालेभाजी, मूग आणि डाळींबाचे दाणे आणि वाफवलेले कॉर्न यांचे सॅलड, मूग आणि कोबी बारीक चिरुन...... ट्राय करुन पहा...जे आवडेल ते.....
Happy

बेदाणे फ्रीजबाहेर टिकू शकतात का?
<<

एक सोपा प्रश्न.

आपण विकत आणले तेव्हा दुकानात्/मॉलमधे फ्रीजमधे ठेवलेले होते का?

आरारा,
दुकानात,बेदाणे फ्रीजमधे नव्हते तसंच काजू बदाम पण नव्हते.

पण काजू बदाम बाहेर ठेऊन वाया जातात हे अनुभवले आहे. बेदाणे कधी ठेवले नाहीत पण गोड असल्यामुळे रहातील की काय असं वाटतंय. म्हणून इतरांचे अनुभव ऐकायची इच्छा आहे.

मला फ्रीजमधे वाणीसामान ठेवायला आवडत नाही. म्हणून तो कसा मोकळा करता येईल ते पहाते आहे.

मनुका आणि बेदाणे रहातात फ्रीजबाहेर व्यवस्थित.>>>> मागच्या लॉकडाऊनमधे आणलेली बेदाण्याची पिशवी, ५-६ महिन्यानंतर जराशी फुगली.मग फ्रीजमधे ठेवले.बेदाणे चांगले होते.

म्हणजे ४ महिने राहतात फ्रीजबाहेर. तोवर संपतील एवढेच आणायचे नाहीतर आणलेले संपवायचे.

मीपणमीपण

मूगाबरोबर शेवग्याच्या शेंगा , कोवळे बांबू, अंबाडे, ओले काजू मस्त लागतात. मुगा मोळो, मुगा घशी या प्रकारातले अगदी कॉमन कॉम्बिनेशन आहेत.

मोठी पांढरी चवळी + कच्ची केळी , किंवा चवळी + भाजीचा फणस + शेवग्याच्या शेंगा हे पण क्लासिक कॉंबिनेशन आहे.

बदाम खवट लागतात बाहेर ठेवले की. अगदी सुरवातीला कौतुकाने टपरवेयरच्या डब्यात अर्धा किलो काजू ठेवले.आतल्याआत टोके(पोरकिडे) लागून वाया गेले.तेव्हापासून काजू बदाम फ्रीजमध्ये ठेवले जातात.

नाहीतर आणलेले संपवायचे......., काजू बेदाणे तसेही लगेच खाऊन संपतील.

चवळी फणस भाजी चांगली लागेल. मुगाबरोबर मला काही सुचत नाही कांदा, टोमॅटो शिवाय.

मुग मोड आणून फोडणीत नुसते परतून पण छान होतात, थोडा पाण्याचा हबका मारून झाकण ठेवायचं थोडा वेळ, नंतर खरपूस परतायचे. तिखट मीठ चाट मसाला घालून करायचे. मी थोडा ओवा, मीरपूड पण घालते. चाट मसाला ऑप्शनल. चटपटीत होतात.

जास्त लाड करायचे असतील तर आलं लसूण मिरची तुकडे घालायचे फोडणीत किंवा यांचा ठेचा घालायचा, कढीलिंब पण घालायचा, कोथिंबीर शेवटी. हवं तर ओले खोबरं घालायचे.

कुठल्याही उसळीचे नुसते उकडून घेऊन सॅलडही छान होतं, कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, मूळा हवं ते मिक्स करायचं.

भिजवलेली चवळी बारीक चिरलेली मेथी घालुन छान होते. फोडणीत लसूण आणि चिरलेली मेथी टाकून परतुन घ्यायचं, थोडा टोमॅटो आणि मग शिजवुन घेतलेली चवळी, लाल तिखट, काळा मसाला, मीठ आणि थोडा गुळ. किंवा प्रेशर कुकर मध्येच फोडणी करून एक शिट्टी. छान होते. नागपूरसाईडला मेथी बरबटी म्हणुन करतात. सा बांची रेसिपी आहे.
मुगात मी काही फार घालून बघितलं नाही पण पालक बेसनाचे छोटे छोटे गोळे टाकुन छान लागेल अस वाटतं आहे.
भाजी नको असेल भिजवलेले शेंगदाणे पण छान लागतील.

बऱ्याच आयडिया मिळाल्या..thank you मेधा,आंबट गोड, अंजुताई,आभा..
चवळी मध्ये मेथी interesting वाटत आहे..दोन्ही आहे घरी करून बघते.. मूग आणि शेंगा पण चांगलं लागेल ..
इथे लिहिते नंतर..
मेधा कच्ची केळी पण चवळी बरोबर उकडून घेऊ का?

परवाच माझ्या केरळी मैत्रिणीकडे लाल चवळी आणि लाल भोपळा काँबिनेशन खाल्लं. अप्रतिम होतं. रेसिपीसाठी तिच्या मागे लागते आणि पोस्ट करते.

अजून थोडी डाळ शिजवून, हळद वाली थोडी घेऊन आमटी करा
जास्त हळद वाली उरलेली डाळ थालीपीठ,धिरडी,भजी,रसम करून थोडी थोडी सम्पवा की

तसेच ठेवा 2 दिवस

मग त्याच्या देठाकडच्या भागाचा वास घ्या , पिकल्याचा वास येईल

तसेही एकदा आणले की गूळ घालून खाणे , इतकाच कार्यक्रम असतो , कच्चे वाटले तर गूळ , थोडी मिरची घालून मिक्सर करून चटणी होईल

गोड असेल तर नुसताच गुळ घालून खातात.

पण फार दिवस कवठ फळ तसेच ठेवू नका , गर सुकून कवटीपासून आत सुटा झाला की चव बिघडते

कवठ आणलं तर ते कच्चं आहे. काय करता येईल त्याचं?>> गव्हात किवा तान्दळात घालुन ठेवा १-२ दिवसात पिकेल, चटणि करा गुळ-तिखट घालुन किवा छान गोड लागत असेल तर जॅमही करता येइल, दोन्ही छान लागतात.
महाशिवरात्र कधी आहे? कवठ बाजारात यायला लागले म्हणजे शिवरात्र आली जवळ

काय करता येईल त्याचं/> जी ए कुलकर्ण्यांची कव ठे ही कथा वाचुन घ्या. अप्रतीम आहे. बाकी ते प्राजक्ताचेच. गूळ घालून खायचे काही दिवसांनी
बम बम भोले
आता सांगा इडली वर पूड चटणी व तूप घालुन खाताना. पोडी इडली: तर इड ली वर तूप आधी घालून वर चटणी पेरायची का आधी चटणी मग वरुन तूप सोडावे? करेक्ट कार्यक्रम काय आहे?

Pages