माझ्या आठवणीतली मायबोली - श्यामली

Submitted by श्यामली on 18 September, 2021 - 16:06

माझ्या आठवणीतली मायबोली या विषयावर यंदा मायबोलीच्या गणेशोत्सवानिमित्त लेख लिहायचा आहे मायबोली २५ वर्षांची झाली , तुझा लेख वाचायला आवडेल असा अगदी सुरवातीला एका माबो मित्रानं मेसेज केला, म्ह्टल अरेच्चा २५ वर्ष झाली ?

पुन्हा एका दिवसानंतर दुस-या एका माबो मित्रानं स्टेट्सला मायबोली गणेशोत्सवाची लिंक पोस्ट केली होती , पुन्हा येऊन बघून गेले, लिहाव वटायला लागलं पण मुहुर्त मिळेना , थोडासा आळस आणि उगाच काहीबाही कारण, तर ते असो, नमन झालं घडाभर तेल पण झालं

तर , साधारण २००५ मध्ये मी सहकुटुंब बाहरेनला शिफ्ट झाले, तोवर भारतात अजून एवढं घरोघरी इंटरनेट आलेलं नव्हत त्यावर ई मेल करण्यापलिकडे अजून पण बरंच काही असू शकतं हे मला माहित देखिल नव्हतं।
इंटरनेट साक्षरता मायबोलीवर आल्यामुळे
नविन देश नविन लाईफ़स्टाईल। मला वाचायला प्रचंड आवडत, तेंव्हा पण आवडत होतच, पण इंग्रजी वाचायचा कंटाळा यायचा इंटरनेटवर मराठीत देखिल काही वाचायला मिळेल असं तेंव्हा वाटलं नव्हत . मराठी गाणी शोधत असताना मायबोलीचा शोध लागला, मला आठवत त्यानुसार अंताक्षरीवर पहिले पोचले तिथेच काही दिवस रमले होते, मग हळू हळू न्यु मेसेज चा दिवा लागला की तिथे नविन काहीतरी वाचायला मिळणार हा शोध लागला, मग उंडारतच सुटले होते. बाहरेन हा जरा अडनिडा टाईमझोन आहे मी उसगावातल्या काही बिबिंवर पण बडबडायचे, पुपु , एसजीरोड, कुवेत , मराठवाडा , मुंबई म्हणजे मला कोणी तरी ओमनी प्रेझेंट म्हणायला लागलं होतं , एवढा वेळ मायबोली वर पडिक असायचे

शनिवार रविवार मायबोली शांतावून जायची , त्या वेळी बहुतेक फक्त offices मधूनच इंटरनेट एक्सेस असावा त्यामुळे शनिवार रविवार अगदीच शांतता म्हणजे अंताक्शरीवर कोणी नाही आणि वाहते बिबि पण ओस पडलेले असायचे , अगदी क्वचित कोणीतरी कविता, चारोळी , गझल अशा पोस्टी टाकायच। उसगावातली मडळीच यात असायची जास्त करुन ।

मग गम्मत म्हणून चारोळी बिबि वर प्राचीला गच्ची करत थोड थोड लिहायला लागले, मजा यायला लागली , म्हणजे आपण लिहावं आणि प्रत्युत्तर म्हणून कोणीतरी त्यावर पुन्हा चारोळी लिहावी ही तर मज्जेची परिसिमाच होती माझ्यासाठी त्या वेळेला . पण भर म्हणजे जरा बरं लिहिलं तर कौतुक देखिल व्हायला लागलं , देवनागरी लिहिताना होणा-या चुका दाखवून देत त्या सुधारण्यासाठी मदत करणारी मंडळी इथे आपलीशी वाटायला लागली।

अचानक माणसातन उठून वाळवंटात पडलेल्या माझ्यासारखीला हा आभासी(वर्च्युअल या शब्दाला आभासी शब्द अजिबातच न्याय देत नाहिये ) मित्र परिवार आपलासा वाटायला लागला।
विशेषत: पुण्यातली मंड्ळी , अमेरेकेतली मंडळी, कुवेतमधली मंड्ळी , सगळी एकमेकांना धरुन राहणारी हाच आपला मित्र परिवार असं मी तेंव्हा ठरवून टाकलं Happy

एका वविला मी जायचं असं ठरवलं कारण त्या वर्षी वविच्या तारखे दरम्यान डोंबिवलीला जाणार होते।
त्या वर्षी पहिल्यांदा मी मयुरेश, रुमा, मिनू, साजिरा, देवा , इंद्रा, नील, मनी , किरु , राम, अशा काही मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटले। रुमा , मयुरेश या दोघांनी तर मला त्यांच्या घरी राहयला बोलवलं होतं , मी माझ्या मुलांसकट रुमाकडे राहयला गेले होते पुण्याहून वविला कर्जतला मग कर्जतवरुन लोकलनी वाशीला अशी माझी वरात मायबोलीकरांच्या मदतीनं अगदी सहज पार पडली होती असे अगदी जीवाभावाचे अनेक मित्र मैत्रिणी या मायबोलीन दिले आहेत।

मित्रपरिवार वाढला अगदी जगाच्या कुठल्याही कोप-यत आपण जाणार असू तर इथे माहीती मिळवायची मग जाऊ तिथे भेटायचं हे तर अगदी एखादा प्रघात असल्यासारखं झालं होतं, झालं आहे , अजूनही हे करतेच मी

चारोळ्या लिहिता लिहिता कविता देखिल लिहायला लागले , काही कविता नियतकालिकांमध्ये , वर्तमानपत्रांमध्ये, दिवाळीअंकांमध्ये छापून यायला लागल्या, इथेच झालेल्या गझल कार्यशाळेमधे गझल लिहायला शिकले। लेखक म्हणून ओळख निर्माण व्हायला लागली.

मग बराच वेळ हाताशी आहे म्हणून मायबोलीच्या दिवाळीअंकासाठी काम केलं ,पहिल्यांदा केलं ते फ़ार छुटपुट काम होतं पण शिकायला मिळालेलं सगळच फ़ार महत्वाचं होतं । मग नंतर सरळ मुख्य संपादक म्हणून काम दिलं गेलं, तिथेही शिकले।

मायबोलीच्या बेटा टीम मधे काही वर्ष होते, स्वागतसमिती आणि अजून काय काय केलं आठ्वत सुद्धा नाही खरतर म्हणते कसं ना , घरात स्वयंपाक केला, त्यासाठी भाजी आणली कणिक भिजवली भाजी चिरली असं नाही ना सांगत आपण तसं काहिसं।

मी लिहिलेल्या गाण्यांचा अल्बम त्याचं इथे झालेलं कौतुक मग त्याला मिळालेला पुरस्कार हे सगळं सगळ फ़ार म्हणजे फ़ार जिवापासच आहे, मायबोलीनं मला घडवलं आहे असं म्हट्ल तर वावगं ठरणार नाही।

मायबोली पासून दूर गेल्यानंतर अता परत आल्यावर कसं वाटत आहे? हा प्रश्न खरं म्हणजे असायला हवा, मी मलाच हा प्र्श्न घेतला आहे आणि खरं खरं सांगते माहेरी आल्या सारखं वाटत आहे, किती तरी वेळ अंगणातच बसून राहिले होते, इकडे तिकडे उंडारले, किती कप्पे उचकले? किती नाव शोधली ? किती जुनी पानं चाळली ? सगळच लिहित बसले तर दिवाळी येईल Happy

उत्तम उत्तम वाचायला , बघायला , करायला शिकवलं मायबोलीन।
मायबोली नावाच्या विद्यापिठात मी घडले आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे

गाजलेलं लेखन म्हणजे मायबोली गणेशोत्सवासाठी मी एक गणेशवंदना लिहिली त्याचे संगितसंस्कार होऊन ती मायबोलीलाच अर्पण केली ती इथे ऐकायला मिळेल बहुतेक
https://www.maayboli.com/node/10138

एके वर्षी दिवाळी अंकात चांगल्या कविता आल्याच नाहीत म्ह्णून कविता विभाग रद्द केला होता पण audio दिल्यामुळे माझी कविता स्विकारली गेली होती तो दिवाळी अंक काही आठ्वेना आणि कविता audio पण मिळेना।

मला प्र्श्न उत्तर लिहायला जमलेलं नाहीये तेवढं अडजस्ट करा प्लिज Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! बर्‍याच आधीपासून इथे असलेल्या मंडळींनी लिहीलेल्या आठवणींबद्दल जास्तच कुतूहल आहे Happy

सगळच लिहित बसले तर दिवाळी येईल >> टोटली चालेल Happy

तू बहुधा तुलनेने जुन्या माबोवर जास्त अ‍ॅक्टिव्ह होतीस. कदाचित "काही वर्षांपूर्वी" आणि "जुनी माबो" हे माझ्या डोक्यात मिक्स होत असेल. आपण पुण्यात मल्टिस्पाईस वाले एक गटग आणि आणखी एक दोन वेळा भेटलो होतो. पण लक्षात राहणार्‍या गप्पा बर्‍याचश्या कुवेत बीबी वरच्या.

छान लिहीलेय.

विषेशत: ईथेच पहिल्यांदा लिहून नंतर कवी/लेखक म्हणुन विकास होणे हे काहींच्या बाबतीत घडले त्याचे अप्रुप वाटते.

जुन्यांपैकी बहुतेक जण २००४ -०५ -०६ पर्यंत आलेले आहेत. १९९६ पासुनचे सदस्य आता दोन सोडून कोणीच नाही का?

तेव्हाची मायबोली हितगुज जास्त होती. त्या सुमारासच बहुतेक एक स्थित्यंतर झाले असावे कारण मी तेव्हा वाचलेल्या काही चर्चा दुसरीकडे सुरू झालेल्या दिसतात पण ते दुसरीकडे कुठे ते सापडत नाही. त्या आधीच्या कालखंडातील काही आयडींच्या व त्यांच्या साहित्याच्या चर्चा तेव्हा वाचलेल्या आठवताह्त. त्या आयडींनी ह्या ऊपक्रमापुरते तरी येऊन लिहावे असे वाटते.

मस्त लिहिलंय.
अगदी जुन्या आयडींच्या आठवणी वाचून मजा वाटते.

मस्त लिहीलयस

कवितेला गंभीरपणे घेणारी आणि आपल्या कवितेला आपणच मस्करीत घेऊ नये असा माझा कान पकडून कळकळीचा सल्ला देणारी माझी मैत्रीण आहेस तू. मी तो सल्ला मुरवला आहे. हक्काने आणि प्रेमाने कान पकडणारी अशी मैत्री मला आवडते Happy

अय्यो! वाचलं सुद्धा तुम्ही लोकांनी , धन्यवाद दोस्त्स Happy
सगळच लिहित बसले तर दिवाळी येईल >> टोटली चालेल Happy >>> अरे अ‍ॅडमिन ब्लॉक करतिल मला Lol
तू बहुधा तुलनेने जुन्या माबोवर जास्त अ‍ॅक्टिव्ह होतीस. कदाचित "काही वर्षांपूर्वी" आणि "जुनी माबो" हे माझ्या डोक्यात मिक्स होत असेल.हितगुज असाच उल्लेख करायचो आम्ही तेन्व्हा. दृपल वर शिफ्ट व्हायच्या आधीचाकाळ

बरोबर आपण सगळ्यात पहिले मल्टी स्पाईसला भेटलो होतो, कुवेत बिबि मुख्य ठिकाण Happy

अल्बम अन लोकसत्ता लेखाची लिंक ओपन होत नाहीये .>> अल्ब्म , अनेक म्युझिक साईटसवर आहे, अणि युट्युबवर सुद्धाअ आहे

लोकसत्ता मधे आलेल हे चांदणशेला च परिक्षण http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id...
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद

विषेशत: ईथेच पहिल्यांदा लिहून नंतर कवी/लेखक म्हणुन विकास होणे हे काहींच्या बाबतीत घडले त्याचे अप्रुप वाटते.) Happy Happy धन्यवाद

देणारी माझी मैत्रीण आहेस तू. मी तो सल्ला मुरवला आहे. हक्काने आणि प्रेमाने कान पकडणारी अशी मैत्री मला आवडते>>
हे देखिल इथेच शिकलेल , कोणीतरी म्हणायच इथलं इथेच देऊन जावं , मी फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आहे आणि त्याच पालन करते आहे, अशा अनेक गोष्टी मायबोलीन शिकवल्या आहेत ग Happy