खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी

Submitted by संयोजक on 5 September, 2021 - 19:02

मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !

१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.

प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)

उदा: श्री गणेशाय नमः


(रात्र काळी घागर काळी या चालीवर Happy )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !

कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल. Happy

हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>झटपट पैसा कमवा ऑनलाईन पद्धतीने अगदी मोफत.<< ???.

लबाड लांडगं ढाँग करतंय
लबाड लांडगं ढाँग करतंय
पैसा कमवायचं सोन्ग करतंय, सोन्ग करतंय
लबाड लांडगं ढाँग करतंय !
ऑन्लाइन नवरा, मोफत नवरी, माबोवरी अ‍ॅड टिकंना
माबोवरी अ‍ॅड टिकंना अन चोराला आयडी पुरंना
वेमाचा टोला, वेमाचा फटका
पाठ चोळीत लांब पळतंय...
लबाड लांडगं ढाँग करतंय

या अफाट जाळ्यामध्ये
मी माबोत रमलो आहे
वर्षाव इथे धाग्यांचा
मी वाचित दमलो आहे

( या विराट गगनाखाली)

सगळ्या कविता मस्त ! पण आत्ता इथं शांत शांत का !? Happy मी करते प्रयत्न.
# आहे
(ह्रदय हासले मी गुणगुणले )

ह्रदय हासले काव्य प्रसवले
नीज न ये परि स्वप्न पाहिले
शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध झाले
गझला, कविता, गीते, विडंबने
रुंजी मनी मम घालू लागले
प्रतिभा न जाणी प्रहर
अष्टौप्रहर तिला बहर
ट ला जोडुनी ट करीत साधना
मन माबोसवे दंगले दंगले

भरगच्च उपक्रम जोरात सुरू असल्याने इथे पाहू की तिथे वाचू असं झालंय! Happy

लांबून हासणे अन जवळून 'छान' म्हणणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

माझ्याच चाहत्यांचा का सांग त्रास व्हावा
मिळता मला लाइक्स तुज का पोटशूळ उठावा
हे प्रश्न जीवघेणे हरती इथे शहाणे!

@स्वाती गंमत म्हणुन तुला प्रत्युत्तर देतेय Wink

नसे मजला तुझी असूया न उठे पोटशूळ
आभासी लाईक्स हा फक्त पत्त्यांचा खेळ
दुधारी तलवार प्रसिद्धी जाणून आहे मी
'जाणुन आहे मी' हे विसरु नकोस तू ही
-----------------------
@चंद्रा - अप्रतिम!!!

सामो Proud

हाती माऊऽस ज्याच्या त्याला कसे कळावे
अनमान होत ज्याचा त्यालाच दु:ख ठावे
हलकेच घ्या, दिवे घ्या, आम्ही मुळी दिवाणे! Proud

(नको रे नको नंदलाला..)

नको टेस्टरा, टेस्टरा
धरू नको रे माझ्या बगाला

(आयटीतले नाहीत त्यांच्यासाठी - बग = सॉफ्टवेअरमधील त्रुटी, जी टेस्टर टेस्टींगदरम्यान उघड करतो.)

लाडू रव्याचे वळताना
बेदाणे नाही घातले
बेदाणे लाडूत घालताना
दुनियेस का डरावे
तोडुनिया चकली तळु नको
मोहुनिया फराळ पाहू नको

(ह्रदयी वसंत फुलताना)

कसे करु संपादन बाई, प्रतिसादाची केली घाई
प्रतिसादाची केली घाई पळता झाली थोडी भुई
लाल तापला पत्रा आणि त्या तापल्या पत्र्यावरती
पहा माझी भाटी पहा कशी नाचते थुईथुईथुईथुई

Lol Proud Lol

इथेच टाका तंबू
पॉपकॉर्न आणा खुर्च्या मांडा
वाद बघत थांबू!

@स्वाती Happy हाहाहा

बिलंदरा बिलंदरा माबो रसिका बिलंदरा
बिलंदरा बिलंदरा त्रिवार वंदन बिलंदरा
बिलंदर बिलंदरा माबो रसिका बिलंदरा

बिलंदर शिरोमणी ड्युआयडी रसिका वाद ऐकत टेक ना जरासा
मसाला पॉपकॉर्न घेऊनी करी, टाक मधेमधे तव पिंकांची पिचकारी
पिचकारीने रंगलेले त्रस्त पण सौजन्यशील अन्य आय डी
तुला धुतील अशी भीती धरु नको मानसी कारण .......

बिलंदरा बिलंदरा माबो रसिका बिलंदरा
बिलंदरा बिलंदरा त्रिवार वंदन बिलंदरा
बिलंदर बिलंदरा माबो रसिका बिलंदरा

डोल डोलतंय वार्‍यावर बाये माजं डोल डोलतंय वार्‍यावर

चर्चा वाचता भंजाळे माथा
ह्ये बी पटता त्ये बी पटता!
म्हनून डोल डोलतंय...

रश्मीरथी उगवला पहा प्राचिला चढली लाली
ऊठ गणेशा विनविते अखिल विश्वाची जननी
चक्रवाक युगुले भेटली उमलल्या कमलिनी
तव आशीर्वादास्तव तिष्ठती यतीजती,ऋषीमुनी

सामो, तुम्ही एखादे स्तोत्र मूळातूनही उत्कृष्ट लिहू शकाल. संस्कृत / मराठी शब्दसंग्रह अफाट आहे तुमचा Happy मग आम्ही त्यातले शेवटचं चरण ‘सामो’ म्हणे म्हणत देवापुढे माथा टेकू!
पण आता य घ्यायचा कि न ?

Happy न.

बरं Happy
( पाहिले न मी तुला ..)

न कुणा कधी भेटले, कुणी मला न पाहिले
अंताक्षरीच्या दोऱ्यामध्ये मन वेडे गुंगले
शीघ्रकाव्यप्रसवाच्या वेदना निराळ्या भयंकरी
कुणी पाहिल डेस्कटॉप, चिंता ही भयकरी Happy
शीघ्रकवी बनण्यासी इतुके ते सोसणे
न कुणा कधी भेटले कुणी मला न पाहिले …

इथेही (नेहमीच्या अंताक्षरीसारखा) शेवटी वारंवार 'ल' येतोय. तेंव्हा गरज भासल्यास 'ल' च्या आधीचे अक्षर घेण्याची मुभा संयोजक देतील का? Happy

पडत्या फळाची घेऊन ह वापरलंय...

ही चाल रडुरडू, पळे धागा जरा हळू
लोणकढीवर माबो हलली
जशी अनिळजीच्या भुतानं लांडगापुरच्या खोतानं
माबोकरांची झोपं उडली!

उगाच कोतबो काढून, फुकाचं सेंटी मारुन
प्रतिसाद चाचपुन डोळ्यानं, ट्विस्ट नवा देशी कसा झोक्यानं
हा राग जीवघेणा खोटाखोटाचं बहाणा
आता तुझी मला खुण पटली..
जशी अनिळजीच्या भुतानं लांडगापुरच्या खोतानं
माबोकरांची झोपं उडली!

कोतबो खरी ही असू शकतात, रादर असवीतच. फक्त मायबोलीवर हल्ली फाजिल लोकांनी कोतबोतला सिरियसपणा घालवुन टाकला आहे. हे फक्त त्यांनाच आहे. कोतबोतला सिरियसनेस घालवू नका.

अमित Lol

अमित Happy

(जखम होते आणि त्याबद्दल अवाक्षर न शोधता गूगल अचानक त्याच्या उपायार्थ जाहिराती दाखवू लागते - ह्या अनुभवावरून...)
चालः लाजून हासणे

लागून खाजणे अन् खाजून ते वहाणे
मी गात एक आहे जख्मेवरील गाणे

खेळात भांडताना का सांग मार द्यावा?
दिवसाच नेत्र मिटता का चांदण्या दिसाव्या?
हे प्रश्न जीवघेणे उठती पुन्हा नव्याने
मी गात एक आहे जख्मेवरील गाणे

हाती न फोन माझ्या, तरीही कसे कळाले
गुगलास दु:ख माझे, जे मी न शोधियेले.
यूट्यूब जाहिराती - बँडेडचे तराणे
मी गात एक आहे जख्मेवरील गाणे

न किंवा ग घ्या

Pages