झी-मराठी : माझी तुझी रेशिमगाठ

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:12

२३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

या सिरियलच्या निमित्ताने श्रेयस तळपदे अन प्रार्थना बेहेरे बर्‍याच वर्षांनी डेलीसोप मधून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.

चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

त्या अजुनही बरसात आहे साठी वेगळा धागा काढला आहे याची नोंद घ्यावी. दोन्ही शिरेलीच्या स्टोर्‍यांची भेळम्सळ होऊन कोणाच्या डोक्याचं दही होऊ नये म्हणुन त्या शिरेलीची चर्चा : https://www.maayboli.com/node/79773 इथे करणेत यावी ही विनंती Bw

इथे कृपया रेशिमगाठीची चर्चा असावी हा शुद्ध हेतु Wink

तळपदेची acting आवडतेय. हिंदीतलं त्याचं काम बघून तो acting विसरला की काय असं वाटत होतं. सिरीयलमध्ये वावर pleasant वाटतोय सध्या तरी.
परीचा रोल करणाऱ्या मायराचं इंस्टा हँडल पाहिलं.. एवढ्या लहान मुलांना भयाण मेकअप थापून reels बनवणं ही कल्पना अजून पचनी पडणारी नाही. मालिकेत एकदम गोडुली वाटते त्यापेक्षा.

त्यात गळ्याच्या शिरा दिसायच्या आणी यात आता चेहरा सुजल्यासारखाच दिसतोय Lol >>> हो. ती त्या शिरा ताणून ताणून बोलत असते, दूर्वा बघितली होती.

रेशीमगाठीमधले खंडाळ्याचे घर सीन काहीच्या काही फनी असतात, आधीच ती एक महामाया काकू आणि दुसरी काकू, त्यात ते आलेले स्थळ, अस कुठे असतं का (सिरियलीत असत म्हणा) . ते मुलीचे बाबा बरे होते, मुलीची आई आणि मुलगी फार फनी होत्या. आई दिसायला सुंदर होती पण सारखी प्लेट हातात धरून खात होती, मुलगी अति बालिश होती.

श्रेयस आणि परीचा फोन सीन मस्त होता.

ही कोणीच बघत नाही का. मला ते परीचे दोन खोल्यांचे घर खूप आवडतं.

थोडी बोअर होतेय मालिका.

नायिकेची वहीनी स्वाती देवल दाखवली आहे, नायिकेच्या लग्नाचे बघते ती. ते chara मला आवडलं नाही. नायिकेचा नवरा गायब आहे म्हणजे डिवोर्स झालेला नसणार आणि नायकाशी लग्न झाल्यावर तो टपकणार, टिपिकल दाखवतील.

अरे पण काल आलेल्या,ओळख झालेल्या कलीग बरोबर असं वागतात
अर्धा बोनस काय, कॉन्ट्री चे पैसे काय, घरी पार्टी ला आमंत्रण...

बघतिये मी पण ही मालिका पण नायिका जाम डोक्यात जाते. किती चोंबडी आहे ती.+१११
एखादं कॅरेक्टर कित्ती चांगल आहे हे दाखवण्याच्या नादात काहीही दाखवतात.

+100

अरे पण काल आलेल्या,ओळख झालेल्या कलीग बरोबर असं वागतात
अर्धा बोनस काय, कॉन्ट्री चे पैसे काय, घरी पार्टी ला आमंत्रण..
+1

परत एकदा हास्यास्पद मालिका. हेलिकॉप्टर ट्रेंड मराठी सिरिअल मधे तुपारे नंतर यशस्वी. Proud
हेलिकॉप्टरच्या खिडक्या केवढ्या मोठया Lol
श्रेयस इज आय कँडी बस! बाकी काहीच नाही.
हिरवीण नेहेमीप्रमाणे अतिरेकी गोड, सद्गुणांचा पुतळा वगैरे वगैरे
बाकी फायलींवर सहया वगैरे आहेच. अजून प्रेसेंटेशन आलं कि नाही ? Lol

या लोकांना आपल्या मालकाचं नाव माहीत नाही ???
त्याला कधी बघितलं नाही ठीक पण नाव पण माहिती नसावं.
हेलिकॉप्टर , golf cart , घरात security च्या एवजी receptionist , designer blouses and sarees वापरणार्या सूना , uniformed house keeping staff ... अआणिअ.

तो खारतोंडे पण वाकून वाकून टकलावर रूमाल फिरवत असतो ते जाम डोक्यात जातं

हिरवीनीच्या शेजारची काकू म्हणजे गोट्याची आई Happy

या लोकांना आपल्या मालकाचं नाव माहीत नाही ???
त्याला कधी बघितलं नाही ठीक पण नाव पण माहिती नसावं.

>>>> आपल्या एम्पायरमधलं मुंबईतील हे छोटसं ॲाफीस - इति आजोबा

त्या यशने खरी ओळख लपवायची ठरवली आहे तर निदान बाकी स्टोरी तरी तयार करायची. त्या काकू भोचकपणे पहील्याच भेटीत अनेक साधे प्रश्न विचारतात तेव्हा याचं ततपप सुरु असतं.

ही कोणी बघताय का. मी बरेच दिवस बघितली नाही.

काय झाले, कुठपर्यंत स्टोरी सरकली हे कोणी लिहिलं तर बरं होईल.

चांगली चालु आहे अजुन तरी. उत्तम कालाकार. पण स्लो सिरीअल. हिरोईनवर कुठलं तरी मोठं लोन आहे नि घर हातातुन जाणेयाची शक्यता आहे . दोघांची मैत्री फुलवणंच चालु आहे अजुन. संकर्षण कराड , श्रेयस, छोटी मुलगी मस्त वाटतात .
ही मालिका नि स्वाभिमान सध्या छान आहेत. अक्शय कोठारी फारच मस्त दिसत आहे स्वाभिमान मध्ये.:)

स्वाभिमान मध्ये तो ज्योतीचा साखरपुडा मोडण्याचा सिन जरा जास्त भडक दाखवला, एवढे पुरावे दाखवून ही मास्टर्स करणारी ज्योती, मला तोच नवरा हवा म्हणून रडताना दाखवली..!
प्राध्यापक आणि विद्यार्थीनि यांच्यातले फुलणारे प्रेम संयत पणे दाखवत आहेत(सध्या तरी)

रेशीमगाठ मध्ये, हिरॉइन चा भाऊ दाखवला नाही एकदाही, आणि वहिनी अति भोचक आहे तरी ही एरवी सगळ्यांना बोलणारी हिरॉइन, वहिनी ला स्पष्ट सांगून टाकत नाही?

अक्शय कोठारी फारच मस्त दिसत आहे स्वाभिमान मध्ये. >>> हो आणि स्माईल एकदम स्वीट अँड कयूट. लीड दोघेही अभिनयात आवडतात मला.

मध्ये मध्ये मी पुढे ढकलते जेव्हा सीन्स ताणतात तेव्हा.

या सिरियलचे शीर्षक गीत अगदीच काहीतरी वाटते>> अगदी. आता काहीतरी थ्रिलर किंवा हॉरर बघायला मिळणार असं वाटतं नुसतं ते गाणं ऐकलं की.
जुनंच दळण आहे ही सिरीयल म्हणजे, पण मोजो, संकर्षण आणि श्रेयस मस्त काम करतायेत.
बाकी स्क्रिप्टच बाळबोध असल्यावर ते तरी काय करणार.
परी पण क्युट आहे.

छान आहे हि सिरियल. मी बघते. श्रेयस, प्रार्थना, परी, संकर्षण, मोजो सगळेच छान काम करतायत.

या सिरियलचे शीर्षक गीत अगदीच काहीतरी वाटते>> मला तरी आवडल शीर्षकगीत. छान इमोशनल आहे गाण

ही मालिका नि स्वाभिमान सध्या छान आहेत. अक्शय कोठारी फारच मस्त दिसत आहे स्वाभिमान मध्ये.:) >>>>>>> +++++ १११११११ सुरेखा कुडचीच्या जागी सविता प्रभुणे आलीये वाटत स्वाभिमान मध्ये.

किती दिवस झाले ते नेहाच्या घरचे दळण दळतायत, एवढा तो यश ५००करोड वाला, बॅँके मध्ये पटकन भरुन टाकायचे लोन चे पैसे, नुसतंच सतत रडगाणं चालू आहे. कोणी बघतायत का?

हल्ली मध्येच बघतेय परत, सिरियल जिथल्या तिथे आहे. मध्ये पंधरा दिवस बघितली नव्हती, काही फरक पडला नाही.

परीच्या आईने घर विकायचे आणि काका काकूंकडे राहायचं, काका काकू का विकतायेत. यश अजूनही माहिती मिळवू शकला नाही खरं काय आहे, की परांजपे फसवतोय.

परांजपेनेच प्लॅन करुन परी हरवलीय असा शो केला. आणि नंतर तिला परत घेऊन आला.

नेहा बोलताना बऱ्याच वाक्यांच्या व्याकरणातलं शेवटचं अक्षर खाऊन टाकते. ऐकायला फारच विचित्र वाटतं.

Pages