शशक पूर्ण करा - विश्वनाट्य सूत्रधार - स्मिताके

Submitted by स्मिताके on 13 September, 2021 - 20:38

विश्वनाट्य सूत्रधार

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

आला.. युगानुयुगे ठरलेला तो मुक्तीचा क्षण आला. या क्षणाच्या प्रतिक्षेने पंचमहाभूतं आनंदली आहेत. पाणी दुथडी भरून खळखळतं आहे. वारा सुसाट धावतो आहे. अंधाऱ्या रात्री या विश्वपटावर एक विशाल नाट्य घडतं आहे.

कारागृह अचानक लख्ख प्रकाशानं उजळलं पहा. पहारेकरी गाढ झोपले आहेत.

ते आवाज ऐकलेत? बेड्या निखळून पडल्या आहेत.

आता यापुढे चिमुकल्या बाळाच्या खोड्या पाहायला मिळणार.. दह्यादुधाच्या चोऱ्या होणार.. बासरी वाजणार.. बरंच काही घडणार आहे.

दरवाजा तुझ्यासाठीच उघडला आहे, वसुदेवा.. . बाहेर ये. छोट्याशा पावलांचा स्पर्श यमुनेला होऊ दे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

sundar!!!