Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Option strategy मध्ये risk reward ratio कसा ठरवावा?
स्टॉप लॉस डेल्टा व्हॅल्यू वरून ठरवता येईल का?

strategy प्रमाणे अवलंबून आहे.
Short strangle/straddle मध्ये लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस असतो. हेच लॉंग केले तर उलट होते.

Spreads , iron condor वगैरे मध्ये लॉस प्रॉफिट दोन्ही मर्यादित असतात आणि रिस्क रिवार्ड रेशो मोजता येतो.

मागच्या पानावर सतीश यांनी deifneage/opstra ची लिंक दिलीय ना, तिथे पोझिशन घेऊन पहाता येइल किती मॅक्स प्रॉफिट, किती लॉस, त्यावरून काढता येइल रेशो.

अन्यथा strategy प्रमाणे calculate करावे लागेल.

निफ्टी लॉट 50 चा झाला आहे , आता लिक्विडीटी चाम्गली दिसत आहे. पुन्हा ह्यातच करायला हरकत नाही

सलग 4 आठवडे लावूया , विकली कॉल स्प्रेड, फक्त 1 लॉट लावणे,

का ? आणि मग गडगडगड का ?

Weak global cues.
Rising crude.
Jump in VIX.

गडगडतय.

आज 800 चा लॉस बुक केला. मला एक विचारायचं आहे, मार्केट विरुद्ध दिशेला जाऊ लागल्यावर ऑपशन मध्ये ऍडजेस्टमेंट करायची असं म्हणतात. कोणाला काही माहीत असेल तर याबाबत अजून जाणून घ्यायला आवडेल. लिंक असेल तर शेअर करा.

36500 स्ट्रॅडल गेल्या 1 सप्टेंबरला विकले आहे , अंदाजे 700 + 700 मिळून 1400 गोळा झाले आहेत

मध्यंतरी 11000 प्रॉफिट मध्ये आले होते
मग ब्या नि वाढल्यावर 5000 लॉस मध्येही गेले होते

दोन दिवसात ब्या नि पडल्यावर आता परत 7000 प्लस आहे

Screenshot_2021-09-21-10-51-50-161_com.axis_.login_.png

Wait untill it goes above ३७१००

३७१०० च्या वर १० १५ मिनिटे ट्रेड केला तर एक्झीट.
नाही तर राहू द्या गुरुवार पर्यंत.

Cool

हं

काल थोडे वाढले
आज परत पडले

म्हणजे काल मांजर मेले होते

Dead cat bounce

dead-cat-bounce-2008_big.jpg

मी फिंगर क्रॉस करून आहे. मी 30 Sep चे 38000 चे कॉल्स विकले आहेत चार दीड महिन्यापूर्वीच. हेज 40000 ने.

तुमची ब्या नि ची पोझिशन आता घ्यायला अगदी मस्त आहे

ग्लोबल निगेटिव्हमुळे आणि 37500 ला तसाही एकदा रेसिस्टन्स आला आहे , म्हणून 38000 कॉल 200 ला विकायला हरकत नसावी

तीन हजारचा फरक आहे ना स्ट्राईक मध्ये.
3000 × 25 = 75,000 इथेच झाले.
अधिक (143.4 + 19.8) x 25. झाले 80 हजार.

38200 चा कॉलपण विकला , 120 रु
हेज केला , फक्त 30000 मार्जिन लागले
दोन्ही मिळून एक लाख मार्जिन

कॅलेंडर स्प्रेडचे एक्झिट नियम काय आहेत. हा कॅलेंडर स्प्रेड घेतला तर किती प्रॉफिट/लॉस झाल्यावर बाहेर पडायला पाहिजे?
Screenshot_2021-09-22-18-27-08-447_com.zerodha.kite3_.jpg

छान

जो विकलेला कॉल आहे , 130 चा , तो अगदी 0 झाला तर जास्तीत जास्त नफा मिळेल , पण त्या काळात वरचा बाय केलेला कमी झिजणे महत्वाचे आहे, जास्तीत जास्त फायदा माझ्या मते 1500 ते 2000 होईल

जर निफ्टी फारच खाली गेला , तर तो बाय केलेलाही 0 कडे वाटचाल करू लागेल , मग लॉस होऊ लागेल , पण अगदी तोही 0 झाला तर मग जास्तीत जास्त लॉस 3000 रु होईल , ( 192 -130 गुणिले 50 बरोबर 3100 , this is the max loss. )

मी काल घेतलेला स्प्रेड आज 1000 रु नफ्यात काढला.

उद्या लक्ष ठेवून रहा, थोडेफार प्रॉफिट मिळाले तरी प्रॉफिट बुक करा,

विकली स्प्रेड म्हणजे 20:20 मॅच असते, लगेच काढून टाकणे , मंथली स्प्रेड म्हणजे टेस्ट मॅच असते, थोडा जास्त वेळ हातात असतो.

Pages