Submitted by अनन्त्_यात्री on 23 September, 2021 - 06:01
संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उलगडे कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?
भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते
कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
क्षण आत्ताचा क्षणजीवी नच
क्षणोक्षणी वर्तमान कथिते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर..
सुंदर..
वाह!! आवडली.
वाह!! आवडली.
कालौघाची गाज - सुंदर!
नेहमीप्रमाणे सुंदर आणि गूढ
नेहमीप्रमाणे सुंदर आणि गूढ रचना..!!
सुंदर....
सुंदर....
संभाव्याच्या अब्ज छटांतून ...
संभाव्याच्या अब्ज छटांतून ........................... क्या बात है!!! ही ओळही अफाट आहे.
वा वा! सुंदर!
वा वा! सुंदर!
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व कवितारसिकांना धन्यवाद!
वा फारच आवडली
वा फारच आवडली
जबरदस्त..
जबरदस्त..
एकदम जबरदस्त!
एकदम जबरदस्त!
अवल, शशांक, मुग्धमानसी
अवल, शशांक, मुग्धमानसी धन्यवाद.