मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बिबॉ ने चौघांना बाहेर काढले गेम मधून. >>> अच्छा. थॅंक यू.

ते जेस्चर तरीही पॉजिटिव दिसतेच >>> हे मात्र खरं. नाहीतर तो जय, मीनलला ढकलुन वर सॉरी ही न म्हणणारा.

विशाल खरंतर उत्कर्ष आणि जय या दोघांनाही पुरून उरतो आणि कालही sarcastically मस्त चिडवत होता जयला टेबल वर चढून >>>>>>>> अगदी अगदी. कालच ते जय आणि विशालच एकमेकान्ना शेकहॅण्ड करुन टोमणे मारण फनी होत.

बादवे, कालच्या पहिल्या राउण्डमध्ये कोण जिन्कल ते काही कळल नाही. टिम ए की टिम बी?

मिनल, गायत्री, मीरा टास्कमध्ये एकमेकान्बरोबर भाण्डल्यानन्तर मस्ती करत होत्या. आज मात्र मीरा का रडली ते कळल नाही.

दादूस चॅप्टर निघाले. गेम कळायला लागलाय त्यान्ना. नीथा सुद्दा छान खेळली.

इक्वेश्न्स बदलल्यामुळे टास्क बघायला मजा आली. नाहीतर नेहमी त्याच त्या टीम्स बघून कण्टाळा आला होता.

हो ते खरेच Happy म्हणून 'वाचवले' असे म्हटले नाही. >>>>>>> मेबी दादूसला पोहता येत नसेल म्हणून आला असेल मदत करायला.

. आज मात्र मीरा का रडली ते कळल नाही.
>>विकेंड जवळ येतोय...मांजरेकर चोपतो तिला,तिने काही केले असो वा नसो...

विकेंड जवळ येतोय...मांजरेकर चोपतो तिला,तिने काही केले असो वा नसो...>>> Lol मांज्या टर्मिनेटर पिक्चरमधला व्हिलन आहे एकाच्या पाठीवर लागला की त्याच्याच पाठीवर पिक्चर संपेपर्यंत.

मीराच कौतुक होतय सोमिवर त्यामुळे मोस्टली जय च बोलणे खाइल बॅगेज आणी इतर काय काय बडबड केल्याबद्दल

बिग बॉस मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आणि या कट्ट्ट्याच्या निमित्ताने रेग्युलर भेटणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

विकेंड जवळ येतोय...मांजरेकर चोपतो तिला,तिने काही केले असो वा नसो...>>> Lol मांज्या टर्मिनेटर पिक्चरमधला व्हिलन आहे एकाच्या पाठीवर लागला की त्याच्याच पाठीवर पिक्चर संपेपर्यंत.
<<<
Rofl

विकेंड जवळ येतोय...मांजरेकर चोपतो तिला,तिने काही केले असो वा नसो...>>> नाहीतर काय. गेल्या विकेंडला तिला काही बोलण्यासारखे नव्हते तर ती एक्स्प्रेशन कसे देते त्यावरून सुनावले.

बाकी काही म्हणा, दादुस भारी खेळले हा टास्क Happy मजा वाटत होती त्यांना बघून.
तृप्ती नेहमीच कॉन्ट्रिब्यूट करते टास्क्स मधे. ती डिजर्विंग आहे घरात अजून रहायला. सोनाली डेंजर झोन असली तरी तिला इतक्यात काढतील असे वाटत नाही. मग काय करतील कुणास ठाऊक. कॅन्सल करतील का एलिमिनेशन?
स्नेहा मात्र बायस्ड खेळत होती असे वाटले.

बिग बॉस 1 चा वेली 2 मुले बहुटेक विकास कनुजे यू ट्यूब वर रिव्ह्यू द्यायचे ते आता नाही दे का रिव्ह्यू

बिग बॉस 1 चा वेली 2 मुले बहुटेक विकास कनुजे यू ट्यूब वर रिव्ह्यू द्यायचे ते आता नाही दे का रिव्ह्यू........
देतात.पण कधीकधी उशीर होतो.ऑनेस्टली इनसेन हे नावाने देतात.आधी पण तेच होत बहुतेक.

मग काय करतील कुणास ठाऊक. कॅन्सल करतील का एलिमिनेशन?>> मला वाटत वोट कॅरी फॉरवर्ड पण करतात, या आठवड्यात आणी पुढ्च्या आठवड्यात किती वोट आले टाइप, दिवाळी विकेन्ड मुळे काढणार नाही अस काहिजण म्हणतात.

एका आकाउंटने जास्तीत जास्त 99 वेळा मत देऊ शकतो इथे खरा गेम आहे. सामान्य माणूस एक मत देऊन गप्प बसतो जास्तीत जास्त पंधरा वीस देईल मग हे 99 मतं का? बिग बॉस मतं मॅन्युपुलेट करतात. जेणेकरून trp देणारा त्यांना हवा तो स्पर्धक टिकून राहावा. फक्त 100 अकाऊंट 10000 मतांचा फरक पाडू शकतात. ते ही काहीही न करता फक्त एक क्लिक करून प्रोग्राम रन करायचा. फिनलेला ते असं काही करत नसतील. तिथे पब्लिकने ज्याला जास्त मतं असतील त्यालाच जिंकवत असतील.

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

बोकलत बरोबर, तुम्ही सांगत होतात 99 votes देऊ शकतोतरी मी आदिशला 5 दिली, गेला बिचारा.

बाकी बिग बॉसला अविष्कारला काढायचं होतं, ह्याने वाचवलं, म्हणून voting जास्त असेल तरी घालवले त्याला, बाकी तुमच्या जयला भारी टशन द्यायचा तो, म्हणूनही घालवले असेल त्याला.

बाकी जयचं बांडगुळ स्नेहा फायनलपर्यंत जाईल बहुतेक, bb कृपेने आणि जय कृपेने.

बाकी मीराला कधी कधी उगाच बोलतात म मां हे अगदी बरोबर, पण तिने ह्या जय उतक्याच्या छायेत न रहाता स्वतंत्र खेळावं म्हणून असेल कारण मीनल पाठोपाठ ती मुलींच्यात टास्क मध्ये हुशार आहे असं म मां म्हणतात.

<<बाकी जयचं बांडगुळ स्नेहा फायनलपर्यंत जाईल बहुतेक, bb कृपेने आणि जय कृपेने.>>>
खरंय!!
लाचारीची सीमा असते हेच तिला माहित नाही.
तिचं काहीच योगदान नाहीये कशातच.

खरंच फार लाचार आहे आणि गेममधे पुढे जाण्यासाठी अस करायला तिची काहीच हरकत नाही, मला ती नुसती मठ्ठ नाही, चॅप्टरही वाटते. आपण हेच करुन पुढे जाऊ शकतो बाकी गुण आपल्यात काही नाही, हे तिला स्वतःलाही समजून चुकलं असावं.

मलाही वाटतं कि सोनालीला काढलं पाहिजे , तृप्ती मस्तं खेळते आणि आवाजात दम आहे, डिझर्व्स टु स्टे !
सोनालीच फार कमी काँट्रिब्युशन आहे आणि इतक सगळं होऊन सारखं जयच्या मागे करणही डोक्यात जातय !

बिग बॉस 1 चा वेली 2 मुले बहुटेक विकास कनुजे यू ट्यूब वर रिव्ह्यू द्यायचे ते आता नाही दे का रिव्ह्यू
<<<
देतात कि, भारी असतात त्यांचे रिव्ह्युज Proud
विकास जास्तं धम्माल रिव्ह्यु देतो राजेश पेक्षा, खूप फनी !

इतक सगळं होऊन सारखं जयच्या मागे करणही डोक्यात जातय ! >>> अरेरे, म मां नी एवढं सांगून, चुगली ऐकवून हेच का.

मला समहाऊ दादुस तृप्तीच्या आधी या मुलांच्या मागेमागे करून वेळ घालवणार्‍या स्नेहा, सोनाली गेलेल्या आवडतील !
गायत्री मीरा परवडल्या म्हणायच्या …

Pages