आज शाहरूखच्या मुलाचा आर्यनचा व्हॉटस्सप ग्रूपवर विषय निघाला. ग्रूपवर एक आर्यन नावाचा मुलगाही आहे. अर्थात तो मराठी मुलगा आहे. त्याला शाहरूख बिलकुल आवडत नाही. किंबहुना जिथे त्याला शाहरूखवर टिका करायची संधी मिळते, ती तो सोडत नाही. आणि दरवेळी मी त्याला चिडवतो, लाज नाही वाटत, बाबांना असे बोलतोस
तर सांगायची गंमत अशी की गौरी आणि शाहरूख या हिंदू-मुस्लिम दांपत्याने आपल्या मुलाचे नाव असे ठेवले आहे की ते कुठल्या धर्माचे म्हणावे चटकन कळत नाही. किंबहुना मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्याच जास्त जवळचे वाटते.
सलील! अस्सेच एक नाव. एक शालेय मित्र. अर्थात आमची शाळा राजा शिवाजी विद्यालय, मराठी माध्यम असल्याने तो मराठीच हे आम्हाला माहीत होते. तसेच सलीलचा अर्थ पाणी हे सुद्धा त्याच शाळेत शिकलो होतो. तरीही बाहेरचे लोकं जेव्हा त्याचे नाव ऐकायचे तेव्हा त्यांना तो मुस्लिमच वाटायचा. बहुधा सलीम, साहील, या साधारण तश्याच मुस्लिम नावांमुळे असेल. की सलील नावही असते मुस्लिमांत??
समीर! या नावाचे माझे लहानपणी चाळीत, शाळेत, क्लास वगैरे मध्ये मिळून टोटल पाच सहा मित्र होते. सारेच मराठी होते. पुढे दहावीला डोंगरावर अभ्यास करायला जायला लागलो तेव्हा समीर शेख नावाचा सातवा मित्र मिळाला. जो मुसलमान होता. तेव्हा मला पहिल्यांदा समजले की हे नाव मुसलमानांमध्येही असते आणि ते देखील बरेपैकी कॉमन असते. सलमानच्या एका चित्रपटात समजले की समीर म्हणजे हवां का झोंका. पण तो अर्थ नेमका कुठल्या भाषेत ते अजूनही माहीत नाही.
ईशा! नात्यातल्या एका भावाने मुलीचे नाव ईशा ठेवले. जवळपास पंचवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात एकच गोंधळ. हे कुठले नाव? हे नाव आपल्यात नसते, हे तर मुस्लिमांत असते, वगैरे वगैरे. खरे खोटे अल्लाह जाणे. पण भावाने आणि वहिनींनी सांगितले की पार्वतीचे एक नाव आहे. खरे खोटे राम जाने. पुढे जाऊन समजले की धर्मेंद्र यांचीही एक ईशा देओल नावाची मुलगी आहे आणि घरातले वातावरण निवळले. पण त्याही पुढे जाऊन कोणीतरी सांगितले की धर्मेंद्र यांनीही दुसरे लग्न करायला ईस्लाम धर्म स्विकारलेला आणि वातावरण पुन्हा गोंधळले
असो, तर अभिषेक नाईक! ऐकल्यासारखे वाटतेय नाव ऋन्मेष या आयडीमागचे खरे नाव. ऑर्कुटवरची माझी सेक्युलर विचारसरणी आणि अमन की आशा ईमेजमुळे मला गंमतीने अबू शेख म्हटले जायचे. पण एकदा माझ्या अभिषेक नाईक या नावाला एक मुस्लिम महाविद्यालयच फसले होते.
तर गंमत अशी झाली होती, वीजेटीआयला डिप्लोमाला अॅडमिशन घेण्याआधी मी जवळचेच म्हणून आमच्या भायखळा येथील साबूसिद्धीकी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायला गेलो होतो. तिथे मला मॅकेनिकलला अॅडमिशन हवे होते. जे माझे दहावीचे मार्क्स पाहता मिळायची शक्यता कमीच होती. कारण त्या कॉलेजला मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ७० ते ८० टक्के आरक्षण होते. पण तरीही ते तेथील कर्मचार्यांच्या चुकीने मला जवळपास मिळालेच होते. कारण माझ्या अभिषेक नावातील 'षेक' ला 'शेख' समजून आणि 'नाईक' हे आडनावही मुस्लिमांतही असल्याने माझा फॉर्म चुकून त्या आरक्षणाच्या टोपलीत गेला होता. अॅडमिशनही त्या लिस्टमधील मेरीटनुसार पक्के झालेले. फी भरणारच होतो. ते माझ्याच लक्षात आले की अरे आपल्याला मुस्लिम कोट्यात टाकत आहेत. पुढे काही गडबड होऊ नये या हिशोबाने मी ती चूक संबंधितांच्या लक्षात आणून दिली. आणि माझे अॅडमिशन होता होता राहिले.
नंतर तिथले ऑफिस कर्मचारी येऊन माझ्या वडिलांना म्हणाले की तुम्ही काही बोलला नसता आणि एकदा पैसे भरले असते तर तुमचे अॅडमिशन झाल्यातच जमा होते. पुन्हा फिरून आम्ही वा कोणी रद्द केले नसते. पण नशीबात ते नव्हतेच म्हणा. वा त्यापेक्षाही चांगले होते म्हणूया..
असो, तर मला स्वतःलाही मुलाच्या वेळी असेच एखादे नाव ठेवायचे होते. जे हिंदूतही असावे आणि मुसलमानांमध्येही वा शीखांमध्येही. त्या नावावरून त्याचा धर्म चटकन कळू नये. एक नाव जवळपास फायनलही केले होते. कबीर ! ज्यावरून संत कबीरही आठवावेत आणि चक दे चा रुबाबदार शाहरूख, कबीर खानही डोळ्यासमोर यावा. पण नावांची चर्चा करताना बायकोच एकदा बेसावधपणे म्हणाली, की मला ते ऋन्मेष नावही छान वाटते. आणि मग मलाही तो मोह आवरला नाही.
अर्थात मुलीचे नाव ठेवताना यातले काहीही डोक्यात नव्हते. किंबहुना बारश्याचा दिवस, बारश्याची संध्याकाळ उजाडली आणि घरी जमलेल्या बायका पाळणा हलवायचा विधी करू लागल्या तरी नावाबाबत माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते. अखेर माझे वडीलच म्हणाले, की मुलगी परीसारखी दिसतेय तर तुर्तास परी नाव ठेवा. पुढे सावकाश विचार करून ठरवा आणि जे छानसे सुचेल ते रजिस्टर करून घ्या. परी आपले घरचे नाव राहील. पण त्यानंतर कसले काय. परी हे नाव बोलायला ईतके सुटसुटीत आणि गोड वाटू लागले, आणि त्या नावाशीच भावनिक नाते जोडले गेले, की उगाच कागदोपत्री दुसरे नाव ठेवायची गरजच काय असा विचार केला आणि तेच फायनल झाले.
पुढे जेव्हा मी तिला गार्डनमध्ये नेऊ लागलो तेव्हा परी हाक मारताच किमान चार मुली मागे वळून बघायच्या. कारण बहुतेक मुलींचे हे घरचे नाव असावे. पण आमच्या नाक्यावरच्या सुपरमार्केटमधील मुस्लिम दुकानदाराच्या याच वयाच्या भाचीचे खरेखुर्रे नाव होते. हे असे काही समजले की माझी बायको चिडायची, बघ किती कॉमन नाव ठेवलेस. हे तर मुस्लिमांमध्येही निघाले. पण फायदा हा व्हायचा की त्या मुस्लिम मामाकडून या भाचीलाही वरचेवर फ्री चॉकलेट मिळायचे
तर तुमच्या माहीतीत अशी काही सर्वधर्मीय नावे असतील आणि त्यातून घडणारे काही किस्से असतीत तर जरूर शेअर करा. त्यातले एखादे नाव आवडलेच तर तिसर्या अपत्याच्या वेळी त्याचा विचार करू शकतोच
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
आज क्लिक झालेली काही ईंग्लिश
आज क्लिक झालेली काही ईंग्लिश नावे जी आपणही सर्रास वापरतो.
मोनिका, टीना, तानिया, सोनिया(?)
छान विषय !
छान विषय !
मागच्या पिढीत इकबाल सिंग, इकबाल चंद, इकबाल खान तिघे एकाच गल्लीत राहणारे असे पंजाब/ उत्तर भारतात कॉमन होते.
इब्राहिम (मुस्लिम) आणि अब्राहम (ख्रिश्चन) हे जुळेपण जगभर आहेच.
आताही समीर, अमन, अरमान, अबीर, सना, सारा, मेहर, सीमा ही नावे भारतात सर्वधर्मियांमध्ये आहेत.
सौदीत inspection करता गेलो
जरा अवांतर किस्सा आहे पण इकडे चालून जाईल.
सौदीत inspection करता गेलो असता त्या ऑफिसातला एक जण मला अचानक म्हणाला चलो प्रेयर के लिए. मी म्हटलं कसली प्रेयर मी नाही करत प्रेयर वगैरे. मी असे म्हटल्यावर त्याला धक्काच बसला.
मग त्याच्याशी अजून बोललो असता समजुतीचा घोटाळा काय झाला ते कळले.
हर्षद ला अर्शद समजून तो मला नमाज पढायला घेऊन जायच्या विचारात होता. मग तेव्हापासून तिकडे असताना माझे नाव सांगताना तोंडातून हवा जोरात बाहेर काढू लागलो.
ख ख ख ख खान फ्रॉम एपिग्लॉटीस.
ख ख ख ख खान फ्रॉम एपिग्लॉटीस...
ह ह ह ह हर्षद तोंडातून जोरात हवा काढून
इब्राहिम (मुस्लिम) आणि
इब्राहिम (मुस्लिम) आणि अब्राहम (ख्रिश्चन) हे जुळेपण जगभर आहेच.>>
डॅनीयल/ दनियाल
दत्तमित्र/ दमित्री
दाउद / डेविड
जेकब/ याकूब
(नवीन धाग्याचे potential ;P )
>>>>>>>>ह ह ह ह हर्षद
>>>>>>>>ह ह ह ह हर्षद तोंडातून जोरात हवा काढून
लोल
बाकी ठीक आहे, पण 'दत्तमित्र/
बाकी ठीक आहे, पण 'दत्तमित्र/ दमित्री' हे रोचक वाटलं. कधी ऐकलं नव्हतं.
>>>>>>>>'दत्तमित्र/ दमित्री'
>>>>>>>>'दत्तमित्र/ दमित्री'
माझ्या टीममध्ये एक डिमिट्री आहे.
पण 'दत्तमित्र/ दमित्री' हे
पण 'दत्तमित्र/ दमित्री' हे रोचक वाटलं. कधी ऐकलं नव्हतं. >>> मीना प्रभू यांच्या ग्रीसवरच्या पुस्तकात आहे मोस्टली. दामित्री नावाचा एक ग्रीक माणूसच त्यांना म्हणाला की इथली खूप नावं संस्कृतला जवळ जाणारी आहेत. माझं नावही दत्तमित्र वरून दामित्री आहे. खूप वर्ष झाली वाचून, थोडं काही चुकलेले असू शकते म्हणजे देश वगैरे (तसं असेल तर आगाऊ माफी) पण मला लिहिलेलं बरोबर वाटतंय.
ख ख ख ख खान फ्रॉम एपिग्लॉटीस.
ख ख ख ख खान फ्रॉम एपिग्लॉटीस...
आता ह्याला मराठीत काय म्हणतात ते पण सांग माझंही इंग्रजी तितकंसं चांगलं नाहीये
ह ह ह ह हर्षद हे असं म्हटलं की आपण किती हसतमुख आहोत त्याची जाहीरात केल्यागत वाटतंय मजा येईल असं नाव सांगायला.
ईसप युसुफ
ईसप युसुफ
अच्छा! दिमित्री हे ग्रीक नाव
अच्छा! दिमित्री हे ग्रीक नाव ऐकले आहे, पण त्याचा भाऊ दत्तमित्र माहीत नव्हता. संस्कृत-ग्रीक शब्दांत अनेक देवाणघेवाण झालेली आहे (त्रिकोणमिती - ट्रीगोनोमेट्री वगैरे), त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही.
दाऊद.
दाऊद.
हे नाव आजकाल मुस्लिम आणि हिंदू दोन्ही धर्मात आढळते.
Pages