माबो गंमतगूढ : आपणच ओळखू आपल्याला !

Submitted by कुमार१ on 5 September, 2021 - 02:58

आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !

खाली ६ शोधसूत्रे दिलेली आहेत. ती शास्त्रशुद्ध गूढ प्रकारची नसून एक प्रकारे गंमतगूढ आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.

तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत.

शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.

हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी.

ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात कुठेही अंक नाहीत.

सूत्रे :

१. हाताची बोटे मोजून अधिकार गाजवतो (५)

२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)

३. तिथे भरारी मारल्यानंतर पावित्र्य मिळाले (५)

४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५)

५. भटक्याने आडनाव लावले (५)

६. आवेशात पलंगावर टेकला
(५
)
......
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.

ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल. मात्र तुमचे उत्तर हे इथले सदस्य नाम हवेच

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५. मानव पृथ्वीकर नाही

ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही

५. परदेसाई नाही
पर - भटक्या ??
अणि
परदेस हा मराठी शब्द नाही
(स)

3 ... आकाशानन्द किंवा अज्ञातवासी
अज्ञातवासी --
( पावित्र्य ला संबंधित शब्द 'अधिष्ठान -- वास ' असा घेतलाय.

3 ... आकाशानन्द
निम्मे बरोबर आहे
योग्य दिशा...

भरारी साठी आकाश योग्य आहे

आकाशानन्द हे सदस्यनाम आहे ??

वर्णीता
तुम्हाला हॅटट्रिक करण्याची संधी आहे !

धन्यवाद Happy
सुटायला लागलं कोडं त्यामुळं मजा येतेय.

6... धडाकेबाज ?

6... धडाकेबाज ?
अर्थात बरोबर !
हॅटट्रिक, अभिनंदन !
तुम्हाला आता गती आली आहे
प्रश्नचिन्ह कसले टाकताय !
येणारच

सा मो
धन्यवाद.
या ,सामील व्हा
बॅट फिरवून बघायची...
एखादा चौकार बसतो काही वेळेस.

अभिनव कल्पना आहे डॉक्टरसाहेब!
पण मला ओळखता येत नाहीये. अभ्यास करून येते Lol

(गणेशोत्सवात हा एक खेळ ठेवता आला असता)

सामो Happy
अग वर डॉ कुमार यांनी लिहिलय तसं गं , बॅट फिरवून बघतेय Proud
मला पण अनंतयात्री, आनंदयात्री वाटलेलं पण क्र 4 चं

हे राहिले आहेत:
२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)

४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५)

५. भटक्याने आडनाव लावले (५)
,......

वत्सला
या खेळाचे दोन तीन प्रकार मी तयार करत आहे.
त्यातला एखादा जर संयोजकांना चालणार असेल तर ठेवता येईल

संधीसाधू
>>>
एखादे उत्तर देण्यापूर्वी ते इथले सदस्यनाम असल्याची खात्री करून घ्या

वर्णिता,
असं काय करताय, तुम्ही एकदम जोरात आहात !

५... उनाडटप्पू
बरोबरच

Pages