प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - वाहन/गाडी

Submitted by संयोजक on 13 September, 2021 - 04:25

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे वाहन/गाडी.

वाहन/गाडी

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

स्वरूप, माझ्याकडे सेम अशीच गाडी होती.. अजून आहे पण तुटली .आठ वर्षापूर्वी ची मुलाची, आता मुलगी खेळते.

sail.JPG

ही हिरॉईन Paris ला रस्ता ओलांडताना दिसलेली.
12 वर्षापूर्वी ची गोष्ट , त्यामुळे अप्रूप.

IMG_20210913_222954.jpg

पुण्याला जाणारी डबलडेकर गाडी तिथून जायची (कुठून पुणे आठवत नाही), नवीन सुरु झालेली, मी पाचवीत वगैरे असेन. >>> सिंहगड एक्सप्रेस. दुपारी साधारण साडेतीनला कल्याणला येत असे म्हणजे "तीन ला जाण्याची" आठवण बरोबर आहे.

सकाळीसुद्धा ती ९ च्या सुमारास डोंबिवली पार करते. डोंबिवलीहून दादर/व्हीटी वगैरे जाणार्‍यांना नऊ व साडेनऊ च्या सुमारास दोन वेळा फास्ट लोकल्स मधे २० मिनीटे नसतात हे लक्षात असेल. पूर्वी तरी तसे होते. सिंहगड व डेक्कन क्वीन तेव्हा जातात.

IMG_20200101_133456.jpg
हा २०१९ - डिसेंबरचा फोटो.
सकुसप डबल डेकर मधुन फिरुन गेटवेला गेलेलो. पण काय होतं त्यादिवशी कोण जाणे भयंकर गर्दी होती. ती बघुनच परत आलो. Lol

हाहाहा.

पायासह तुमचा पोस्ट करा.

काहीही हा अन्जू.
पण धन्यवाद तुमच्या पोस्टी मधे आल्याने मी झब्बू देऊन मो़कळा होतो.

Dhoni.jpg

मालदीवमधे बेटंच बेटं.
तिकडे पारंपारीक रित्या एका बेटावरून दुसर्‍या बेटावर जायला अशा प्रकारच्या बोटी वापरतात त्यांना ढोणी / धोणी असे काहीतरी म्हणतात. मी बहुदा तिकडे असतानाच मायबोलीवर खाते उघडले होते. ( बहुदा म्हणतोय कारण नक्की आठवत नाही. तिकडे किंवा त्याच्या थोडेसेच आधी मॉरिशसला असताना उघडले. )

सर्वच छान !

आतापर्यंत न झालेले एक वाहन :
baby cycle (2).jpg

Pages