शशक पूर्ण करा - दामिनी - राज

Submitted by राज on 11 September, 2021 - 11:54

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

"बॉस, अब्बी इस्को टपकानेका क्या?"
"नैरे, गणपती के टाइमपे आपुनको खून कि होली खेलनेका नै"
"तो, फिर्र?"
"गोदामके पिछवाडुमे जो नाला है, उधर इस्को डाल देगा, चुहोंके लिये. साऽला, गंदी नालीका किडा.."
"सहि है बॉस. चमडीचोरोंको ऐसेहि मौत देना चाहिये..."

हे ऐकुन हा फाटका माणूस कोण याची कल्पना आली. तळपायाची आग मस्तकात गेली, जीवाची पर्वा नकरता मी त्याच्यावर झेप घेत त्याचा चेहेरा कच्चकुन ओरबाडला, आणि उघड्या दारातुन ऐटित बाहेर पडले.

आज मावशीला आभाळातुन दामिनी कडाडुन साथ देत होती...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा चमत्कारांमुळेच देवावर श्रद्धा बसते. राज यांच्या लेखनात एकही इंग्रजी शब्द नाही ह्याला चमत्कारापेक्षा दुसरं काय म्हणायचं!! Light 1
आवडलं

मला नाही कळली Sad

मांजरीला वाघाची मावशी म्हणतात हे मला माहीत आहे.

मावशी ईज ईक्वल टू मांजर हा अर्थ मी सुद्धा लावला आणि पुन्हा वाचली पण हे खालचे वाक्य मीटरमध्ये नाही बसले,
साऽला, गंदी नालीका किडा..

छान....

<< राज यांच्या लेखनात एकही इंग्रजी शब्द नाही ह्याला चमत्कारापेक्षा दुसरं काय म्हणायचं!! >>
------ कमेंट आवडली आणि सहमत... ते इंग्रजी टंकायला किती कष्ट घेत असतील पण भाषा आपलीच वाटते आणि समजते.

>>राज यांच्या लेखनात एकही इंग्रजी शब्द नाही ह्याला चमत्कारापेक्षा दुसरं काय म्हणायचं!!<<
अहो, मांजर इंग्रजीत स्वगत म्हणते तो चमत्कार झाला नसता का?.. Lol